भारतीय वेबसाइटवर दिसले सर्वांना परवडणारे रेडमीचे दोन फोन; लवकरच येणार बाजारात

Redmi A1 plus price Specifications sale offer cheap xiaomi smartphone launched in india
Highlights

  • Redmi A2 आणि A2+ लवकरच भारतात लाँच होतील.
  • दोन्ही अपकमिंग फोन्स BIS वर दिसले आहेत.
  • कंपनीनं गेल्यावर्षी रेडमी ए1 आणि ए1 प्लस सादर केले होते.

Xiaomi आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलियोमध्ये काही मोठे बदल गेल्यावर्षी केले आहेत. कंपनी याआधी आपल्या रेडमी ब्रँडचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन एका नंबर सीरिजमध्ये सादर करत होती, परंतु गेल्यावर्षी कंपनीनं Redmi A1 आणि A1+ हे दोन एंट्री लेव्हल स्मार्टफोन सादर केले होते. हे रेडमीचे सर्वात स्वस्त हँडसेट आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरिजचा विस्तार करत नेक्स्ट जेनरेशन Redmi A2 आणि Redmi A2+ लवकरच बाजारात घेऊन येत आहे, जे भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर दिसले आहेत.

भारतीय लाँच समीप

गिज्मोचायनाच्या रिपोर्टनुसार, रेडमीचे दोन्ही स्मार्टफोन्स A2 आणि A2+ Bureau of Indian Standards (BIS) वर दिसले आहेत. यावरून अंदाज लावला जात आहे की हे फोन्स लवकरच भारतीयांच्या भेटीला येतील. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन, किंमत आणि लाँच डेट बाबत मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. तसेच शाओमीनं देखील रेडमी ए2 आणि ए2प्लसच्या लाँच संबधित कोणतीही अधिकृत माहिती शेयर केली नाही. त्यामुळे हे दोन फोन कधी भारतात येतील हे अद्याप तरी सांगता येणार नाही. हे देखील वाचा: एकही रुपया जास्त न देता मिळवा 74GB डेटा; अशी आहे BSNL ची जबरदस्त ऑफर

Redmi A1+ Specifications

रेडमी ए1 प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. कंपनीनं याला डॉटड्रॉप डिस्प्ले असं नाव दिलं आहे ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. या फोनचे डायमेंशन 164.9×76.75×9.09एमएम आहे तर वजन 192ग्राम आहे.

Redmi A1+ अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या कोर्टेक्स-ए53 ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 2जीबी रॅम व 3जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच हे दोन्ही व्हेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी ए1 प्लस ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. हे देखील वाचा: काय सांगता! 8 हजारांच्या आत आली हटके इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते इतकी

फोटोग्राफीसाठी Redmi A1+ स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एआय लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रेडमी फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here