Realme बद्दल अलीकडेच बातमी समोर आली होती कि कंपनी पुन्हा एकदा आपल्या नारजो सीरीजचा नेक्स्ट जेनरेशन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. लीक बातमी नुसार पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी 2021 मध्ये Realme Narzo 30 सीरीज लाॅन्च केली जाईल. दरम्यान आता अजून एक बातमी समोर येत आहे कि कंपनी Narzo 30 सीरीज सोबतच Realme 8 सीरीज पण आणण्याची तयारी करत आहे. टिप्सटर मुकुल शर्माने याची माहिती दिली आहे.
टिप्सटरने दिलेल्या माहितीनुसार Realme 8 आणि Realme 8 Pro भारतात पुढल्या वर्षी जानेवारी मध्ये लॉन्च होणार आहेत. पण, लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. असे वाटत आहे कि नवीन वर्षात कंपनी अनेक धमाके करण्यासाठी तयार आहे. लक्षात असू द्या कि काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि Realme X7 सीरीज पण जानेवारी मध्ये येईल.
हे देखील वाचा : Redmi 9 Power उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि खासियत
Not just the Narzo 30 series, the Realme 8 series (Realme 8 and Realme 8 Pro) is also coming soon to India. The expected launch date so far is in January 2021 only.#Realme #Realme8 #Realme8Pro
— Mukul Sharma (@stufflistings) December 15, 2020
Realme Narzo 30 सीरीजची माहिती एमएसपी वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टर स्टफलिस्टिंग्सचा हवाला देत वेबसाइटने सांगितले आहे कि रियलमी कंपनी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी मध्ये आपल्या नारजो सीरीजचा नेक्स्ट जेनरेशन सादर करणार आहे. लीक मध्ये या सीरीज मध्ये लाॅन्च होणाऱ्या दोन स्मार्टफोनची नावे सांगितली आहेत जे बाजारात Realme Narzo 30 आणि Realme Narzo 30 Pro नावाने येतील. बातमी मध्ये स्पष्ट झाले नाही कि नारजो 30 सीरीज मध्ये दोन्ही फोन लाॅन्च होतील कि कंपनी अजून काही फोन पण यात जोडेल. सीरीजच्या लाॅन्चसाठी आता कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.
हे देखील वाचा : Nokia 5.4 झाला लॉन्च, यात आहे 6 जीबी रॅम, 48एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी
Realme Narzo 20 सीरीज
Realme Narzo 20 चा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 10,499 रुपये आहे. तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे जो 11,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. Realme Narzo 20A चा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिंएट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या वेरिएंट्सची किंमत क्रमश: 8,499 रुपये आणि 9,499 रुपये आहे. हे दोन्ही फोन Glory Silver आणि Victory Blue कलर मध्ये लॉन्च झाले आहेत.
रियलमी 7 प्रो 8जीबी रॅम व्हिडीओ















