43 इंचाच्या OnePlus Y1S स्मार्ट टीव्हीवर 7,000 रुपयांची सूट; घरातच मिळवा थिएटरचा फील

जर तुम्ही तुमच्या घरासाठी एक मोठा स्मार्ट टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर एक शानदार डील उपलब्ध आहे. या डीलमध्ये OnePlus Y1S 43 इंच स्मार्ट टीव्हीवर 21 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. तसेच कंपनी या स्मार्ट टीव्हीवर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर, ईएमआय, नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील देत आहे. म्हणजे तुम्ही हा स्मार्ट टीव्ही खूप कमी किंमतीत विकत घेऊ शकता. हा स्मार्ट टीव्ही भारतीय युजर्सना खूप आवडला आहे, फ्लिपकार्टवरच एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी याची खरेदी केली आहे. तसेच युजर्सनी या टीव्हीला 4.3 रेटिंग दिली आहे. पुढे आम्ही तुम्हाला OnePlus टीव्हीवर मिळणाऱ्या सर्व ऑफर आणि किंमतीची सविस्तर माहिती दिली आहे.

OnePlus Y1S 43 इंच स्मार्ट टीव्हीवर ऑफर्स

OnePlus Y1S स्मार्ट टीव्हीवर मिळणारी ऑफर पाहता फ्लिपकार्टवर हा स्मार्ट टीव्ही 31,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. परंतु सध्या यावर 21 टक्के म्हणजे 7,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या ऑफरनंतर तुम्ही हा टीव्ही फक्त 24,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच बँक ऑफर अंतर्गत या स्मार्ट टीव्हीवर फेडरल बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड ट्रँजॅक्शनवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे, तसेच आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवर 10 टक्क्यांची तात्कळ सूट मिळेल. हे देखील वाचा: Jio Offer: 300 रुपयांचा रिचार्ज करा आणि 10 लाख जिंका; जियोच्या भन्नाट ऑफरचे फक्त तीन दिवस शिल्लक

तुम्ही हा टीव्ही हप्त्यांवर देखील विकत घेऊ शकता. EMI ऑप्शन पाहता स्मार्ट टीव्हीवर नो कॉस्ट ईएमआय आणि साधारण EMI ऑप्शन देखील आहेत. ज्यात मामूली EMI देऊन तुम्ही हा स्मार्ट टीव्ही घरात आणू शकता. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर देखील 5% डिस्काउंटची ऑफर आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत जुना टीव्ही देऊन तुम्ही या स्मार्ट टीव्हीवर 16,900 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. म्हणजे सर्व ऑफर एकत्र करून तुम्ही हा स्मार्ट टीव्ही अत्यंत स्वस्तात घरी घेऊन येऊ शकता. हे देखील वाचा: iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत

OnePlus Y1S 43 इंचाच्या स्मार्ट टीव्हीचे स्पेक्स

OnePlus Y1S Smart TV, 43 इंचाच्या फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येतो. ज्यात 1920 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन मिळतं. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. शानदार ऑडियोसाठी स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडियो सपोर्टसह 20 वॅटचे स्पिकर देण्यात आले आहेत. डिवाइसमध्ये 8GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड टीव्ही ओएसवर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्ट टीव्हीमध्ये ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, एचडीएमआय, यूएसबी, PC ऑडियो इन, सारखे फीचर्स मिळतात. तसेच टीव्हीचं वजन पाहता हा टीव्ही फक्त 6.22 KG चा आहे. तसेच या स्मार्ट टीव्ही सोबत 1 वर्षाची वॉरंटी मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here