Redmi Note 12 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 10:03:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi Note 12 4G येऊ शकतो बाजारात; टिपस्टरनं लीक केली माहिती https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-specifications-leaked/#respond Wed, 01 Mar 2023 12:04:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18302 Xiaomi सबब्रँड Redmi नं आपल्या ‘नोट 12 सीरीज’ अंतगर्त तीन मोबाइल फोन भारतात लाँच केले आहेत जे Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G नावाने सेलसाठी उपलब्ध आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12 4G लाँच […]

The post Redmi Note 12 4G येऊ शकतो बाजारात; टिपस्टरनं लीक केली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi Note 12 4G या सीरीजचा चौथा स्मार्टफोन असू शकतो.
  • सध्या Redmi Note 12 5G, Pro आणि Pro+ भारतात विकले जात आहेत.
  • नोट 12 4जी 15 हजारांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Xiaomi सबब्रँड Redmi नं आपल्या ‘नोट 12 सीरीज’ अंतगर्त तीन मोबाइल फोन भारतात लाँच केले आहेत जे Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G नावाने सेलसाठी उपलब्ध आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12 4G लाँच करू शकते. नवीन लीकमध्ये नोट 12 4जी फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Redmi Note 12 4G संबंधित हा लीक स्नूपीटेकनं शेयर केला आहे. या टिपस्टरनं आपल्या ट्वीटर हँडलवर रेडमी नोट 12 सीरीजचा एक पोस्टर अपलोड केला आहे ज्यात चार मोबाइल फोन दाखवण्यात आले आहेत. यात Redmi Note 12 5G, Pro आणि Pro+ सह Note 12 4G चा देखील समावेश आहे. हा नवीन फोन आहे जो अजून ग्लोबली लाँच झाला नाही. आशा आहे की कंपनी येत्या काही दिवसांत हा स्मार्टफोन भारतात सादर करेल. हे देखील वाचा: उन्हात रंग बदलणारा मोबाइल फोन Vivo V27 5G आला भारतात; इतकी आहे किंमत

Redmi Note 12 4G चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.67″ 120Hz AMOLED display
  • 50MP Triple Rear Camera
  • 6nm Qualcomm Snapdragon
  • 4GB RAM + 128 GB Storage
  • 33W 5,000mAh battery

समोर आलेल्या माहितीनुसार, रेडमी नोट 12 4जी फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते. फोटोवरून स्पष्ट झालं आहे की यात पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल ज्यात सेल्फी कॅमेरा असलेला होल वरच्या बाजूला मध्यभागी दिला जाईल.

Redmi Note 12 4G बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह लाँच केला जाईल जो 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला असू शकतो. नाव समोर आले नसले तरी चर्चा आहे की हा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट असू शकतो. या फोनमध्ये लेटेस्ट मीयुआय 14 दिला जाऊ शकतो. तसेच लीकमध्ये फोनचा 4जीबी रॅम रॅम व्हेरिएंट समोर आला आहे जोडीला 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

फोटोग्राफीसाठी या रेडमी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. समोर आलेल्या डिटेलनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो, जोडीला 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Redmi Note 12 4G मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. हे देखील वाचा: यंदाही दरवाढीपासून सुटका नाही! एयरटेलचे रिचार्ज प्लॅन महागणार; सुनिल मित्तलनी दिला इशारा

Redmi Note 12 4G मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. हा मोबाइल फोन आयपी53 रेटेड असू शकतो. फोनमध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ व वायफाय सारखे फीचर्स मिळू शकतात. रिपोर्टनुसार हा मोबाइल फोन Onyx Gray, Ice Blue आणि Mint Green कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

The post Redmi Note 12 4G येऊ शकतो बाजारात; टिपस्टरनं लीक केली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-specifications-leaked/feed/ 0
6GB RAM सह Redmi Note 12 5G फोन भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/#respond Thu, 05 Jan 2023 09:21:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16579 आज शाओमीनं भारतात आपल्या नव्या Redmi Note 12 Series मध्ये तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. यात Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G चा समावेश आहे. यातील प्रो मॉडेल्स थोडे महागडे असले तरी एक स्वस्त 5जी फोन कंपनीनं बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला आहे. कंपनीनं Redmi Note 12 […]

The post 6GB RAM सह Redmi Note 12 5G फोन भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आज शाओमीनं भारतात आपल्या नव्या Redmi Note 12 Series मध्ये तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. यात Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G चा समावेश आहे. यातील प्रो मॉडेल्स थोडे महागडे असले तरी एक स्वस्त 5जी फोन कंपनीनं बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला आहे. कंपनीनं Redmi Note 12 5G स्मार्टफोन फक्त 15,499 रुपये (ऑफर प्राइस) मध्ये भारतीय बाजारात आला आहे जो 6GB RAM, Snapdragon 4 Gen 1 चिपसेट, 48MP Camera आणि 33W 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67 FHD+ AMOLED 120Hz Display
  • 6GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 4 Gen 1
  • 48MP+8MP+2MP Camera
  • 33W 5,000mAh Battery

रेडमी नोट 12 5जी फोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन सॅमसंग अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. या फोन स्क्रीनमध्ये 1200निट्स पिक ब्राइटनेस, 4096लेव्हल डिमिंग, 4500000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनची थिकनेस फक्त 7.98एमएम आहे. हे देखील वाचा: लयभारी! 200MP Camera सह आला स्वस्त रेडमी फोन! भारतात Redmi Note 12 Pro व Note 12 Pro Plus लाँच

Redmi Note 12 5G अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 वर चालतो. या मोबाइल फोनमध्ये 6एनएम आर्किटेक्चरवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 619 जीपीयूला सपोर्ट करतो. रेडमी नोट 12 5जी LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

रेडमी नोट 12 5जी फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.88 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 ड्युअल सिम फोन आहे जो 5जी व 4जी दोन्ही नेटवर्कवर चालतो. हा फोन आयपी53 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर प्रूफ बनतो. 3.5एमएम जॅक आणि आयआर ब्लास्टर सोबतच स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी यह रेडमी नोट 12 5जी 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हे देखील वाचा: 16GB RAM सह बाहुबली OnePlus 11 लाँच! आयफोनला टक्कर देणार का हा नवा फ्लॅगशिप कीलर

Redmi Note 12 5G ची किंमत

रेडमी नोट 12 5जी भारतीय बाजारात दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर मोठा व्हेरिएंट 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजसह 19,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. फोनची विक्री 11 जानेवारीपासून सुरु होईल आणि ऑफर अंतर्गत बेस मॉडेल 15,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 6GB RAM सह Redmi Note 12 5G फोन भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
Redmi Note 12 5G ची होऊ शकते भारतात एंट्री; 5 जानेवारीला येणार नवी रेडमी नोट सीरिज https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-price-in-india-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-price-in-india-and-specifications/#respond Thu, 29 Dec 2022 07:23:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16481 रेडमी ब्रँड येत्या 5 जानेवारीला भारतात आपली नवी नोट सीरीज सादर करणार आहे. या सीरीज अंतगर्त कंपनी दोन प्रो मॉडेल Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G सोबतच स्वस्त आणि शानदार मोबाइल फोन Redmi Note 12 5G देखील लाँच करू शकते. जर तुम्ही लो बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल […]

The post Redmi Note 12 5G ची होऊ शकते भारतात एंट्री; 5 जानेवारीला येणार नवी रेडमी नोट सीरिज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रेडमी ब्रँड येत्या 5 जानेवारीला भारतात आपली नवी नोट सीरीज सादर करणार आहे. या सीरीज अंतगर्त कंपनी दोन प्रो मॉडेल Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G सोबतच स्वस्त आणि शानदार मोबाइल फोन Redmi Note 12 5G देखील लाँच करू शकते. जर तुम्ही लो बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर नोट 12 5जी फोन परफेक्ट ऑप्शन ठरू शकतो. पुढे आम्ही या रेडमी फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्ससह भारतीय किंमत सांगितली आहे.

चिनीमधील Redmi Note 12 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67 FHD+ AMOLED 120Hz डिस्प्ले
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 4 Gen 1
  • 48MP ड्युअल रियर कॅमेरा
  • 33W Fast Charging
  • 5,000mAh Battery

Redmi Note 12 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 वर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. रेडमी नोट 12 स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंतच्या रॅम तसेच 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो. हे देखील वाचा: जबरदस्त! 240W च्या सुपरफास्ट चार्जिंगसह होणार Realme GT Neo 5 ची एंट्री; लाँच पूर्वीच माहिती लीक

रेडमी नोट 12 स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाइल ही स्क्रीन सॅमसंग अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या फोनच्या डिस्प्लेमध्ये 1200निट्स पिक ब्राइटनेस, 4096लेव्हल डिमिंग, 4500000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 12 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Redmi Note 12 मोबाइल फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 ड्युअल सिम फोन आहे जो 5जी व 4जी दोन्ही नेटवर्कवर चालतो. 3.5एमएम जॅक आणि आयआर ब्लास्टर सोबतच या स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. रेडमी नोट 12 आयपी53 रेटेड आहे त्यामुळे हा फोन वॉटर प्रूफ बनतो. हे देखील वाचा: Vikram Vedha होणार OTT वर रिलीज; जाणून घ्या कधी आणि कुठे करता येईल मोफत स्ट्रीम

Redmi Note 12 5G ची भारतीय किंमत

चीनमध्ये रेडमी नोट 12 चार स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. याच्या व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 1199 युआन आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 14,000 रुपयांच्या आसपास आहे. हा शाओमी भारतात 13 हजारांच्या आत आणू शकते आणि Redmi Note 12 5G ची इंडिया प्राइस 12,999 रुपये असू शकते.

The post Redmi Note 12 5G ची होऊ शकते भारतात एंट्री; 5 जानेवारीला येणार नवी रेडमी नोट सीरिज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-price-in-india-and-specifications/feed/ 0
Redmi Note 12 सीरिजचा भारतीय लाँच टीज करण्यास कंपनीनं केलं सुरु https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-series-india-launch-tease-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-series-india-launch-tease-check-details/#respond Wed, 07 Dec 2022 09:31:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15747 Xiaomi नं काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आपली दणकट Redmi Note 12 सीरिज सादर केली होती. या सुपरहिट मिड रेंज स्मार्टफोन सीरीजमध्ये कंपनीनं चार स्मार्टफोन सादर केले आहेत. यात Redmi Note 12, Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Explorer Edition चा समावेश करण्यात आला होता. आता शाओमी रेडमी नोट सीरिजची […]

The post Redmi Note 12 सीरिजचा भारतीय लाँच टीज करण्यास कंपनीनं केलं सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi नं काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आपली दणकट Redmi Note 12 सीरिज सादर केली होती. या सुपरहिट मिड रेंज स्मार्टफोन सीरीजमध्ये कंपनीनं चार स्मार्टफोन सादर केले आहेत. यात Redmi Note 12, Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Explorer Edition चा समावेश करण्यात आला होता. आता शाओमी रेडमी नोट सीरिजची ही नवी पिढी लवकरच भारतात लाँच होऊ शकते. शाओमीनं Redmi Note 12 Series चा इंडिया लाँच टीज करण्यास सुरुवात केली आहे.

Redmi Note 12 Series India Launch

रेडमीनं आपल्या सोशल मीडिया हँडलवरून आगामी Redmi Note 12 5G सीरीज लाँचची माहिती देत नव्या सीरिजला ‘सुपर नोट’ (SuperNote) म्हटलं आहे. परंतु कंपनीनं ही सीरिज नेमकी कधी लाँच होईल हे सांगितलं नाही. तसेच या सीरिजमध्ये किती आणि कोणते मॉडेल येतील हे देखील स्पष्ट करण्यात आलं नाही. आशा आहे की ही सीरिज नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारतात येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार सीरिजमधील 200MP कॅमेरा असलेला Redmi Note 12 Pro+ भारतात येऊ शकतो, जोडीला Redmi Note 12 असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हे देखील वाचा: Jio युजर्ससाठी आला शानदार प्लॅन; कमी किंमतीत मिळणार 30 दिवसांची वैधता

जागतिक बाजारातील Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro+ स्मार्टफोन्समध्ये 6.67-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशीओ, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि 900nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनमध्ये मीडियाटेकच्या Dimensity 1080 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे, जोडीला Mali-G68 GPU आहे. दोन्ही फोन्स Android 12 आधारित MIUI 13 वर चालतात.

यातील Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एफ/1.88 अपर्चर असलेला 50MP Sony IMX766 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याचे काम करतो, जो 6P लेन्स, OIS ला सपोर्ट करतो. सोबत 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi Note 12 Pro+ मध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. परंतु यातील मुख्य कॅमेरा एफ/1.65 अपर्चर असलेला 200MP Samsung HPX सेन्सर आहे, जो 7P लेन्स, ALD कोटिंग आणि OIS ला सपोर्ट करतो. जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये देखील 16MP चा सेल्फी सेन्सर मिळतो. हे देखील वाचा: 6000mAh च्या बॅटरीसह स्वस्त Tecno Pova 4 ची भारतात एंट्री; 13GB रॅमसह 50MP चा शानदार कॅमेरा

कनेक्टिव्हिटीसाठी दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.0, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट चार्जिंग व डेटा ट्रान्सफरसाठी देण्यात आला आहे. Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमधील 5000mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर Note 12 Pro+ मधील बॅटरी 120W फास्ट चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो, तसेच फोन्स स्टिरियो स्पिकर्स आणि एक्स अ‍ॅक्सिस लिनियर मोटारला सपोर्ट करतात.

The post Redmi Note 12 सीरिजचा भारतीय लाँच टीज करण्यास कंपनीनं केलं सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-series-india-launch-tease-check-details/feed/ 0
भारतात पोको ब्रँड अंतर्गत येऊ शकतो Redmi Note 12 5G; BIS लिस्टिंगमधून खुलासा https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-launch-in-india-this-month-could-be-rebranded-as-poco-phone-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-launch-in-india-this-month-could-be-rebranded-as-poco-phone-price-specification/#respond Sat, 05 Nov 2022 04:02:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14632 चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीनं आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत गेल्या आठवड्यातच आपल्या होम मार्केट China मध्ये नवीन Redmi Note 12 series अंतर्गत Redmi Note 12 5G सादर केला होता, जो कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G हँडसेट पैकी एक आहे. आता या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर येऊ लागली आहे. 1199 युआन म्हणजे 13,700 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत […]

The post भारतात पोको ब्रँड अंतर्गत येऊ शकतो Redmi Note 12 5G; BIS लिस्टिंगमधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीनं आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत गेल्या आठवड्यातच आपल्या होम मार्केट China मध्ये नवीन Redmi Note 12 series अंतर्गत Redmi Note 12 5G सादर केला होता, जो कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G हँडसेट पैकी एक आहे. आता या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर येऊ लागली आहे. 1199 युआन म्हणजे 13,700 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत लाँच झालेल्या फोनबद्दल नवीन खुलासा झाला आहे की भारतात हा फोन POCO Smartphone ब्रँड अंतगर्त सादर केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार Redmi Note 12 5G सारखे स्पेसिफिकेशन असलेला पोको फोन या महिन्यात भारतात सादर केला जाईल. परंतु पोको इंडियानं मात्र याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

इंडियन साइटवरून समोर आली माहिती

Poco स्मार्टफोन मॉडेल नंबर 22111317PI सह Bureau of Indian Standards (BIS) डेटावर स्पॉट करण्यात आला आहे. याची माहिती टिप्सटर Simranpal Singh (@simransingh931) नं ट्विट केली आहे. Gizmochina च्या बातमीनुसार Redmi Note 12 5G देखील चीनमध्ये मॉडेल नंबर 22101317C सह सादर केला गेला होता, ज्याचा शॉर्ट फॉर्म M17 आहे. तसेच POCO device देखील BIS वर मॉडेल नंबर M17 सह दिसला आहे. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की चीनमध्ये आलेला रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोन भारतात Poco ब्रँड अंतगर्त नव्या नावानं सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: iPhone 14 वर बंपर ऑफर देत आहे जियो, इथे मिळेल सर्वात स्वस्तात हा फोन

चीनमध्ये लाल्या Redmi Note 12 5G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 12 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 वर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. रेडमी नोट 12 स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंतच्या रॅम तसेच 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

रेडमी नोट 12 स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाइल ही स्क्रीन सॅमसंग अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या फोनच्या डिस्प्लेमध्ये 1200निट्स पिक ब्राइटनेस, 4096लेव्हल डिमिंग, 4500000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 12 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Redmi Note 12 मोबाइल फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Samsung ला जोरदार धक्का! या कंपनीनं आणला सर्वात स्वस्त Foldable Smartphone

Redmi Note 12 ड्युअल सिम फोन आहे जो 5जी व 4जी दोन्ही नेटवर्कवर चालतो. 3.5एमएम जॅक आणि आयआर ब्लास्टर सोबतच या स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. रेडमी नोट 12 आयपी53 रेटेड आहे त्यामुळे हा फोन वॉटर प्रूफ बनतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post भारतात पोको ब्रँड अंतर्गत येऊ शकतो Redmi Note 12 5G; BIS लिस्टिंगमधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-launch-in-india-this-month-could-be-rebranded-as-poco-phone-price-specification/feed/ 0