Redmi A2 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 19 May 2023 07:01:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्वस्त Redmi A2 आणि Redmi A2+ ची भारतात एंट्री, किंमत फक्त 5999 पासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-plus-launched-in-india-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-plus-launched-in-india-price-specifications/#respond Fri, 19 May 2023 07:01:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21023 शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आज भारतीय बाजारात दोन नवीन लो बजेट स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+ लाँच केले आहेत. ह्यातील बेस मॉडेलची किंमत 5,999 रुपयांपासून सुरु होते. दोन्ही मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. पुढे रेडमी ए2 आणि रेडमी ए2 प्लस प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचता येईल. रेडमी ए2 ची किंमत रेडमी ए2 स्मार्टफोन भारतात […]

The post स्वस्त Redmi A2 आणि Redmi A2+ ची भारतात एंट्री, किंमत फक्त 5999 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • रेडमी ए2 स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे
  • हे रेडमी फोन अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आले आहेत
  • Redmi A2+ मध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे

शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आज भारतीय बाजारात दोन नवीन लो बजेट स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+ लाँच केले आहेत. ह्यातील बेस मॉडेलची किंमत 5,999 रुपयांपासून सुरु होते. दोन्ही मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. पुढे रेडमी ए2 आणि रेडमी ए2 प्लस प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचता येईल.

रेडमी ए2 ची किंमत

रेडमी ए2 स्मार्टफोन भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. ह्याच्या बेस मॉडेलमध्ये 2जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 5,999 रुपये आहे. तर 2जीबी रॅम + 64जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये तर 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे.

रेडमी ए2+ ची किंमत

तर रेडमी ए2 प्लस भारतीय बाजारात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे ज्यात 4जीबी रॅमसह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ह्या व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये आहे. हे दोन्ही रेडमी फोन्स येत्या 23 मेपासून विकत घेता येतील जे Sea Green, Aqua Blue आणि Classic Black कलरमध्ये उपलब्ध होतील.

रेडमी ए2 आणि ए2+ चे स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : रेडमी ए2 आणि ए2 प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. कंपनीनं ह्याला डॉट ड्रॉप डिस्प्ले असं नाव दिलं आहे. ह्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत व खाली बारीक चिन पार्ट आहे.
  • प्रोसेसेर : हे रेडमी फोन अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आले आहेत जे 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक हीलियो जी36 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतात. ह्यात LPDDR4X RAM आणि eMMC 5.1 ROM टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवीन रेडमी मोबाइल 3जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतात जो 4जीबी रॅमला वाढवून 7जीबी करतात.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी शाओमी रेडमी ए2 आणि ए2+ स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह चालतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्या फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी : Redmi A2 आणि Redmi A2+ मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा मोबाइल फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
  • सिक्योरिटी : Redmi A2 स्मार्टफोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तर Redmi A2+ मध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : रेडमी ए2 प्लस ड्युअल सिमला सपोर्ट करतो. हा एक 4जी फोन आहे ज्यात ब्लूटूथ 5.0, 2.4गीगाहर्ट्ज वायफाय आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स देखील मिळतात.

The post स्वस्त Redmi A2 आणि Redmi A2+ ची भारतात एंट्री, किंमत फक्त 5999 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-plus-launched-in-india-price-specifications/feed/ 0
Xiaomi घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन Redmi A2; लाँच डेट, प्राइस आणि स्पेसिफिकेशन लीक https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-series-smartphone-india-launch-date-price-specifications-features-expected/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-series-smartphone-india-launch-date-price-specifications-features-expected/#respond Fri, 12 May 2023 10:30:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20855 रेडमी आपली एंट्री-लेव्हल Redmi A2 सीरीज भारतात सादर करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली आहे की या महिन्यात 19 मेला ए2 सीरीज सादर केली जाईल. भारतात येण्याआधी ह्या सीरीजमध्ये Redmi A2 आणि Redmi A2+ बजेट फोन्स युरोपियन मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आशा आहे की भारतात देखील हे दोन्ही फोन्स येऊ शकतात. […]

The post Xiaomi घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन Redmi A2; लाँच डेट, प्राइस आणि स्पेसिफिकेशन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi A2 सह A2+ येण्याची शक्यता आहे.
  • फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.
  • ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो.

रेडमी आपली एंट्री-लेव्हल Redmi A2 सीरीज भारतात सादर करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली आहे की या महिन्यात 19 मेला ए2 सीरीज सादर केली जाईल. भारतात येण्याआधी ह्या सीरीजमध्ये Redmi A2 आणि Redmi A2+ बजेट फोन्स युरोपियन मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आशा आहे की भारतात देखील हे दोन्ही फोन्स येऊ शकतात. चला जाणून घेऊया ह्या दोन्ही फोन्सची संभाव्य भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

रेडमी ए2 सीरीजची किंमत (संभाव्य)

Xiaomi नं Redmi A2 सीरीजच्या किंमतीचा खुलुसा लाँचच्या दिवशी होईल. परंतु, एंट्री लेव्हल स्मार्टफोन सीरीज असल्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की ह्या सीरिजची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. विशेष म्हणजे स्मार्टफोन Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. हे देखील वाचा: 80W फास्ट चार्जिंगसह दिसला Vivo चा नवीन फोन; एस सीरिजमध्ये होऊ शकतो दाखल

रेडमी ए2 आणि रेडमी ए2+ चे स्पेसिफिकेशन्स (युरोपियन व्हेरिएंट)

  • 6.52” HD+ LCD Display
  • MediaTek Helio G36 SoC
  • 8MP+ QVGA Dual Camera
  • 5MP Front camera
  • 5000mAh Battery

Redmi A2 आणि Redmi A2+ दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. दोन्ही फोनमध्ये 6.52-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन HD+ (1600 x 720 पिक्सल) आणि अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. रेडमीच्या या फोन्समध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. तसेच ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 32GB पर्यंतची eMMC 5.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

Redmi च्या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन्समध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 8MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह QVGA सेकंडरी लेन्स मिळते. फोनच्या रियर पॅनलवर LED फ्लॅश आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. Redmi च्या एंट्री लेव्हल फोन्समध्ये 5000mAh ची बॅटरी, 10W चार्ज आणि मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: Xiaomi चे दिवस गेले? टॉप 3 मधून बाहेर झाली कंपनी! जाणून घ्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड

Redmi A2 आणि Redmi A2+ लाइट ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये बाजारात आले आहेत. कनेक्टिव्हिटी ऑप्शन पाहता दोन्ही फोन ड्युअल सिम, 4G, 2.4GHz वायफाय, ब्लूटूथ 5.0, GPS, Glonass, आणि Galileo ला सपोर्ट करतात. तसेच फोन Android 12 (Go Edition) वर चालतात. यातील फरक म्हणजे फक्त Redmi A2+ मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.

The post Xiaomi घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन Redmi A2; लाँच डेट, प्राइस आणि स्पेसिफिकेशन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-series-smartphone-india-launch-date-price-specifications-features-expected/feed/ 0
भारतीय वेबसाइटवर दिसले सर्वांना परवडणारे रेडमीचे दोन फोन; लवकरच येणार बाजारात https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-and-a2-plus-spotted-on-bis-may-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-and-a2-plus-spotted-on-bis-may-launch-in-india-soon/#respond Mon, 30 Jan 2023 10:31:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17346 Xiaomi आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलियोमध्ये काही मोठे बदल गेल्यावर्षी केले आहेत. कंपनी याआधी आपल्या रेडमी ब्रँडचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन एका नंबर सीरिजमध्ये सादर करत होती, परंतु गेल्यावर्षी कंपनीनं Redmi A1 आणि A1+ हे दोन एंट्री लेव्हल स्मार्टफोन सादर केले होते. हे रेडमीचे सर्वात स्वस्त हँडसेट आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरिजचा विस्तार करत […]

The post भारतीय वेबसाइटवर दिसले सर्वांना परवडणारे रेडमीचे दोन फोन; लवकरच येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi A2 आणि A2+ लवकरच भारतात लाँच होतील.
  • दोन्ही अपकमिंग फोन्स BIS वर दिसले आहेत.
  • कंपनीनं गेल्यावर्षी रेडमी ए1 आणि ए1 प्लस सादर केले होते.

Xiaomi आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलियोमध्ये काही मोठे बदल गेल्यावर्षी केले आहेत. कंपनी याआधी आपल्या रेडमी ब्रँडचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन एका नंबर सीरिजमध्ये सादर करत होती, परंतु गेल्यावर्षी कंपनीनं Redmi A1 आणि A1+ हे दोन एंट्री लेव्हल स्मार्टफोन सादर केले होते. हे रेडमीचे सर्वात स्वस्त हँडसेट आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरिजचा विस्तार करत नेक्स्ट जेनरेशन Redmi A2 आणि Redmi A2+ लवकरच बाजारात घेऊन येत आहे, जे भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर दिसले आहेत.

भारतीय लाँच समीप

गिज्मोचायनाच्या रिपोर्टनुसार, रेडमीचे दोन्ही स्मार्टफोन्स A2 आणि A2+ Bureau of Indian Standards (BIS) वर दिसले आहेत. यावरून अंदाज लावला जात आहे की हे फोन्स लवकरच भारतीयांच्या भेटीला येतील. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन, किंमत आणि लाँच डेट बाबत मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. तसेच शाओमीनं देखील रेडमी ए2 आणि ए2प्लसच्या लाँच संबधित कोणतीही अधिकृत माहिती शेयर केली नाही. त्यामुळे हे दोन फोन कधी भारतात येतील हे अद्याप तरी सांगता येणार नाही. हे देखील वाचा: एकही रुपया जास्त न देता मिळवा 74GB डेटा; अशी आहे BSNL ची जबरदस्त ऑफर

Redmi A1+ Specifications

रेडमी ए1 प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. कंपनीनं याला डॉटड्रॉप डिस्प्ले असं नाव दिलं आहे ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. या फोनचे डायमेंशन 164.9×76.75×9.09एमएम आहे तर वजन 192ग्राम आहे.

Redmi A1+ अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या कोर्टेक्स-ए53 ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 2जीबी रॅम व 3जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच हे दोन्ही व्हेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी ए1 प्लस ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. हे देखील वाचा: काय सांगता! 8 हजारांच्या आत आली हटके इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते इतकी

फोटोग्राफीसाठी Redmi A1+ स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एआय लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रेडमी फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post भारतीय वेबसाइटवर दिसले सर्वांना परवडणारे रेडमीचे दोन फोन; लवकरच येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-a2-and-a2-plus-spotted-on-bis-may-launch-in-india-soon/feed/ 0