Redmi Note 12 Explorer Edition चीनमध्ये लाँच

Xiaomi Redmi Note 12 Explorer Edition launched in india check price and specifications

Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Explorer Edition स्मार्टफोन लाँच झाले आहेत. Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत हे तिन्ही मोबाइल कंपनीच्या होम मार्केटमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत, जे खूप पावरफुल स्पेसिफिकेशन्सनी सुसज्ज आहेत. यातील रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन सर्वात ताकदवान डिवाइस आहे ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Redmi Note 12 Explorer Edition Display

रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तथा 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. Redmi Note 12 Explorer Edition मध्ये 900निट्स ब्राइटनेस, एचडीआर10+ आणि डॉल्बी व्हिजन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: जबरदस्त! सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत 200MP Camera! दमदार Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro Plus लाँच

Xiaomi Redmi Note 12 Explorer Edition launched in india check price and specifications

Redmi Note 12 Explorer Edition Camera

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.65 अपर्चर असलेला 200 मेगापिक्सलचा सॅमसंग एचपीएक्स सेन्सर देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. Redmi Note 12 Explorer Edition 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 Explorer Edition Processor

रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन अँड्रॉइड 12 वर आधारित मीयुआय 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेट देण्यात आला आहे. हा रेडमी मोबाइल 5जी आणि 4जी दोन्ही वर चालतो. Redmi Note 12 Explorer Edition मध्ये 8 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

Redmi Note 12 Explorer Edition Battery

रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशनची सर्वात मोठी खासियत याची चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. हा स्मार्टफोन 210वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. Redmi Note 12 Explorer Edition मध्ये 4,300एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 210W fast charging support मुळे फक्त 9 मिनिटांत 0 ते 100 टक्क्यांपर्यंत म्हणजे फुल चार्ज होतो. हे देखील वाचा: सुपर डिजाइन आणि दमदार फीचर्स असलेल्या फोनवर 5,000 रुपयांची सूट; अशी Realme 9i वरील ऑफर

Redmi Note 12 Explorer Edition Price

रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन टेक मंचावर फक्त एकच व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या मोबाइल फोनमध्ये 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जिची प्राइस 2,399 युआन म्हणजे भारतीय करंसीनुसार 27,200 रुपयांच्या आसपास आहे. चीनमध्ये Redmi Note 12 Explorer Edition स्मार्टफोन ब्लॅक कलरमध्ये लाँच केला गेला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here