Redmi Note 12 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 30 Mar 2023 10:24:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi Note 12 4G फोनची भारतात एंट्री; फोनमध्ये 50MP कॅमेऱ्यासह 6GB रॅम https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/#respond Thu, 30 Mar 2023 08:59:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19872 आज शाओमीनं भारतात Redmi Note 12 Series मध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आणलेला Redmi Note 12 4G देशात सादर केला आहे. कंपनीनं Redmi Note 12 4G स्मार्टफोन फक्त 14,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात आला आहे जो 6GB RAM, Snapdragon 685 चिपसेट, 50MP Camera आणि 33W 5,000mAh Battery ला सपोर्ट […]

The post Redmi Note 12 4G फोनची भारतात एंट्री; फोनमध्ये 50MP कॅमेऱ्यासह 6GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Snapdragon 685 चिपसेट असलेला पहिला फोन भारतात.
  • 6GB RAM सह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
  • Redmi Note 12 4G फोन 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो


आज शाओमीनं भारतात Redmi Note 12 Series मध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आणलेला Redmi Note 12 4G देशात सादर केला आहे. कंपनीनं Redmi Note 12 4G स्मार्टफोन फक्त 14,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात आला आहे जो 6GB RAM, Snapdragon 685 चिपसेट, 50MP Camera आणि 33W 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 4G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67 FHD+ Super AMOLED 120Hz Display
  • 6GB RAM + 128GB Storage
  • Qualcomm Snapdragon 685
  • 50MP+8MP+2MP Camera
  • 33W 5,000mAh Battery

रेडमी नोट 12 4जी फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा एक सुपर अ‍ॅमोलेड पॅनल आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1200निट्स पिक ब्राइटनेस, DCI-P3 कलर गेमुट आणि 4,500:000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर चालतो. हे देखील वाचा: Moto G13 4G भारतात लाँच! यात आहे 90Hz डिस्प्ले, MediaTek Helio G85 SoC आणि खूप काही

Redmi Note 12 4G फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट देण्यात आला आहे. रेडमी नोट 12 4जी 6GB LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंत UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो. यात वर्च्युअली 5GB अतिरिक्त रॅम पवार मिळवता येईल. तसेच यातील स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येईल.

रेडमी नोट 12 4जी फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 30 दिवस वैधता आणि 30जीबी डेटासह आला Vi चा नवीन प्लॅन

Redmi Note 12 4G ड्युअल सिम फोन आहे. हा फोन आयपी53 रेटेड आहे ज्यामुळे हा काही प्रमाणात वॉटर प्रूफ बनतो. 3.5एमएम जॅक आणि आयआर ब्लास्टर सोबतच स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी यह रेडमी नोट 12 4जी 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

Redmi Note 12 4G ची किंमत

Redmi Note 12 4G दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाॅन्च झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. तर फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट 16,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. रेडमी नोट 12 ची विक्री 6 एप्रिलपासून सुरु होईल तसेच फोन Sunrise Gold, Lunar Black आणि Ice Blue कलरमध्ये विकत घेता येईल.

The post Redmi Note 12 4G फोनची भारतात एंट्री; फोनमध्ये 50MP कॅमेऱ्यासह 6GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
6GB RAM सह Redmi Note 12 5G फोन भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/#respond Thu, 05 Jan 2023 09:21:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16579 आज शाओमीनं भारतात आपल्या नव्या Redmi Note 12 Series मध्ये तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. यात Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G चा समावेश आहे. यातील प्रो मॉडेल्स थोडे महागडे असले तरी एक स्वस्त 5जी फोन कंपनीनं बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला आहे. कंपनीनं Redmi Note 12 […]

The post 6GB RAM सह Redmi Note 12 5G फोन भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आज शाओमीनं भारतात आपल्या नव्या Redmi Note 12 Series मध्ये तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. यात Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G चा समावेश आहे. यातील प्रो मॉडेल्स थोडे महागडे असले तरी एक स्वस्त 5जी फोन कंपनीनं बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला आहे. कंपनीनं Redmi Note 12 5G स्मार्टफोन फक्त 15,499 रुपये (ऑफर प्राइस) मध्ये भारतीय बाजारात आला आहे जो 6GB RAM, Snapdragon 4 Gen 1 चिपसेट, 48MP Camera आणि 33W 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67 FHD+ AMOLED 120Hz Display
  • 6GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 4 Gen 1
  • 48MP+8MP+2MP Camera
  • 33W 5,000mAh Battery

रेडमी नोट 12 5जी फोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन सॅमसंग अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. या फोन स्क्रीनमध्ये 1200निट्स पिक ब्राइटनेस, 4096लेव्हल डिमिंग, 4500000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनची थिकनेस फक्त 7.98एमएम आहे. हे देखील वाचा: लयभारी! 200MP Camera सह आला स्वस्त रेडमी फोन! भारतात Redmi Note 12 Pro व Note 12 Pro Plus लाँच

Redmi Note 12 5G अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 वर चालतो. या मोबाइल फोनमध्ये 6एनएम आर्किटेक्चरवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 619 जीपीयूला सपोर्ट करतो. रेडमी नोट 12 5जी LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

रेडमी नोट 12 5जी फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.88 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 ड्युअल सिम फोन आहे जो 5जी व 4जी दोन्ही नेटवर्कवर चालतो. हा फोन आयपी53 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर प्रूफ बनतो. 3.5एमएम जॅक आणि आयआर ब्लास्टर सोबतच स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी यह रेडमी नोट 12 5जी 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हे देखील वाचा: 16GB RAM सह बाहुबली OnePlus 11 लाँच! आयफोनला टक्कर देणार का हा नवा फ्लॅगशिप कीलर

Redmi Note 12 5G ची किंमत

रेडमी नोट 12 5जी भारतीय बाजारात दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर मोठा व्हेरिएंट 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजसह 19,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. फोनची विक्री 11 जानेवारीपासून सुरु होईल आणि ऑफर अंतर्गत बेस मॉडेल 15,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 6GB RAM सह Redmi Note 12 5G फोन भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-5g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
लयभारी! 200MP Camera सह आला स्वस्त रेडमी फोन! भारतात Redmi Note 12 Pro व Note 12 Pro Plus लाँच https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-phone-redmi-note-12-pro-plus-and-redmi-note-12-pro-launched-india-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-phone-redmi-note-12-pro-plus-and-redmi-note-12-pro-launched-india-price-specifications/#respond Thu, 05 Jan 2023 06:48:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16574 शाओमीच्या सब ब्रँड रेडमीची नोट सीरिज ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार फीचर्स देण्यासाठी ओळखली जाते. आपली ही ओळख कायम ठेवत कंपनीनं आज भारतात आपली नवी Redmi Note 12 Series सादर केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीनं Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ phones सादर केले आहेत. परंतु यातील प्रो प्लस […]

The post लयभारी! 200MP Camera सह आला स्वस्त रेडमी फोन! भारतात Redmi Note 12 Pro व Note 12 Pro Plus लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीच्या सब ब्रँड रेडमीची नोट सीरिज ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार फीचर्स देण्यासाठी ओळखली जाते. आपली ही ओळख कायम ठेवत कंपनीनं आज भारतात आपली नवी Redmi Note 12 Series सादर केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीनं Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ phones सादर केले आहेत. परंतु यातील प्रो प्लस मॉडेलमध्ये जगातील सर्वात मोठं रिजोल्यूशन म्हणजे 200MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या आर्टिकलमध्ये रेडमी नोट 12 प्रो आणि रेडमी नोट 12 प्रो प्लस फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती घेऊया.

Redmi Note 12 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67-इंचाचा एफएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • मीडियाटेक डाइमेंसिटी 1080 SoC
  • 200MP + 8MP + 2MP कॅमेरा सेटअप
  • 4980mAh बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग
  • Android 12 बेस्ड MIUI 13

Redmi Note 12 Pro+ स्मार्टफोन्समध्ये 6.67-इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशियो, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि 900nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.

परफॉर्मन्ससाठी कंपनीनं फोनमध्ये 6nm फॅब्रिकेशन प्रोसेसवर बनलेला मीडियाटेकच्या Dimensity 1080 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे, जोडीला Mali-G68 GPU आहे. हा फोन LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. Redmi Note 12 Pro+ स्मार्टफोन Android 12 आधारित MIUI 13 वर चालतो. हेव्ही प्रोसेसिंगमध्ये फोन थंड ठेवण्यासाठी व्हेपर चेंबर कुलिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

Redmi Note 12 Pro+ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा एफ/1.65 अपर्चर असलेला 200MP Samsung HPX सेन्सर आहे, जो 7P लेन्स, ALD कोटिंग आणि OIS ला सपोर्ट करतो. जोडीला एफ/2.2 अपर्चर आणि 120 डिग्री FoV असलेला 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2MP मॅक्रो कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये देखील 16MP चा सेल्फी सेन्सर मिळतो.

कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.0, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट चार्जिंग व डेटा ट्रान्सफरसाठी देण्यात आला आहे. Redmi Note 12 Pro+ स्मार्टफोनमधील 4980mAh ची 120W फास्ट चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो, तसेच IP53 सर्टिफाइड वॉटर रेजिस्टन्स फोन आहे जो स्टिरियो स्पिकर्स आणि एक्स अ‍ॅक्सिस लिनियर मोटारला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67-इंच एफएचडी+ OLED डिस्प्ले
  • मीडियाटेक डाइमेंसिटी 1080 SoC
  • 50MP + 8MP + 2MP कॅमेरा सेटअप
  • 5000mAh बॅटरी, 67Wफास्ट चार्जिंग
  • Android 12 बेस्ड MIUI 13

Redmi Note 12 Pro मध्ये 6.67-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशीओ, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि 900nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनमध्ये मीडियाटेकच्या Dimensity 1080 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे, जोडीला Mali-G68 GPU आहे. दोन्ही फोन्स Android 12 आधारित MIUI 13 वर चालतात.

Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एफ/1.88 अपर्चर असलेला 50MP Sony IMX766 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याचे काम करतो, जो 6P लेन्स, OIS ला सपोर्ट करतो. सोबत एफ/2.2 अपर्चर असलेला 8MP ची 120 डिग्री FoV असलेली अल्ट्रा वाइड लेन्स आणि एफ/2.45 अपर्चर असलेला 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.0, NFC, GPS आणि USB Type-C पोर्टसह येतो. Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमधील 5000mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. IP53 सर्टिफाईड हा फोन सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तसेच फोन्स स्टिरियो स्पिकर्स आणि एक्स अ‍ॅक्सिस लिनियर मोटार मिळते.

Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro+ ची किंमत

Redmi Note 12 Pro+ 5G चे दोनच व्हेरिएंट भारतीय बाजारात दाखल झाले आहेत. यातील बेस मॉडेलची किंमत शाओमीनं 29,999 रुपये ठेवली आहे, ज्यात 8GB रॅम व 256GB स्टोरेज मिळते. तर टॉप मॉडेलसाठी 32,999 रुपये मोजावे लागतील ज्यात 12GB रॅम व 256GB स्टोरेज मिळते. हा नवीन रेडमी डिवाइस 11 जानेवारीला दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी करता येईल.

Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोनच्या 6GB रॅम व 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. तर 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल 26,999 रुपये आणि 8GB रॅम व 256GB व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनवर आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना 3,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जाईल. याची विक्री येत्या 11 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल.

The post लयभारी! 200MP Camera सह आला स्वस्त रेडमी फोन! भारतात Redmi Note 12 Pro व Note 12 Pro Plus लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-phone-redmi-note-12-pro-plus-and-redmi-note-12-pro-launched-india-price-specifications/feed/ 0
Redmi Note 12 Explorer Edition चीनमध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-12-explorer-edition-launched-in-india-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-12-explorer-edition-launched-in-india-check-price-and-specifications/#respond Fri, 28 Oct 2022 05:05:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14397 Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Explorer Edition स्मार्टफोन लाँच झाले आहेत. Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत हे तिन्ही मोबाइल कंपनीच्या होम मार्केटमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत, जे खूप पावरफुल स्पेसिफिकेशन्सनी सुसज्ज आहेत. यातील रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन सर्वात ताकदवान डिवाइस आहे ज्याची माहिती पुढे देण्यात आली […]

The post Redmi Note 12 Explorer Edition चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Explorer Edition स्मार्टफोन लाँच झाले आहेत. Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत हे तिन्ही मोबाइल कंपनीच्या होम मार्केटमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत, जे खूप पावरफुल स्पेसिफिकेशन्सनी सुसज्ज आहेत. यातील रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन सर्वात ताकदवान डिवाइस आहे ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Redmi Note 12 Explorer Edition Display

रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तथा 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. Redmi Note 12 Explorer Edition मध्ये 900निट्स ब्राइटनेस, एचडीआर10+ आणि डॉल्बी व्हिजन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: जबरदस्त! सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत 200MP Camera! दमदार Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro Plus लाँच

Xiaomi Redmi Note 12 Explorer Edition launched in india check price and specifications

Redmi Note 12 Explorer Edition Camera

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.65 अपर्चर असलेला 200 मेगापिक्सलचा सॅमसंग एचपीएक्स सेन्सर देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. Redmi Note 12 Explorer Edition 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 Explorer Edition Processor

रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन अँड्रॉइड 12 वर आधारित मीयुआय 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेट देण्यात आला आहे. हा रेडमी मोबाइल 5जी आणि 4जी दोन्ही वर चालतो. Redmi Note 12 Explorer Edition मध्ये 8 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

Redmi Note 12 Explorer Edition Battery

रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशनची सर्वात मोठी खासियत याची चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. हा स्मार्टफोन 210वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. Redmi Note 12 Explorer Edition मध्ये 4,300एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 210W fast charging support मुळे फक्त 9 मिनिटांत 0 ते 100 टक्क्यांपर्यंत म्हणजे फुल चार्ज होतो. हे देखील वाचा: सुपर डिजाइन आणि दमदार फीचर्स असलेल्या फोनवर 5,000 रुपयांची सूट; अशी Realme 9i वरील ऑफर

Redmi Note 12 Explorer Edition Price

रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन टेक मंचावर फक्त एकच व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या मोबाइल फोनमध्ये 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जिची प्राइस 2,399 युआन म्हणजे भारतीय करंसीनुसार 27,200 रुपयांच्या आसपास आहे. चीनमध्ये Redmi Note 12 Explorer Edition स्मार्टफोन ब्लॅक कलरमध्ये लाँच केला गेला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Redmi Note 12 Explorer Edition चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-12-explorer-edition-launched-in-india-check-price-and-specifications/feed/ 0
हुकमाचा एक्का काढणार Xiaomi! शक्तिशाली प्रोसेसरसह Redmi Note 12 लाँच करण्याची तयारी, पाहा भन्नाट फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-12-pro-price-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-12-pro-price-specifications-leaked/#respond Thu, 13 Oct 2022 05:22:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13936 Xiaomi च्या सब ब्रँड रेडमीची नोट सीरिज खूप लोकप्रिय आहे, बजेटमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी ही सीरिज ओळखली जाते. आता कंपनी लवकरच आपली रेडमी नोट 12 सीरीज (Redmi Note 12 Series) सादर करणार आहे. या स्मार्टफोन सीरीज अंतगर्त Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro Max लाँच केले जातील अशी चर्चा […]

The post हुकमाचा एक्का काढणार Xiaomi! शक्तिशाली प्रोसेसरसह Redmi Note 12 लाँच करण्याची तयारी, पाहा भन्नाट फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi च्या सब ब्रँड रेडमीची नोट सीरिज खूप लोकप्रिय आहे, बजेटमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी ही सीरिज ओळखली जाते. आता कंपनी लवकरच आपली रेडमी नोट 12 सीरीज (Redmi Note 12 Series) सादर करणार आहे. या स्मार्टफोन सीरीज अंतगर्त Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro Max लाँच केले जातील अशी चर्चा आहे. शाओमीनं मात्र या स्मार्टफोन्सच्या लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु फोन बाजारात येण्याआधीच रेडमी नोट 12 चे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. पुढे आम्ही Xiaomi Redmi Note 12 स्मार्टफोन कोणत्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्ससह बाजारात येईल याची माहिती दिली आहे.

Xiaomi Redmi Note 12

शाओमी रेडमी नोट 12 बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत. अलीकडेच चीनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर हा आगामी रेडमी फोन स्पॉट करण्यात आला आहे जिथे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. Xiaomi Redmi Note 12 बद्दल समजलं आहे की हा स्मार्टफोन मीडियाटेक डिमेन्सिटी 1080 चिपसेट (MediaTek Dimensity 1080) वर लाँच केला जाईल. या चिपसेटची तुलना टक्कर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी (Qualcomm Snapdragon 778G) चिपसेटशी केली जात आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला नोकियाचा दणका! अत्यंत कमी किंमतीत 8 इंचाचा Nokia T10 LTE टॅबलेट

Xiaomi Redmi Note 12 Pro price specifications leaked
Redmi Note 11 Pro Plus

Redmi Note 12 मध्ये डिमेन्सिटी 1080 चिपसेट सोबतच 2.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळू शकतो जो कोर्टेक्स ए78 कोरवर चालतो. हा रेडमी मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर लाँच केला जाऊ शकतो जो मीयुआय 13 वर काम करेल. फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 12 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरचा समावेश असू शकतो.

Redmi Note 11 Price

भारतात सध्या रेडमी नोट 11 स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये विकत घेता येईल. रेडमी नोट 11 चा बेस व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 11,999 रुपये आहे. रेडमी नोट 11 चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर सर्वात मोठा व्हेरिएंट 6GB RAM + 128GB Storage Redmi Note 11 Price 15,499 रुपये आहे. हा फोन Horizon Blue, Space Black आणि Starburst White कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: 521KM च्या अवाढव्य रेंजसह BYD Atto 3 Electric SUV ची भारतात एंट्री; युनिट्स संपण्याआधीच करा बुक

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post हुकमाचा एक्का काढणार Xiaomi! शक्तिशाली प्रोसेसरसह Redmi Note 12 लाँच करण्याची तयारी, पाहा भन्नाट फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-12-pro-price-specifications-leaked/feed/ 0