शाओमीचा धमाका : रेडमी नोट 6 प्रो भारतात लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 4,000एमएएच बॅटरी आणि 4 कॅमेरा सेंसर

शाओमी इंडिया ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपली रेडमी 6 सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन फोन रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले होते. हे तिन्ही फोन थोड्याच काळात शाओमीच्या हिट स्मार्टफोन्सच्या श्रेणीत सामील झाले आहेत तसेच शानदार स्पेसिफिकेशन्स व कमी किंमतीती मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. हे यश एक पाऊल अजून पुढे नेत शाओमी ने आज दीर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या फॅन्सना भेट देत भारतात अजून एक नवीन डिवाईस रेडमी नोट 6 प्रो लॉन्च केला आहे.

रेडमी नोट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन मीयूआई 9.6 आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 14एनएम कोरयो 260 सीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

रेडमी नोट 6 प्रो शाओमी ने भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. एक वेरिएंट 6जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. तसेच ग्राफिक्स साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये एड्रेनो 509 जीपीयू देण्यात आला आहे.

शाओमी च्या या नवीन नोट डिवाईस मध्ये 4 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. म्हणजे या फोनच्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा ​डुअल पिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रेडमी नोट 6 प्रो मध्ये एआई टेक्नॉलिजी आहे. हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत डुअल सिम आणि 4जी वोएलटीईला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. अशाप्रकारे पावर बॅकअप साठी रेडमी नोट 6 प्रो मध्ये शाओमी ने फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो चा 4जीबी रॅम वेरिएंट कंपनी ने 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रेडमी नोट 6 प्रो फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव फोन आहे जो उद्यापासून या शॉ​पिंग साइट वर आपल्या पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here