Redmi note 6 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये घडली हि दुर्घटना https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-blast-in-gujarat-india-battery-fire-smoke/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-blast-in-gujarat-india-battery-fire-smoke/#respond Tue, 04 Feb 2020 12:43:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6499 Xiaomi Redmi Note 6 Pro मध्ये ब्लास्ट झाला आणि हि संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली.

The post Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये घडली हि दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हा स्मार्टफोन मध्ये आग लागण्याची एखादी घटना घडते तेव्हा आपण सावध होतो. कारण फोन आपल्या सर्वात जवळ असतो आणि यात सर्वात जास्त शारीरिक नुकसान होण्याची भीती असते. आज पुन्हा एकदा मोबाईल फोन ब्लास्टची घटना समोर आली आहे. हि बातमी गुजरात मधील जामनगर मधून आली आहे जिथे मोबाईल रिपेरिंग शॉप वर एक फोन अचानक ब्लास्ट झाला. फोन Xiaomi चा होता आणि मॉडेल होता Redmi Note 6 Pro. शाओमी फोन ब्लास्ट होण्याची घटना याआधी पण भारतात अनेकदा झाली आहे. आम्हाला जी बातमी मिळाली त्या नुसार ग्राहकाच्या फोन मध्ये काही तरी बिघाड होता आणि तो रिपेयर केला जात होता. जेव्हा फोनचा बॅक पॅनल उघडण्यात आला, तेव्हा अचानक Xiaomi Redmi Note 6 Pro मध्ये ब्लास्ट झाला आणि हि संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली.

हि बातमी सर्वात आधी खबरगुजरात ने प्रकाशित केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया वर या सीसीटीवी मध्ये कैद झालेला वीडियो टाकला आहे. त्याचबरोबर ज्या मोबाईल रिपेरिंग शॉप वर हि घटना घडली तिथल्या एका फेसबुक यूजर कुनाल सोनी याने पण आपल्या फेसबुक अकाउंट वर वीडियो अपडेट केला आहे. त्यांनी वीडियो मध्ये अशी माहिती दिली आहे कि मोबाईल टेक्निशियन किशनने जेव्हा फोन चेक करण्यासाठी तो उघडला तेव्हा बॅक पॅनल उघडल्याने फोन मध्ये धूर येऊ लागला आणि फोन ब्लास्ट झाला. फोन रिपेयरिंगचे काम ध्रुती मोबाईल द्वारे केले जात होते आणि तिथेच हि घटना घडली. फोन मध्ये आग लागताच धूर येऊ लागला आणि गोंधळ उडाला. हा फोन कोणत्या यूजरचा होता आणि यासाठी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे कि नाही याची माहिती अजूनतरी समोर आली नाही. परंतु फोन ब्लास्टच्या बातमीने लोकांना नक्कीच घाबरवले आहे.

Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग, Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये झाली दुर्घटना#RedmiNote6Pro #PhoneBlast

91mobiles मराठी यांनी वर पोस्ट केले मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

Redmi Note 6 Pro मध्ये आग लागल्याचे वीडियो मध्ये स्पष्ट दिसत आहे. बॅक पॅनल उघडताना फोन मधून धूर येऊ लागला. तेव्हा फोन टेक्निशियनच्या हातात होता. घाबरून टेक्निशियनने फोन लगेच काउंटर वर ठेवला आणि धूर वेगाने वाढू लागला. यावेळी मोबाईलचा मालक पण तिथे उभा होता. जेव्हा धूर अचानक वाढला तेव्हा टेक्निशियनने फोन खाली जमिनीवर फेकून दिला.

Kunal Soni यांनी वर पोस्ट केले सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

सुदैवाने Xiaomi Redmi Note 6 Pro टेक्निशियनच्या हातात ब्लास्ट झाला नाही आणि या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. हे प्रकरण समोर आल्यामुळे सर्विस सेंटर वरील लोक Xiaomi ब्रँड आणि त्याच्या प्रोडक्ट वर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. आतापर्यंत याबाबत कंपनीचे कोणतेही विधान आले नाही. एक मोठी दुर्घटना टळली पण आता हे बघावे लागेल कि Xiaomi या घटनेसाठी कोणाला जबाबदार ठरवते सर्विस सेंटर कि एखादी व्यक्ती कि आपल्या प्रोडक्ट्स वर सेफ्टी साठी काही खास काम करेल.

The post Xiaomi फोन मध्ये पुन्हा लागली आग Redmi Note 6 Pro झाला ब्लास्ट, गुजरातच्या सर्विस सेंटर मध्ये घडली हि दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-blast-in-gujarat-india-battery-fire-smoke/feed/ 0
शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या स्मार्टफोन वर मिळत आहे किती सूट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-y2-poco-f1-offer-discount-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-y2-poco-f1-offer-discount-price/#respond Thu, 11 Apr 2019 13:59:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4073 Mi Super Sale मध्ये रेडमी नोट 5 प्रो चे हे दोन्ही वेरिएंट क्रमश: 10,999 रुपये तसेच 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या स्मार्टफोन वर मिळत आहे किती सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने याच महिन्यात आपल्या ‘मी फेस्टिवल’ चे आयोजन केले होते. हा फेस्टिवल 4 एप्रिल पासून सुरु होऊन 6 एप्रिल पर्यंत चालला होता ज्यात फक्त शाओमी स्मार्टफोन डिस्काउंट वर विकले गेले नव्हते तर अनेक ऑफर्स अंतर्गत मी फॅन्स गिफ्ट व फ्री प्रोडक्ट पण मिळाले. एका महिन्यात आपल्या इंडियन फॅन्सना अजून एक भेट देत शाओमी ने आज पासून ‘मी सुपर सेल’ चे आयोजन केले आहे. जर तुम्ही पण एखादा शाओमी फोन घेऊ इच्छित असाल तर हीच योग्य वेळ आहे तो फोन कमी किंमतीत घेण्याची.

शाओमी मी सुपर सेल
Xiaomi ने आज ‘मी सुपर सेल’ ची सुरवात केली आहे. हा खास सेल 3 दिवस आयोजित करण्यात आला आहे जो आज 11 एप्रिल पासून सुरु होऊन 13 एप्रिल पर्यंत चालेल. Xiaomi Mi Super Sale मध्ये शाओमी प्रोडक्ट खूप कमी किंमतीत आणि भारी डिस्काउंट वर मिळत आहेत. या सेल मध्ये कंपनीने शाओमीच्या रेडमी सीरीजच्या नवीन व अन्य स्मार्टफोन्स सह पोको ब्रँड फोनचा पण समावेश केला आहे. या सेल मध्ये शाओमी स्मार्टफोन थेट 2,000 पर्यंतची सूट मिळत आहे.

इतका मिळेल डिस्काउंट
सर्वात आधी पोकोफोन बद्दल बोलायचे तर शाओमी ‘मी सुपर सेल’ मध्ये Poco F1 च्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट वर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. डिस्काउंट नंतर पोको एफ1 चा हा वेरिएंट 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Redmi Note 5 Pro चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट आणि 6जीबी रॅम व 64जीबी वेरिएंट पण 2,000 रुपये स्वस्तात विकत घेता येईल. ​सूटीनंतर Mi Super Sale मध्ये रेडमी नोट 5 प्रो चे हे दोन्ही वेरिएंट क्रमश: 10,999 रुपये तसेच 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

हे देखील वाचा: Realme 3 Pro च्या लॉन्च डेटचा खुलासा, 22 एप्रिलला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन

Mi Super Sale मध्ये शाओमी Redmi Note 6 Pro च्या 6जीबी रॅम व 64जीबी वेरिएंट वर 2,000 रुपयांची सूट देत आहे ज्यामुळे हा वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. तसेच Redmi 6 Pro वर कंपनी कडून 1,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या सूटीनंतर रेडमी 6 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी वेरिएंट 9,999 रुपये तर 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Mi Super Sale मध्ये 7,999 रुपयांचा Redmi 6 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 6,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. तसेच कंपनी Redmi Y2 स्मार्टफोन वर पण 1,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या सेल मध्ये रेडमी वाई2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 7,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: 4,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंग Galaxy A70

विशेष म्हणजे Xiaomi ने फक्त एका महिन्यात देशात रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो चे 10,00,000 यूनिट विकले आहेत. इंडियन मार्केट मध्ये रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच रेडमी नोट 7 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तथा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. हे दोन्ही फोन मी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट वर फ्लॅश मध्ये मिळतात.

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या स्मार्टफोन वर मिळत आहे किती सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-y2-poco-f1-offer-discount-price/feed/ 0
शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या फोन वर मिळेल किती डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-6a-redmi-y2-mi-a2-discount-offer-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-6a-redmi-y2-mi-a2-discount-offer-price/#respond Mon, 25 Mar 2019 12:15:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3921 28 मार्च पर्यंत हे स्मार्टफोन्स फक्त कमी किंमतीत विकत घेता येतील असे नाही तर सोबत एक्सचेंज ऑफर आणि फोनच्या खरेदीवर कॅशबॅक पण मिळेल

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या फोन वर मिळेल किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी आज भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रान्ड बनला आहे. या कंपनीच्या स्मार्टफोन लॉन्च सोबत यशाचे नवीन विक्रम पण बनतात. कमी किंमत आणि शानदार स्पेसिफिकेशन्सनी शाओमीला वर आणले आहे. शाओमी पण आपल्या फॅन्सची विशेष काळजी घेते आणि वेळोवेळी ऑफर्स व सेलचे आयोजन करते. होळी झाल्यांनतर पण शाओमी आपल्या इंडियन फॅन्ससाठी शानदार भेट घेऊन आली आहे. शाओमीने ‘मी सुपर सेल’ चे आयोजन केले आहे, ज्यात कंपनीचे अनेक स्मार्टफोन डिस्काउंट आणि ऑफर्स सह सेल साठी उपलब्ध झाले आहेत.

मी सुपर सेल
शाओमीने ‘मी सुपर सेल’ चे आयोजन केले आहे. मी सुपर सेल आज म्हणजे 25 मार्च पासून सुरु झाला आहे जो 28 मार्च पर्यंत चालेल. या चार दिवसीय सेल मध्ये शाओमी ने मी सीरीज आणि रेडमी सीरीज अंतर्गत लॉन्च झालेल्या अनेक शानदार स्मार्टफोन्सचा समावेश केला आहे जे भरभक्कम डिस्कांउट सह सेल साठी उपलब्ध होतील. 28 मार्च पर्यंत हे स्मार्टफोन्स फक्त कमी किंमतीत विकत घेता येतील असे नाही तर सोबत एक्सचेंज ऑफर आणि फोनच्या खरेदीवर कॅशबॅक पण मिळेल.

इथे मिळतील स्वस्त फोन
शाओमी द्वारा आयोजित मी सुपर सेल आज सुरु होऊन 28 मार्च पर्यंत चालेल आणि यात कंपनीच्या अधिकृत वेबसाइट मी डॉट कॉम वर शाओमी फोन्स ऑफर्स अंतर्गत विकत घेता येतीलच. सोबत शापिंग साइट अमेझॉन इंडिया तसेच फ्लिपकार्ट वर पण शाओमी स्मार्टफोन डिस्काउंट व अन्य ऑफर्स सह सेल साठी उपलब्ध होतील. लक्षात ठेवा मी सुपर सेल फक्त आनलाईन प्लॅटफॉर्म वरच आयोजित करण्यात आला आहे जो मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल.

हे स्मार्टफोन मिळतील स्वस्त
मी सुपर सेल मध्ये रेडमी नोट 6 प्रो चा 6जीबी रॅम वेरिएंट 2,000 रुपये स्वस्त विकत घेता येईल तसेच 4जीबी रॅम वेरिएंट 1,000 रुपये कमी किंमतीत विकत घेता येईल. या फोनचा 6जीबी रॅम 15,999 तसेच 4जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण मी सुपर सेल अंतर्गत फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

त्याचप्रमाणे शाओमीचा रेडमी 6ए स्मार्टफोन पण मी सुपर सेल मध्ये डिस्काउंटेड प्राइज वर विकत घेता येईल. या सेल मध्ये रेडमी 6ए चा 2जीबी रॅम व 16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल तर 2जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मी सुपर सेल मध्ये शाओमी मी ए2 चा 4जीबी रॅम 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर मी ए2 अमेझॉन से एक्सचेंज ऑफर मध्ये विकत घेतल्यास 2,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळेल.

मी सुपर सेल मध्ये शाओमी रेडमी नोट 5 प्रो चे सर्व वेरिएंटच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. ​रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण मी सुपर सेल अंतर्गत हा वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे 15,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट 5 प्रो चा 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

रेडमी वाई2 चा 3जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला तर 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली होती. पण मी सुपर सेल मध्ये फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपये तथा 4जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे शाओमी रेडमी 6 चा 32जीबी स्टोरेज वेरिंएट शाओमी मी सुपर सेल मध्ये 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर फोनचा 64जीबी वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या फोन वर मिळेल किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-6a-redmi-y2-mi-a2-discount-offer-price/feed/ 0
शाओमी ने केली ‘मी डेज’ ची सुरवात, 5,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील कंपनीचे स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-days-redmi-note-6-pro-note-5-pro-redmi-6-poco-f1-flipkart-sale-price-discount-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-days-redmi-note-6-pro-note-5-pro-redmi-6-poco-f1-flipkart-sale-price-discount-in-marathi/#respond Mon, 28 Jan 2019 09:17:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3470 पोको एफ1 चा सर्वात मोठा मॉडेल 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी ने केली ‘मी डेज’ ची सुरवात, 5,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील कंपनीचे स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड बनली आहे. स्वस्तात मिळणारे या कंपनीचे स्मार्टफोन पावरफुल स्पेशिफिकेशन्सने सुसज्ज असतात जे सामान्य जनतेच्या बजेट मध्ये फिट बसतात. आपल्या फॅन्सना अजून एकभेट देत शाओमी ने ‘मी डेज’ ची सुरवात केली आहे. या सेल मध्ये शाओमी ने आपला हिट स्मार्टफोन वर डिस्काउंट ऑफर सुरु केली आहे ज्यात रेडमी नोट 6 प्रो, रेडमी 6 व रेडमी नोट 5 प्रो सोबतच पोको एफ1 चा पण समावेश आहे. मी डेज मध्ये शाओमी स्मार्टफोन्स 5,000 रुपयांपर्यंच्या डिस्कॉउंटसह विकत घेता येतील.

शाओमी मी डेजचे आयोजन शॉपिंग साइट​ फ्लिपकार्ट वर केले गेले आहे. मी डेजची सुरवात आज पासून झाली आहे जे 3 दिवस चालतील. 30 जानेवारी पर्यंत रेडमी नोट 6 प्रो, रेडमी 6, रेडमी नोट 5 प्रो आणि पोको एफ1 डिस्काउंटेड प्राइज वर विकत घेता येतील. सर्वात आधी पोको एफ1 पाहता मी डेज मध्ये पोको एफ1 चा सर्वात मोठा मॉडेल 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मॉडेल 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरीला सपोर्ट करतो.

पोको एफ1 चा 23,999 रुपयांचा 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वॉल वेरिएंट मी डेज अंतर्गत 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वाला पोको एफ1 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रेडमी नोट 6 प्रो बद्दल बोलायचे तर फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनी ने 13,999 रुपयांच्या किंमतीती लॉन्च केला होता तर मी डेज मध्ये हा 12,999 रुपयांमध्ये घेता येतो.

रेडमी नोट 6 प्रो चा 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट मी डेज मध्ये 1,000 रुपयांच्या सुटीसह फक्त 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये त्याचबरोबर 15,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

मी डेज सेल मध्ये तीन दिवस रेडमी 6 स्मार्टफोन डिस्काउंट छूट सह सेल साठी उपलब्ध असेल. या सेल मध्ये रेडमी 6 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच फोनचा 3जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 8,499 रुपयांमध्ये मिळेल.
शाओमी मी डेज मधून फोन विकत घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post शाओमी ने केली ‘मी डेज’ ची सुरवात, 5,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील कंपनीचे स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-days-redmi-note-6-pro-note-5-pro-redmi-6-poco-f1-flipkart-sale-price-discount-in-marathi/feed/ 0
शाओमीचा धमाका : रेडमी नोट 6 प्रो भारतात लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 4,000एमएएच बॅटरी आणि 4 कॅमेरा सेंसर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-india-launch-feature-specifications-price-sale-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-india-launch-feature-specifications-price-sale-in-marathi/#respond Thu, 22 Nov 2018 12:22:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2945 रेडमी नोट 6 प्रो फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव फोन आहे जो उद्यापासून या शॉ​पिंग साइट वर आपल्या पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमीचा धमाका : रेडमी नोट 6 प्रो भारतात लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 4,000एमएएच बॅटरी आणि 4 कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी इंडिया ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपली रेडमी 6 सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन फोन रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले होते. हे तिन्ही फोन थोड्याच काळात शाओमीच्या हिट स्मार्टफोन्सच्या श्रेणीत सामील झाले आहेत तसेच शानदार स्पेसिफिकेशन्स व कमी किंमतीती मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. हे यश एक पाऊल अजून पुढे नेत शाओमी ने आज दीर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या फॅन्सना भेट देत भारतात अजून एक नवीन डिवाईस रेडमी नोट 6 प्रो लॉन्च केला आहे.

रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीयूआई 9.6 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 14एनएम कोरयो 260 सीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

रेडमी नोट 6 प्रो शाओमी ने भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. एक वेरिएंट 6जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. तसेच ग्राफिक्स साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये एड्रेनो 509 जीपीयू देण्यात आला आहे.

शाओमी च्या या नवीन नोट डिवाईस मध्ये 4 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. म्हणजे या फोनच्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा ​डुअल पिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रेडमी नोट 6 प्रो मध्ये एआई टेक्नॉलिजी आहे. हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत डुअल सिम आणि 4जी वोएलटीईला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. अशाप्रकारे पावर बॅकअप साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये शाओमी ने फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो चा 4जीबी रॅम वेरिएंट कंपनी ने 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रेडमी नोट 6 प्रो फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव फोन आहे जो उद्यापासून या शॉ​पिंग साइट वर आपल्या पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमीचा धमाका : रेडमी नोट 6 प्रो भारतात लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 4,000एमएएच बॅटरी आणि 4 कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-india-launch-feature-specifications-price-sale-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह 22 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-to-launch-in-india-on-22-november-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-to-launch-in-india-on-22-november-in-marathi/#respond Thu, 15 Nov 2018 13:18:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2872 हा 22 नोव्हेंबरला लॉन्च होणार फोन गेल्या महिन्यात थाईलँड मध्ये लॉन्च झालेला रेडमी 6 प्रो असू शकतो.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह 22 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी इंडिया ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपली रेडमी 6 सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन फोन रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले होते. हे तिन्ही फोन थोड्याच काळात शाओमीच्या हिट स्मार्टफोन्सच्या श्रेणीत सामील झाले आहेत तसेच शानदार स्पेसिफिकेशन्स व कमी किंमतीती मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. हे यश एक पाऊल अजून पुढे नेण्याची तयारी शाओमी करत आहे. शाओमी ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 22 नोव्हेंबरला भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. शाओमीचा हा नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 6 प्रो असेल.

शाओमी इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवत सांगतिले आहे कि कंपनी 22 नोव्हेंबरला राजधानी दिल्लीत एका ईवेंटचे आयोजन करणार आहे. कंपनी ने यादिवशी कोणता फोन लॉन्च होईल हे सांगितले नाही पण हा 22 नोव्हेंबरला लॉन्च होणार फोन गेल्या महिन्यात थाईलँड मध्ये लॉन्च झालेला रेडमी 6 प्रो असू शकतो. शाओमी ने मीडिया इन्वाईट मध्ये ‘द न्यू नोट राईज‘ टॅगलाईन वापरली आहे ज्यावरून स्पष्ट होते कि कंपनीचा आगामी फोन नोट सीरीज मध्येच येईल.

शाओमी ने रेडमी नोट 6 प्रो थाईलँड मध्ये लॉन्च केला आहे तिथे फोनची किंमत 6,990 थाई भाट म्हणजे भा​रतीय करंसी नुसार जवळपास 15,599 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता रेडमी नोट 6 प्रो च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा ​डुअल पिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीयूआई 9.6 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 14एनएम कोरयो 260 सीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

कंपनी नवे रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह सादर केला आहे सोबत ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 509 जीपीयू आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. रेडमी नोट 6 प्रो मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.भारतात फोनची किंमत काय असेल तसेच हा कधी सेल साठी उपलब्ध होईल या माहितीसाठी 22 नोव्हेंबरची वाट बघावी लागेल.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह 22 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-to-launch-in-india-on-22-november-in-marathi/feed/ 0
4 कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी सह शाओमी रेडमी नोट 6 प्रो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-launched-4-camera-sensor-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-launched-4-camera-sensor-feature-specifications-price-in-marathi/#respond Thu, 27 Sep 2018 14:17:15 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2293 शाओमी रेडमी नोट 6 प्रो थायलंड मध्ये ब्लॅक, ब्लू आणि रोज गोल्ड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. शाओमी ने अजूनतरी फोनच्या ग्लोबल लॉन्च ची घोषणा केलेली नाही.

The post 4 कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी सह शाओमी रेडमी नोट 6 प्रो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने नुकतीच इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आपला धाक कायम ठेवत रेडमी 6 सीरीज सादर केली आहे. कंपनी ने एक साथ तीन स्मार्टफोन लॉन्च केले होते, ज्यात रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो यांचा समावेश होता. आज शाओमी ने अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला नवीन डिवाईस रेडमी नोट 6 प्रो पण लॉन्च केला आहे. रेडमी नोट 6 प्रो कंपनी ने 4 कॅमेरा सेंसर सह बाजारात आणला आहे. शाओमी ने रेडमी नोट 6 प्रो सध्या थायलंड मध्ये लॉन्च केला आहे तिथे या फोनची किंमत 6,990 थाई भाट म्हणजे भा​रतीय करंसी नुसार जवळपास 15,599 रुपये ठेवण्यात आली आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो ची सर्वात मोठी खासियत फोनचा कॅमेरा सेग्मेंट आहे. रेडमी नोट 6 प्रो च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कामेरर देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा ​डुअल पिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीयूआई 9.6 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 14एनएम कोरयो 260 सीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

कंपनी नवे रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम सह सादर केला आहे सोबत ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 509 जीपीयू आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. रेडमी नोट 6 प्रो मध्ये एआई टेक्नॉलॉजी आहे. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात अली आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो थायलंड मध्ये ब्लॅक, ब्लू आणि रोज गोल्ड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. शाओमी ने अजूनतरी फोनच्या ग्लोबल लॉन्च ची घोषणा केलेली नाही. त्यामुळे शाओमी आपला हा फोन भारतात कधी घेऊन येईल हॆ सांगता येत नाही.

The post 4 कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी सह शाओमी रेडमी नोट 6 प्रो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-launched-4-camera-sensor-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी नोट 6 प्रो बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट, जल्द होने वाला है लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-listed-on-geekbench-with-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-listed-on-geekbench-with-specifications-in-marathi/#respond Tue, 25 Sep 2018 13:15:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2258 आता शाओमीचा हा आगामी स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग नंतर पुन्हा एकदा फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आल आहेत आणि त्यामुळे रेडमी नोट 6 प्रो लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली आहे.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट, जल्द होने वाला है लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी बद्दल नुकताच एक मोठा लीक समोर आला होता ज्यात रेडमी नोट 6 प्रो चा फोटो इंटरनेट वर वायरल झाला आहे. या लीक मधून फक्त फोनच्या डिजाईन आणि लुकची माहिती मिळाली नव्हती तर सोबतच फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समजले होते. आता शाओमीचा हा आगामी स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग नंतर पुन्हा एकदा फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आल आहेत आणि त्यामुळे रेडमी नोट 6 प्रो लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो गीकबेंच वर याच नावाने लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंच स्कोर पाहता बेंचमार्किंग साइट ने ​रेडमी नोट 6 प्रो ला सिंगल-कोर मध्ये 1332 स्कोर दिला आहे तर हा फोनला मल्टी-कोर मध्ये 4675 स्कोर मिळाला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग 24 सप्टेंबरच्या दुपरिचिया आहे. या लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि ​रेडमी नोट 6 प्रो एंडरॉयड 8.1.0 ओरियो सह सादर केला जाईल.

गीकबेंच नुसार रेडमी नोट 6 प्रो 1.61गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टाकोर प्रोसेसर सह सादर केला जाईल ज्या सोबत हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेले. बेंच​मार्किंग साइट ​रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4जीबी रॅम सांगण्यात आला आहे. तसेच आधी आलेल्या लीक नुसार हा फोन 6जीबी रॅम आणि 3जीबी/32जीबी च्या वरिएंट मध्ये पण सादर केला जाईल.

लीक वरून समजले आहे कि रेडमी नोट 6 प्रो 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह नॉच डिस्प्ले सह सादर केला जाईल. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा डुअल ​रियर कॅमेरा सेटअप असेल तसेच लीक नुसार फोनच्या फ्रंट पॅनल वर 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन सेल्फी कॅमेरा देण्यात येतील.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. जरी शाओमी ने अजून रेडमी नोट 6 प्रो बद्दल कोणतीही आॅफिशियल घोषणा केली नसली तरी गीकबेंच च्या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि शाओमी आपला हा फोन लवकरच अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च करेल.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट, जल्द होने वाला है लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-listed-on-geekbench-with-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी नोट 6 प्रो मध्ये असतील 4 कॅमेरा सेंसर, 4,000एमएएच बॅटरी आणि नॉच डिस्प्ले सह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-live-image-retail-box-leaked-4gb-ram-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-live-image-retail-box-leaked-4gb-ram-specifications-in-marathi/#respond Mon, 17 Sep 2018 08:26:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2141 शाओमी रेडमी नोट 6 बद्दल आधी पण लीक्स समोर आले आहेत आता शाओमी रेडमी नोट 6 प्रो स्मार्टफोनचा खरा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला आहे.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो मध्ये असतील 4 कॅमेरा सेंसर, 4,000एमएएच बॅटरी आणि नॉच डिस्प्ले सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने नुकतीच भारतीय बाजारात आपली रेडमी सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन स्मार्टफोन रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले आहेत. तसेच आता शाओमी अंर्तराष्ट्रीय मंचावर पण लवकरच आपल्या रेडमी नोट सीरीजचा विस्तार करणार आहे. शाओमी रेडमी नोट 6 बद्दल आधी पण लीक्स समोर आले आहेत आता शाओमी रेडमी नोट 6 प्रो स्मार्टफोनचा खरा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला आहे. रेडमी नोट 6 प्रो चे फोटो समोर आल्यामुळे फक्त फोन लवकरच लॉन्च होणार असल्याचे समोर येत नाही तर याच्या डिजाईन आणि स्पेसिफिशन्सची माहिती पण मिळाली आहे. की

शाओमी रेडमी नोट 6 प्रो ची लाईव इमेज विदेशी वेबसाइट रेड्डीट ने शेयर केली आहे. वेबसाइट वर फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे सोबतच फोन बॉक्स च्या मागील भागाचा फोटो शेयर करण्यात आला आहे. फोटो मध्ये फोन अगदी नवीन दिसत आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वरून प्लास्टिक स्क्रीन पण काढण्यात आली नाही. डिस्प्ले वरील या प्लास्टिक वर शाओमी च्या लोगो सोबत ‘रेडमी नोट 6 प्रो’ लिहिण्यात आले आहे.

लीक वरून समजले आहे की रेडमी नोट 6 प्रो 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह सादर केला जाईल, म्हणजे फोन मध्ये नॉच असेल. तसेच फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. फोटो वरून हे स्पष्ट झाले आहे की रेडमी नोट 6 प्रो मध्ये शाओमी 4 कॅमेरा सेंसर देईल. समोर आलेल्या रेडमी नोट 6 प्रो चा बॉक्स 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट चा आहेत तसेच फोटो मधील फोन ब्लॅक कलर वेरिएंट आहे.

रेडमी नोट 6 प्रो च्या बॅक पॅनल वर डुअल ​रियर कॅमेरा देण्यात येईल तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी पण रेडमी नोट 6 प्रो च्या फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर मिळतील. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा डुअल ​पिक्सल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो तसेच लीक नुसार फोनच्या फ्रंट पॅनल वर 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन सेल्फी कॅमेरा देण्यात येतील.

समोर आलेल्या फोटो वरून समजले आहे की रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात येईल. तसेच फोटो मधील फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. बोलले जात आहे की शाओमी रेडमी नोट 6 प्रो 4जीबी रॅम सोबत 6जीबी रॅम आणि 3जीबी/32जीबी च्या वेरिएंट मध्ये पण सादर केला जाऊ शकतो. आशा आहे की शाओमी आता लवकरच हा फोन जगासमोर ठेऊन रेडमी नोट 6 प्रो आॅफिशियली लॉन्च करेल.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो मध्ये असतील 4 कॅमेरा सेंसर, 4,000एमएएच बॅटरी आणि नॉच डिस्प्ले सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-live-image-retail-box-leaked-4gb-ram-specifications-in-marathi/feed/ 0