2020 मध्ये होता ऑनलाइन स्मार्टफोन मार्केटचा बोलबाला, जाणून घ्या कोणत्या कंपनीने जिंकले युद्ध

कोरोना वायरस महामारीच्या आधीच देशात ऑनलाइन शॉपिंग खूप मोठा ट्रेंड बनला आहे. हे पाहता साल 2020 मध्ये भारतातील ऑनलाइन स्मार्टफोन मार्केटमध्ये 45 टक्के वाढ दिसली आहे. एका नवीन रिपोर्टनुसार ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर ऑनलाइन स्मार्टफोन बाजार 2020 मध्ये 45 टक्क्यांवर पोहोचला आणि महामारीच्या काळात सात टक्के (वार्षिक) वृद्धि नोंदवली गेली. फ्लिपकार्ट 48 टक्के शेयरसह नंबर एकचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म बनला आहे, त्यानंतर अमेझॉनने 44 टक्के शेयर मिळवला. काउंटरपॉइंट रिसर्चने शुक्रवारी हा रिपोर्ट शेयर केला आहे.

वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने 2020 मध्ये भारतातील ऑनलाइन स्मार्टफोन बाजारात प्रथम क्रमांकांवर राहिला आहे. कंपनी महामारीच्या काळात ऑनलाइन स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 48 टक्के बाजारावर कब्जा करण्यात यशस्वी झाला आहे, रियलमी आणि पोको फ्लिपकार्टवर विकल्या गेलेल्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त स्मार्टफोन पैकी होते.

Xiaomi राहिली प्रथमस्थानी

अमेझॉनवर Redmi Note 8 सीरीज आणि Redmi 8 सीरीजच्या शानदार शिपमेंटमुळे Xiaomi टॉप ऑनलाइन स्मार्टफोन ब्रँड म्हणून उदयास आली. Xiaomi Redmi 8A Dual 2020 मध्ये शीर्ष ऑनलाइन स्मार्टफोन मॉडेल होता. तर, 19 टक्क्यांसह, सॅमसंगने ऑनलाइन स्मार्टफोन बाजारात दुसरे स्थान मिळवले आहे. सॅमसंगने अमेझॉनवर एक त्रितीयांशपेक्षा जास्त शिपमेंटवर कब्जा केला.

Realme ने पण आपल्या बाजाराची हिस्सेदारी 19 टक्के वाढवली होती तर वीवोने चौथे स्थानावर कब्जा केला आणि OnePlus ने ऑनलाइन स्मार्टफोन बाजारात पाचवा क्रमांक मिळवला होता.

अ‍ॅप्पलचे योगदान

प्रीमियम ऑनलाइन स्मार्टफोन बाजारात या योजनांमुळे 22 टक्के (ऑन-ईयर) वृद्धि झाली आहे. Apple, OnePlus आणि Samsung ने या सेगमेंटमध्ये जवळपास 90 टक्के शिपमेंटमध्ये योगदान दिले आहे.

ऑफलाइन बाजारात येईल उत्साह

अनेक ब्रँड ऑफलाईन बाजारात आपली पोच अजून वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. रिपोर्टनुसार येत्या काळात ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर पण गर्दी वाढणार आहे. कोविड-19 मुळे ऑफलाइन बाजाराला जास्त नुकसान झाले आहे.

ऑफलाइन रिटेलर्स स्मार्टफोन कंपन्यांवर नाराज

ऑफलाइन रिटेलर्स पुन्हा एकदा स्मार्टफोन कंपन्यांवर नाराज आहेत. ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनने आरोप केला आहे कि चायनीज कंपन्या रियलमी आणि शाओमी व्यतिरिक्त साउथ कोरियन कंपनी सॅमसंग पण ऑनलाइनवर लक्ष केंद्रित करत आहे आणि आपल्या ऑफलाइन पार्टनर्सकडे दुर्लक्ष करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here