ठरलं तर! OnePlus टक्कर देण्यासाठी येणार realme GT NEO 3T 5G Phone; सुसाट चार्जींगसह फ्लॅगशिप प्रोसेसर

realme GT NEO 3T 5G India Launch: सध्या रियलमी भारतीय बाजारात बजेट स्मार्टफोन सादर करत आहे. अलीकडेच कंपनीनं 8,999 रुपयांमध्ये Realme C33 सादर केला होता. तर आता कंपनीनं 6000 च्या आसपासच्या किंमतीत येणाऱ्या Realme C30s ची घोषणा केली आहे, जो 14 सप्टेंबरला लाँच केला जाईल. पुढील आठवड्यात कंपनी जास्त व्यस्त असू शकते कारण आता कंपनीनं एक मोठी घोषणा केली आहे. येत्या 16 सप्टेंबरला realme GT NEO 3T 5G Phone भारतात लाँच केला जाईल. एकंदरीत रियलमीनं दिवाळीच्या आधी मोठा धमाका करण्याची योजना बनवली आहे.

realme GT NEO 3T India Launch

रियलमी इंडियानं मीडिया इन्व्हाइट पाठवून घोषणा केली आहे की कंपनी भारतात आपली ‘जीटी नियो’ सीरीजचा विस्तार करणार आहे. या सीरीज अंतगर्त realme GT NEO 3T 5जी फोन लाँच केला जाईल जो 16 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी भारतात एंट्री घेईल. रियलमी जीटी नियो 3टी 8 सप्टेंबरपासून 16 सप्टेंबरपर्यंतच्या Realme Festive Days चा भाग असेल. हे देखील वाचा: 43 इंचाच्या OnePlus Y1S स्मार्ट टीव्हीवर 7,000 रुपयांची सूट; घरातच मिळवा थिएटरचा फील

realme GT NEO 3T Specifications

रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोनचं प्रोडक्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आलं आहे, या लिस्टिंगमधून स्मार्टफोनच्या फोटोज सोबतच अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे. हा मोबाइल फोन 80W Fast Charging टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल जी realme GT NEO 3T 5G Phone ची खासियत असेल. कंपनीनुसार फक्त 12 मिनिटांत हा स्मार्टफोन 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल.

realme GT NEO 3T स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 870 5G चिपसेटवर लाँच होईल. 5जी स्मार्ट टेक्नॉलॉजी असलेला हा प्रोसेसर सीपीयू व जीपीयू परफॉर्मन्स 10 टक्क्यांपर्यंत वाढवेल. तसेच हेव्ही गेमिंगसाठी या रियलमी मोबाइलमध्ये Cooling System चा सपोर्ट देखील मिळेल. फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. हे देखील वाचा: अत्यंत स्वस्तात लाँच होऊ शकतो Realme C30s; 14 सप्टेंबरला रेडमीपेक्षा कमी किंमतीत येऊ शकतो भारतात

realme GT NEO 3T 5G india launch on 16 september 80w fast charging know price specifications

रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोन हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या अन्य स्पेसिफिकेशन्ससाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल. आशा आहे की realme GT NEO 3T 5G 20 हजार पर्यंतच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो. परंतु अधिकृत किंमतीसाठी 16 सप्टेंबरची वाट बघणं योग्य ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here