30 दिवस वैधता आणि 30जीबी डेटासह आला Vi चा नवीन प्लॅन

Highlights

  • Vi नं 181 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.
  • रिचार्जमध्ये 30 दिवसांची वैधता आणि डेली 1जीबी डेटा मिळतो.
  • प्लॅनमध्ये कॉलिंगचा फायदा मात्र मिळत नाही कारण हा डेटा रिचार्ज आहे.

टेलीकॉम कंपनी वोडाफोन आयडियानं आपल्या ग्राहकांना भेट देत एक नवीन डेटा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन कंपनीनं 181 रुपयांमध्ये गुपचूप आपल्या वेबसाइटवर डेटा प्लॅन्सच्या कॅटेगरीमध्ये लिस्ट केला आहे. याची खासियत आहे की यात 30 दिवसांची वैधता देखील मिळते. पुढे आम्ही तुम्हाला या प्लॅनची सविस्तर माहिती दिली आहे.

181 रुपयांच्या डेटा प्लॅन

Vodafone idea च्या 181 रुपयांच्या या रिचार्जमध्ये युजर्सना डेली 1जीबी डेटा एकूण 30 दिवसांसाठी मिळेल. याचा अर्थ असा की प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह एकूण 30जीबी डेटा मिळतो. हा एक डेटा प्लॅन असल्यामुळे यात फ्री कॉलिंगचा कोणताही फायदा दिला जात नाही नाही. तसेच कंपनीनं स्पष्ट केले आहे की हा प्लॅन फक्त प्रीपेड युजर्ससाठी आहे आणि बेस प्लॅन सोबतच हा वापरता येईल. हे देखील वाचा: एक्सक्लूसिव्ह: भारतात पुढील महिन्यात येत आहे Realme Narzo N55, मेमरी आणि कलर व्हेरिएंटची माहिती लीक

विशेष म्हणजे कंपनी गेलेलं अनेक दिवस मंथली वैधता आणि 30 दिवसांचे प्लॅन को सादर करत आहे. तुम्हाला आठवत असेल की टेलीकॉम कंपनी वोडाफोन आयडियानं अलीकडेच 296 रुपयांच्या रिचार्ज सादर केला होता. या नवीन प्रीपेड पॅकसह तुम्हाला एकूण 25जीबी सुपरफास्ट इंटरनेट डेटा आणि एकूण 30 दिवसांची वैधत मिळेल. इतकेच नव्हे तर युजर्सना Vi Movies & TV Classic चा अ‍ॅक्सेस दिला जाईल, ज्यात चित्रपट आणि टीव्ही शोचा अनलिमिटिड अ‍ॅक्सेसचा लाभ युजर्स घेऊ शकतात. हे देखील वाचा: Moto G13 4G भारतात लाँच! यात आहे 90Hz डिस्प्ले, MediaTek Helio G85 SoC आणि खूप काही

वाढू शकते विआय प्लॅन्सची किंमत

काही महिन्यांपूर्वी कंपनीचे CEO (Chief Executive Officer), Akshaya Moondra यांनी दिलेल्या एका विधानातुन विआयच्या दरवाढीचा इशारा मिळाला होता. Akshaya Moondra यांनी म्हटलं होतं की टॅरिफ वाढवणे आवश्यक आहे. मूंद्रा यांच्या मते कोणतीही दूरसंचार कंपनी सध्याच्या टॅरिफमधून भांडवली खर्च भरून काढू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की प्रत्येकाला मोबाइल नेटवर्क सेवांचा वापर करण्यासाठी जास्त पैसे देण्याची गरज नाही. परंतु जर युजर जास्त डेटा आणि कॉलिंगचा वापर करत असतील त्यांनी कमी वापर करणाऱ्या युजर्सपेक्षा जास्त पैसे दिले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here