iQOO Z7i झाला चीनमध्ये लाँच; Dimensity 6020 प्रोसेसर असलेला पहिला फोन

Highlights

  • iQOO Z7i चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे.
  • फोन डिमेन्सिटी 6020 चिपसेटसह असलेला जगातील पहिला फोन आहे.
  • Z7i मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

iQOO Z7i चीनच्या टेक मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील प्रोसेसर याची खासियत आहे. कारण जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो Dimensity 6020 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. हा फोन चीनच्या बाहेर कधी लाँच केला जाईल याबाबत ऑफिशियल माहिती समोर आली नाही. पुढे आम्ही या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

iQOO Z7i ची चीनमधील किंमत

iQOO Z7i कंपनीनं तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या डिवाइसच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 899 Yuan (जवळपास 10,766 रुपये), 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हर्जनची किंमत 1,099 Yuan (जवळपास 13,162 रुपये) आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,199 Yuan (जवळपास 14,360 रुपये) आहे. कंपनीनं हा डिवाइस मून शॅडो आणि आइस लेक ब्लू कलरमध्ये सादर केला आहे.

iQOO Z7i चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.51″ FHD LCD Display
  • Dimensity 6020 soc
  • 8GB RAM, 128GB Storage
  • 13MP + 2MP Camera
  • 5000mAh Battery

iQOO Z7i कंपनीनं 6.51-इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह सादर केला आहे, ज्यात फुल एचडी+ रेजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल, 20:9 आसपेक्ट रेश्यो आणि 88.99 टक्के स्क्रीन स्पेस मिळते. हा फोन Dimensity 6020 चिपसेटसह बाजारात आला आहे जी एक 7nm चिप आहे, यात 2 x ARM Cortex-A76 CPU कोर 2.2GHz पर्यंत चालतात. तर, 6 x ARM Cortex-A55 CPU कोर 2GHz पर्यंत क्लॉक करतात.

iQOO Z7i मध्ये 8 जीबी पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 8 जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमसह 128 जीबी यूएफएस 2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसमध्ये अतिरिक्त स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील आहे. तसेच फोन ओरिजिनओएस ओशन युआय सह अँड्रॉइड 13 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी देण्यात आलेले कॅमेरा फीचर्स पाहता फोनमध्ये फ्रंटला 5-मेगापिक्सलची लेन्स आहे. मागे 13-मेगापिक्सलचा मेन आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच Z7i मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या डिवाइसमध्ये ड्युअल सिम, 5G, वाय-फाय 802.11ac, ब्लूटूथ 5.1, GPS, USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक सारखे कनेक्टिवीटी फीचर्स मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here