शाओमी रेडमी नोट 6 प्रो बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट, जल्द होने वाला है लॉन्च

शाओमी बद्दल नुकताच एक मोठा लीक समोर आला होता ज्यात रेडमी नोट 6 प्रो चा फोटो इंटरनेट वर वायरल झाला आहे. या लीक मधून फक्त फोनच्या डिजाईन आणि लुकची माहिती मिळाली नव्हती तर सोबतच फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समजले होते. आता शाओमीचा हा आगामी स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग नंतर पुन्हा एकदा फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आल आहेत आणि त्यामुळे रेडमी नोट 6 प्रो लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो गीकबेंच वर याच नावाने लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंच स्कोर पाहता बेंचमार्किंग साइट ने ​रेडमी नोट 6 प्रो ला सिंगल-कोर मध्ये 1332 स्कोर दिला आहे तर हा फोनला मल्टी-कोर मध्ये 4675 स्कोर मिळाला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग 24 सप्टेंबरच्या दुपरिचिया आहे. या लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि ​रेडमी नोट 6 प्रो एंडरॉयड 8.1.0 ओरियो सह सादर केला जाईल.

गीकबेंच नुसार रेडमी नोट 6 प्रो 1.61गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टाकोर प्रोसेसर सह सादर केला जाईल ज्या सोबत हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेले. बेंच​मार्किंग साइट ​रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4जीबी रॅम सांगण्यात आला आहे. तसेच आधी आलेल्या लीक नुसार हा फोन 6जीबी रॅम आणि 3जीबी/32जीबी च्या वरिएंट मध्ये पण सादर केला जाईल.

लीक वरून समजले आहे कि रेडमी नोट 6 प्रो 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह नॉच डिस्प्ले सह सादर केला जाईल. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा डुअल ​रियर कॅमेरा सेटअप असेल तसेच लीक नुसार फोनच्या फ्रंट पॅनल वर 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन सेल्फी कॅमेरा देण्यात येतील.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. जरी शाओमी ने अजून रेडमी नोट 6 प्रो बद्दल कोणतीही आॅफिशियल घोषणा केली नसली तरी गीकबेंच च्या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि शाओमी आपला हा फोन लवकरच अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here