Realme GT Neo 3T - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 01 May 2023 06:36:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme GT Neo 3T वर मोठा डिस्काउंट; फ्लिपकार्टवर मिळतेय ऑफर https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-3t-price-india-rs-19999-flipkart-big-savings-days-sale/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-3t-price-india-rs-19999-flipkart-big-savings-days-sale/#respond Mon, 01 May 2023 06:36:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20590 फ्लिपकार्ट आपल्या आगामी फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज 2023 सेलची माहिती दिली आहे. हा सेल भारतात 5 मे 2023 ला सुरु होईल, परंतु यातील डील्सची माहिती आजपासून उपलब्ध झाली आहे. सेलमध्ये अनेक ऑफर्स उपलब्ध होतील परंतु यातील एक ऑफर लक्ष वेधून घेते. फ्लिपकार्टच्या आगामी सेलमध्ये Realme GT Neo 3T स्मार्टफोन फक्त 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. […]

The post Realme GT Neo 3T वर मोठा डिस्काउंट; फ्लिपकार्टवर मिळतेय ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल 2023 लवकरच सुरु होणार आहे.
  • हा सेल भारतात 5 मे 2023 ला सुरु होईल.
  • या सेलमध्ये Realme GT Neo 3T स्मार्टफोन अविश्वसनीय किंमतीत विकत घेता येईल.

फ्लिपकार्ट आपल्या आगामी फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज 2023 सेलची माहिती दिली आहे. हा सेल भारतात 5 मे 2023 ला सुरु होईल, परंतु यातील डील्सची माहिती आजपासून उपलब्ध झाली आहे. सेलमध्ये अनेक ऑफर्स उपलब्ध होतील परंतु यातील एक ऑफर लक्ष वेधून घेते. फ्लिपकार्टच्या आगामी सेलमध्ये Realme GT Neo 3T स्मार्टफोन फक्त 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रियलमी जीटी नियो 3टी स्मार्टफोनवरील ऑफर

सध्या हा फोन फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 23,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे, त्यामुळे सेलमध्ये कमीत कमी 4,000 रुपयांच्या डिस्काउंट मिळेल हे स्पष्ट झालं आहे. या डिस्काउंटमध्ये बँक डिस्काउंटचा समावेश असेल की नाही हे स्पष्ट झालं नाही. हा फोन विकत घ्यायचा की नाही ते तुम्हाला याच्या स्पेक्सवरून समजेल. हे देखील वाचा: अर्ज करूनही मतदार ओळखपत्र आलं नाही? अशाप्रकारे फोनमध्ये डाउनलोड करा डिजिटल वोटर आयडी, जाणून घ्या प्रॉसेस

रियलमी जीटी नियो 3टी चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी जीटी नियो 3टी कंपनीनं 1080 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.62 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच आहे. फोनची स्क्रीन Samsung E4 AMOLED पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा रियलमी मोबाइल 1300निट्स ब्राइटनेस, 397पीपीआय, आणि 106 एनटीएससी सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो 3टी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि एक 2 मेगापिक्सल 4सीएम मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रियलमी जीटी नियो 3टी अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 5जी चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि UFS 3.1 Storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये एड्रेनो 650 जीपीयू आहे. हे देखील वाचा: क्वॉलकॉमच्या प्रोसेसरसह Redmi Note 12R Pro ची एंट्री; जाणून घ्या फीचर्स

पावरफुल स्पेसिफिकेशन्स सोबतच या रियलमी मोबाइल फोनमधील बॅटरी देखील दमदार आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 80वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीचा दावा आहे की हा मोबाइल फोन फक्त 12 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो. तसेच स्मार्ट मल्टी आयसी चिप फोन बॅटरी हीट होऊ देत नाही व थंड ठेवते.

The post Realme GT Neo 3T वर मोठा डिस्काउंट; फ्लिपकार्टवर मिळतेय ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-3t-price-india-rs-19999-flipkart-big-savings-days-sale/feed/ 0
ठरलं तर! OnePlus टक्कर देण्यासाठी येणार realme GT NEO 3T 5G Phone; सुसाट चार्जींगसह फ्लॅगशिप प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-3t-5g-india-launch-on-16-september-80w-fast-charging-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-3t-5g-india-launch-on-16-september-80w-fast-charging-know-price-specifications/#respond Thu, 08 Sep 2022 12:34:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12956 realme GT NEO 3T 5G India Launch: सध्या रियलमी भारतीय बाजारात बजेट स्मार्टफोन सादर करत आहे. अलीकडेच कंपनीनं 8,999 रुपयांमध्ये Realme C33 सादर केला होता. तर आता कंपनीनं 6000 च्या आसपासच्या किंमतीत येणाऱ्या Realme C30s ची घोषणा केली आहे, जो 14 सप्टेंबरला लाँच केला जाईल. पुढील आठवड्यात कंपनी जास्त व्यस्त असू शकते कारण आता कंपनीनं […]

The post ठरलं तर! OnePlus टक्कर देण्यासाठी येणार realme GT NEO 3T 5G Phone; सुसाट चार्जींगसह फ्लॅगशिप प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
realme GT NEO 3T 5G India Launch: सध्या रियलमी भारतीय बाजारात बजेट स्मार्टफोन सादर करत आहे. अलीकडेच कंपनीनं 8,999 रुपयांमध्ये Realme C33 सादर केला होता. तर आता कंपनीनं 6000 च्या आसपासच्या किंमतीत येणाऱ्या Realme C30s ची घोषणा केली आहे, जो 14 सप्टेंबरला लाँच केला जाईल. पुढील आठवड्यात कंपनी जास्त व्यस्त असू शकते कारण आता कंपनीनं एक मोठी घोषणा केली आहे. येत्या 16 सप्टेंबरला realme GT NEO 3T 5G Phone भारतात लाँच केला जाईल. एकंदरीत रियलमीनं दिवाळीच्या आधी मोठा धमाका करण्याची योजना बनवली आहे.

realme GT NEO 3T India Launch

रियलमी इंडियानं मीडिया इन्व्हाइट पाठवून घोषणा केली आहे की कंपनी भारतात आपली ‘जीटी नियो’ सीरीजचा विस्तार करणार आहे. या सीरीज अंतगर्त realme GT NEO 3T 5जी फोन लाँच केला जाईल जो 16 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी भारतात एंट्री घेईल. रियलमी जीटी नियो 3टी 8 सप्टेंबरपासून 16 सप्टेंबरपर्यंतच्या Realme Festive Days चा भाग असेल. हे देखील वाचा: 43 इंचाच्या OnePlus Y1S स्मार्ट टीव्हीवर 7,000 रुपयांची सूट; घरातच मिळवा थिएटरचा फील

realme GT NEO 3T Specifications

रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोनचं प्रोडक्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आलं आहे, या लिस्टिंगमधून स्मार्टफोनच्या फोटोज सोबतच अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे. हा मोबाइल फोन 80W Fast Charging टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल जी realme GT NEO 3T 5G Phone ची खासियत असेल. कंपनीनुसार फक्त 12 मिनिटांत हा स्मार्टफोन 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल.

realme GT NEO 3T स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 870 5G चिपसेटवर लाँच होईल. 5जी स्मार्ट टेक्नॉलॉजी असलेला हा प्रोसेसर सीपीयू व जीपीयू परफॉर्मन्स 10 टक्क्यांपर्यंत वाढवेल. तसेच हेव्ही गेमिंगसाठी या रियलमी मोबाइलमध्ये Cooling System चा सपोर्ट देखील मिळेल. फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. हे देखील वाचा: अत्यंत स्वस्तात लाँच होऊ शकतो Realme C30s; 14 सप्टेंबरला रेडमीपेक्षा कमी किंमतीत येऊ शकतो भारतात

realme GT NEO 3T 5G india launch on 16 september 80w fast charging know price specifications

रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोन हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या अन्य स्पेसिफिकेशन्ससाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल. आशा आहे की realme GT NEO 3T 5G 20 हजार पर्यंतच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो. परंतु अधिकृत किंमतीसाठी 16 सप्टेंबरची वाट बघणं योग्य ठरेल.

The post ठरलं तर! OnePlus टक्कर देण्यासाठी येणार realme GT NEO 3T 5G Phone; सुसाट चार्जींगसह फ्लॅगशिप प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-3t-5g-india-launch-on-16-september-80w-fast-charging-know-price-specifications/feed/ 0