Realme C33 2023 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 14 Mar 2023 05:32:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह रियलमी सी33 2023 लाँच; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/realme-c33-2023-launched-in-india-price-specification-sale/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c33-2023-launched-in-india-price-specification-sale/#respond Tue, 14 Mar 2023 05:32:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19442 Realme नं भारतीय बाजारात सी-सीरीजमध्ये आपला नवीन मोबाइल फोन रियलमी सी33 2023 सादर केला आहे. हा फोन गेल्यावर्षी टेक मार्केटमध्ये आलेल्या सी33 चा नवीन व्हर्जन आहे. दोन्ही मॉडेल्स दरम्यन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनचा फरक आहे उर्वरित स्पेसिफिकेशन सारखेच आहेत. लाँच करण्यात आलेल्या नवीन स्मार्टफोन बद्दल बोलायचं झालं तर यात ऑक्टा-कोर यूनिसॉक टी612 प्रोसेसर आणि 5,000एमएएचची […]

The post 50 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह रियलमी सी33 2023 लाँच; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • रियलमी सी33 2023 ची विक्री कंपनीच्या साइटवर सुरु.
  • रियलमी सी33 2023 मध्ये यूनिसॉक टी612 प्रोसेसर आहे.
  • फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.

Realme नं भारतीय बाजारात सी-सीरीजमध्ये आपला नवीन मोबाइल फोन रियलमी सी33 2023 सादर केला आहे. हा फोन गेल्यावर्षी टेक मार्केटमध्ये आलेल्या सी33 चा नवीन व्हर्जन आहे. दोन्ही मॉडेल्स दरम्यन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनचा फरक आहे उर्वरित स्पेसिफिकेशन सारखेच आहेत. लाँच करण्यात आलेल्या नवीन स्मार्टफोन बद्दल बोलायचं झालं तर यात ऑक्टा-कोर यूनिसॉक टी612 प्रोसेसर आणि 5,000एमएएचची बॅटरी मिळते.

रियलमी सी33 2023 ची भारतीय किंमत

भारतात रियलमी सी33 2023 दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 4GB + 64GB कॉन्फिगरेशन ऑप्शनची किंमत 9,999 रुपये आहे. हँडसेटच्या 4GB + 128GB व्हर्जनची किंमत 10,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच रियलमी सी33 2023 रियलमी ऑनलाइन स्टोरवरून विकत घेता येईल, जिथे हा सेलसाठी उपलब्ध आहे. हे देखील वाचा: OPPO Find N2 Flip च्या भारतीय किंमतीची घोषणा; वेबसाइटसह फ्लिपकार्टवरून होईल विक्री

रियलमी सी33 2023 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ LCD Display
  • UNISOC T612 SOC
  • 4GB RAM, 128GB storage
  • 50MP dual camera
  • 5000mAh Battery

रियलमी सी33 2023 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन 60Hz रिफ्रेश रेट आणि 120Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. तसेच फोनमध्ये ऑक्टा-कोर यूनीएसओसी टी612 प्रोसेसर आणि माली जी57 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन 4GB LPDDR4X रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह येतो.

फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये मागे एक ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी शूटर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स आहे. हँडसेटमध्ये व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा सी-सीरीजचा नवीन स्मार्टफोन 5000 एमएएच बॅटरी आणि 10W चार्जिंगला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: iQOO Z7i झाला चीनमध्ये लाँच; Dimensity 6020 प्रोसेसर असलेला पहिला फोन

स्मार्टफोनमध्ये एक मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे आणि यात 3.5 मिमी ऑडियो जॅक देखील आहे. सुरक्षेसाठी डिवाइसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. हँडसेट रियलमी युआय एस एडिशनसह अँड्रॉइड 12 वर चालतो. फोन अ‍ॅक्वा ब्लू, सॅंडी गोल्ड आणि नाइट सी कलर ऑप्शनमध्ये येतो. याचे डायमेंशन 164.2×75.7×8.4mm आणि वजन 187 ग्राम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल-सिम, 4G, 2.4GHz WiFi, ब्लूटूथ 5.0, GPS, Glonass आणि Galileo असे ऑप्शन मिळतात.

The post 50 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह रियलमी सी33 2023 लाँच; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c33-2023-launched-in-india-price-specification-sale/feed/ 0
लो बजेटमध्ये येऊ शकतात Realme C55 आणि Realme C33 2023 https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-and-realme-c33-2023-india-launch-soon-ram-storage-color-variants-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-and-realme-c33-2023-india-launch-soon-ram-storage-color-variants-leaked/#respond Wed, 22 Feb 2023 05:32:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18038 स्वस्त स्मार्टफोन्स बनवून भारतात लोकप्रिय झालेली रियलमी कंपनी एकीकडे हायएन्ड फ्लॅगशिपच्या जीवावर बाजारात आपला विस्तार करत आहे तर दुसरीकडे लो बजेट मोबाइल बनवून अधिक ग्राहकांना आकर्षित करत आहे. आता बातमी आली आहे की दोन नवीन स्वस्त रियलमी फोन Realme C55 आणि Realme C33 2023 लवकरच भारतात लाँच होऊ शकतात. या दोन्ही मोबाइल फोन्सच्या मेमरी व्हेरिएंटसह […]

The post लो बजेटमध्ये येऊ शकतात Realme C55 आणि Realme C33 2023 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme C55 आणि Realme C33 2023 भारतात लाँच होणार आहेत.
  • हे दोन्ही लो बजेट स्मार्टफोन 12 ते 15 हजार रुपयांमध्ये लाँच होऊ शकतात.
  • रियलमी सी33 2023 गेल्यावर्षी लाँच झालेल्या Realme C33 चा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असेल.

स्वस्त स्मार्टफोन्स बनवून भारतात लोकप्रिय झालेली रियलमी कंपनी एकीकडे हायएन्ड फ्लॅगशिपच्या जीवावर बाजारात आपला विस्तार करत आहे तर दुसरीकडे लो बजेट मोबाइल बनवून अधिक ग्राहकांना आकर्षित करत आहे. आता बातमी आली आहे की दोन नवीन स्वस्त रियलमी फोन Realme C55 आणि Realme C33 2023 लवकरच भारतात लाँच होऊ शकतात. या दोन्ही मोबाइल फोन्सच्या मेमरी व्हेरिएंटसह बरीच महत्वाची माहिती आली आहे.

Realme C55 आणि Realme C33 2023 संबंधित माहिती एका टेक वेबसाइटनं दिली आहे. सूत्रांच्या हवाल्याने या वेबसाइटनं सांगितलं आहे की रियलमी कंपनी भारतात दोन लो बजेट स्मार्टफोन्स सादर करण्यास तयार आहे जे रियलमी सी55 तथा रियलमी सी33 2023 नावानं लाँच होऊ शकतात. नावावरून समजलं असेल की रियलमी सी33 2023 मॉडेल गेल्यावर्षी लाँच झालेल्या Realme C33 चा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असू शकतो. हे देखील वाचा: Xiaomi 13 आणि 13 Pro ची किंमत लीक! 26 फेब्रुवारीला होणार भारतात लाँच

Realme C33 2023

रियलमी सी33 2023 स्मार्टफोनबद्दल रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की हा मोबाइल फोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. रिपोर्टनुसार हा रियलमी मोबाइल भारतात Aqua Blue, Night Sea आणि Sandy Gold कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Realme C55

रियलमी सी55 बाबत सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. यात 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजचा समावेश असू शकतो. तसेच कलर मॉडेल्स पाहता रिपोर्टनुसार हा रियलमी स्मार्टफोन भारतीय बाजारात Rainforest (Green), Rainy Night (black) आणि Sunshower (orange) कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

जुना Realme C33

  • 6.5″ HD+ LCD Display
  • 3GB RAM + 32GB Storage
  • Unisoc T612 Processor
  • 50MP Dual Rear Camera
  • 5,000mAh Battery

जुन्या रियलमी सी33 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे ज्यात 3GB RAM + 32GB Storage मिळते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 2.0 सह 1.82गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या Unisoc T612 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा मोबाइल ड्युअल सिम, 4जी एलटीई आणि 3.5एमएम जॅक सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

Realme C33 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. सिक्योरिटीसाठी याच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा रियलमी मोबाइल 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: कमी किंमतीत लाँच झाली ही किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 80km धावणार

Realme C33 फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.8 अपर्चर असलेली 0.3 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी सी33 मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

The post लो बजेटमध्ये येऊ शकतात Realme C55 आणि Realme C33 2023 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-and-realme-c33-2023-india-launch-soon-ram-storage-color-variants-leaked/feed/ 0