स्वस्त Redmi A2 आणि Redmi A2+ ची भारतात एंट्री, किंमत फक्त 5999 पासून सुरु

Highlights

  • रेडमी ए2 स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये आहे
  • हे रेडमी फोन अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आले आहेत
  • Redmi A2+ मध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे

शाओमी सब-ब्रँड रेडमीनं आज भारतीय बाजारात दोन नवीन लो बजेट स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+ लाँच केले आहेत. ह्यातील बेस मॉडेलची किंमत 5,999 रुपयांपासून सुरु होते. दोन्ही मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. पुढे रेडमी ए2 आणि रेडमी ए2 प्लस प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचता येईल.

रेडमी ए2 ची किंमत

रेडमी ए2 स्मार्टफोन भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. ह्याच्या बेस मॉडेलमध्ये 2जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 5,999 रुपये आहे. तर 2जीबी रॅम + 64जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये तर 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे.

रेडमी ए2+ ची किंमत

तर रेडमी ए2 प्लस भारतीय बाजारात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे ज्यात 4जीबी रॅमसह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ह्या व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये आहे. हे दोन्ही रेडमी फोन्स येत्या 23 मेपासून विकत घेता येतील जे Sea Green, Aqua Blue आणि Classic Black कलरमध्ये उपलब्ध होतील.

रेडमी ए2 आणि ए2+ चे स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : रेडमी ए2 आणि ए2 प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. कंपनीनं ह्याला डॉट ड्रॉप डिस्प्ले असं नाव दिलं आहे. ह्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत व खाली बारीक चिन पार्ट आहे.
  • प्रोसेसेर : हे रेडमी फोन अँड्रॉइड 13 ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आले आहेत जे 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक हीलियो जी36 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतात. ह्यात LPDDR4X RAM आणि eMMC 5.1 ROM टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवीन रेडमी मोबाइल 3जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतात जो 4जीबी रॅमला वाढवून 7जीबी करतात.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी शाओमी रेडमी ए2 आणि ए2+ स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह चालतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्या फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी : Redmi A2 आणि Redmi A2+ मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा मोबाइल फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
  • सिक्योरिटी : Redmi A2 स्मार्टफोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तर Redmi A2+ मध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : रेडमी ए2 प्लस ड्युअल सिमला सपोर्ट करतो. हा एक 4जी फोन आहे ज्यात ब्लूटूथ 5.0, 2.4गीगाहर्ट्ज वायफाय आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स देखील मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here