Redmi Note 7S - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi Redmi Note 7S मध्ये लागली आग, महाराष्ट्रात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7s-caught-fire-in-thane-maharashtra-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7s-caught-fire-in-thane-maharashtra-india/#respond Wed, 20 Nov 2019 07:14:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5815 हि घटना जेव्हा Xiaomi ला समजली, तेव्हा ते म्हणाले कि, ‘ते बदल्यात नवीन स्मार्टफोन देऊ शकत नाहीत’.

The post Xiaomi Redmi Note 7S मध्ये लागली आग, महाराष्ट्रात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल फोन मध्ये आग लागणे आणि बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना समोर येत असतात. काही दुर्घटनांचे कारण यूजरची चूक असते, ज्यामुळे प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याला नवीन शिकवण मिळते. जेव्हा चूक यूजरची असते तेव्हा त्याला समजावले जाते, पण जेव्हा कोणतीही चूक नसताना तुमच्या स्मार्टफोनला आग लागली तर काय होईल? आणि त्यापेक्षाही मोठी बाब म्हणजे फोन विकत घेऊन फक्त एक महीनाच झाला असेल आणि ब्रँड न्यू स्मार्टफोन मध्ये ठेवल्या जागी आग लागली तर? अशीच एक घटना महाराष्टातून समोर आली आहे जिथे एका तरुणाच्या नव्या कोऱ्या स्मार्टफोनला आग लागली. आणि तो स्मार्टफोन होता Xiaomi चा Redmi Note 7S!

Xiaomi Redmi Note 7S ला आग लागण्याची घटना ठाणे जिल्ह्यातील आहे. Redmi Note 7S चा वापर ईश्वर चव्हाण नावाचा यूजर करत होता. चव्हाण यांच्यानुसार गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबरला त्याने स्वतःसाठी नवीन Xiaomi Redmi Note 7S आर्डर केला होता. ऑनलाईन शॉपिंग साइटवरून फोन मागवल्यानंतर Redmi Note 7S ऑक्टोबरच्या तीन तारखेला तारीख त्याला मिळाला. ईश्वर एक महिनाभर कोणत्याही अडचणीविना आपला शाओमी स्मार्टफोन वापरत होता.

पण 3 नोव्हेंबरला जेव्हा ईश्वर आपल्या ऑफिस मध्ये काम करत होता तेव्हा त्याला अचानकपणे काहीतरी जळाल्याचा वास आला. जेव्हा त्याने आजूबाजूला बघितले तेव्हा बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या त्याच्या Redmi Note 7S स्मार्टफोन मधून धूर येत होता. बघता बघता त्याच्या फोन मध्ये आग लागली. काही लक्षात येण्याआधी त्याच्या फोनचा प्लास्टिक कवर वितळून गेला होता आणि फोन खूप गरम असल्यामुळे उचलता पण येत नव्हता.

ईश्वरचे नशीब चांगले होते म्हणून Redmi Note 7S स्मार्टफोनला फक्त आग लागली पण त्याचा स्फोट झाला. जर फोन मध्ये स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना झाली असती. सुदैवाने ईश्वर किंवा आजूबाजूच्या इतर कोणालाही कोणतीही हानी झाली नाही. ईश्वरने स्पष्ट केले कि त्याने फोन चार्जिंगला लावला नव्हता किंवा फोन कुठेही पडला नव्हता. आग लागली तेव्हा फोन बाजूला ठेवलेले होता, तो फोन कोणी वापरत पण नव्हतं.

फोन जळाल्यामुले ईश्वराला आपला सिम कार्ड पण काढता आले नाही. Redmi Note 7S ला आग लागल्याची हि घटना जेव्हा Xiaomi ला समजली, तेव्हा ते म्हणाले कि, ‘ते बदल्यात नवीन स्मार्टफोन देऊ शकत नाहीत’. Xiaomi कडून मिळालेल्या या प्रतिसादामुळे फक्त ईश्वर नाही तर इतर शाओमी व रेडमी फोन यूजर्सना पण मोठा धक्का बसला आहे.

Source : gizchina

The post Xiaomi Redmi Note 7S मध्ये लागली आग, महाराष्ट्रात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7s-caught-fire-in-thane-maharashtra-india/feed/ 0
Redmi Note 7 Pro ठरला मानकरी, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीती बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-is-the-best-selling-smartphone-above-rs-10000/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-is-the-best-selling-smartphone-above-rs-10000/#respond Thu, 29 Aug 2019 13:13:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5168 ग्लोबली Redmi Note 7 सीरीजचे दोन कोटींपेक्षा जास्त हँडसेट विकले गेले आहेत

The post Redmi Note 7 Pro ठरला मानकरी, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीती बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने यावर्षी भारतात सादर केलेला Redmi Note 7 Pro लॉन्च पासूनच नवनवीन रेकॉर्ड करत आहे. तर आता ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म (IDC) च्या रिपोर्ट नुसार Redmi Note 7 Pro भारतात 10,000+ च्या कॅटगरी मध्ये बेस्ट सेलिंग स्मार्टफोन आहे.

ग्लोबल मार्केट मध्ये 6 महिन्यांपूर्वी हा फोन सादर केला गेला होता. शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन ने नुकतेच ट्विट करून याचा आनंद व्यक्त केला आहे. तसेच कंपनीने खाई दिवसांपूर्वी सांगितले होते कि ग्लोबली Redmi Note 7 सीरीजचे दोन कोटींपेक्षा जास्त हँडसेट विकले गेले आहेत, ज्यात Redmi Note 7, Redmi Note 7S आणि Redmi Note 7 Pro चा समावेश आहे.

कंपनीने भारतात काही दिवसांपूर्वी Redmi Note 7 बंद करून Redmi Note 7s लॉन्च केला होता. आता कंपनी Redmi Note 7s आणि Redmi Note 7 Pro स्मार्टफोन विकत आहे.

Redmi Note 7s आणि Redmi Note 7 Pro चे स्पेसिफिकेशंस पाहता दोन्ही स्मार्टफोन एक सारखे आहेत. दोन्ही फोन मध्ये तुम्हाला 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले नॉच सह मिळतो. तसेच Redmi Note 7s स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आहे जो 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज सह येतो. तर Redmi Note 7 Pro स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 675 एसओसी सह येतो ज्यात 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज आहे.

फोटोग्राफी साठी दोन्ही स्मार्टफोनच्या मागे 48-मेगापिक्सल + 5 मेगिपिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप आहे. पण या दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात थोडा फरक आहे. Redmi Note 7s मध्ये सॅमसंगचा ISOCELL GM1 सेंसर आहे तर Redmi Note 7 Pro मध्ये सोनी IMX586 सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे ज्यात यूएसबी टाइप-सी सह 18 वॉट ची फास्ट चार्जिंग आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो वीडियो

The post Redmi Note 7 Pro ठरला मानकरी, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीती बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-is-the-best-selling-smartphone-above-rs-10000/feed/ 0
Xiaomi ने केली कमाल, फक्त 6 महिन्यांत विकले 1.5 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-globally-sells-15-million-devices-of-redmi-note-7-series-smartphones/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-globally-sells-15-million-devices-of-redmi-note-7-series-smartphones/#respond Wed, 10 Jul 2019 11:30:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4770 तुम्ही भाग्यशाली असाल तर Redmi Note 7S किंवा Redmi Note 7 Pro पैकी कोणताही एक फोन तुम्हाला मोफत मिळू शकतो.

The post Xiaomi ने केली कमाल, फक्त 6 महिन्यांत विकले 1.5 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात शाओमी आपली वेगळी ओळख बनवण्यात आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाली आहे. कंपनीने फक्त 6 महिन्यांत ग्लोबली रेडमी नोट 7 सीरीजचे 1.5 कोटी पेक्षा जास्त स्मार्टफोन विकण्यात यश मिळवले आहे यावरूनच याचा अंडज लावता येतो.

शाओमीचे इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी याची माहिती देत ट्विट केले आहे. तसेच हा आनंद साजरा करण्यासाठी कंपनीने मोफत Redmi Note 7 Pro व Redmi Note 7s देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी तुम्हाला मनु कुमार जैन यांच्या ट्विटला रीट्वीट करावे लागेल. जर तुम्ही भाग्यशाली असाल तर Redmi Note 7S किंवा Redmi Note 7 Pro पैकी कोणताही एक फोन तुम्हाला मोफत मिळू शकतो. Redmi Note 7 Pro ची सुरवाती किंमत 13,999 रुपये आणि अलीकडेच लॉन्च केलेल्या Redmi Note 7s स्मार्टफोनची 10,999 रुपये आहे.

हे देखील वाचा: जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला Nokia 9 भारतात झाला लॉन्च, बघा किंमत आणि लॉन्च ऑफर्स

विशेष म्हणजे कंपनीने काही दिवसांपूर्वी Redmi Note 7 डिस्कंटीन्यू करत Redmi Note 7s लॉन्च केला होता. आता कंपनी Redmi Note 7s आणि Redmi Note 7 Pro स्मार्टफोन विकत आहे.

Redmi Note 7s आणि Redmi Note 7 Pro चे स्पेसिफिकेशंस पाहता दोन्ही स्मार्टफोन एकसारखेच आहेत. दोन्ही फोन मध्ये तुम्हाला 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले नॉच सह मिळेल. तसेच Redmi Note 7s स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आहे जो 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज सह येतो. तसेच Redmi Note 7 Pro स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 675 एसओसी सह येतो ज्यात 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम सह 128जीबी ची स्टोरेज आहे.

हे देखील वाचा: Galaxy A50s फोन पण लॉन्च करेल Samsung, बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट

फोटोग्राफी साठी दोन्ही स्मार्टफोनच्या मागे 48-मेगापिक्सल + 5 मेगिपिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. पण या दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात थोडा फरक आहे. Redmi Note 7s मध्ये सॅमसंगचा ISOCELL GM1 सेंसर आहे तर Redmi Note 7 Pro मध्ये सोनी IMX586 सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे ज्यात यूएसबी टाइप-सी सह 18 वॉटची फास्ट चार्जिंग आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो वीडियो

The post Xiaomi ने केली कमाल, फक्त 6 महिन्यांत विकले 1.5 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-globally-sells-15-million-devices-of-redmi-note-7-series-smartphones/feed/ 0
Xiaomi फॅन्ससाठी खुशखबर : Redmi Note 7S ची आता बघावी लागणार नाही वाट, ओपन सेल झाला सुरु https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-redmi-note-7s-open-sale-starts-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-redmi-note-7s-open-sale-starts-price-specifications/#respond Thu, 30 May 2019 18:38:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4467 30 मे च्या रात्री 12 च्या नंतर हा फोन ओपेन सेल साठी उपलब्ध होईल

The post Xiaomi फॅन्ससाठी खुशखबर : Redmi Note 7S ची आता बघावी लागणार नाही वाट, ओपन सेल झाला सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने इंडियन टेक मार्केट मध्ये Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro च्या यशानंतर अलीकडेच या सीरीजचा अजून एक डिवाईस Redmi Note 7S लॉन्च केला आहे. हा फोन गेल्या 23 मे ला पहिल्यांदा सेल साठी उपलब्ध झाला होता जो मी डॉट कॉम व्यतिरिक्त फक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल. शाओमीच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे हा फोन पण आतापर्यंत फ्लॅश सेल मध्ये विकला जात होता. पण आता आपल्या फॅन्सची गरज पाहता Xiaomi ने इंडियन यूजर्सना भेट दिली आहे. Redmi Note 7S आता ओपन सेल साठी पण उपलब्ध होईल.

Xiaomi India ने आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडल वरून Redmi Note 7S च्या ओपन सेलची माहिती दिली आहे. आज म्हणजे 30 मे च्या रात्री 12 च्या नंतर हा फोन ओपेन सेल साठी उपलब्ध होईल. Redmi Note 7S उद्या पासून शाओमीच्या ऑफिशियल वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर कधीही विकत घेता येईल. विशेष म्हणजे ऑनलाइन प्लॅटफॉर्म सोबतच हा फोन ऑफलाईन मार्केट मध्ये पण Xiaomi मी प्रफर्ड पार्टनर स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध आहे.

किंमत आणि उपलब्धता
Redmi Note 7S ची किंमत पाहता कंपनीने हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जो 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Redmi Note 7S च्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी देण्यात आली आहे तर हा वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

डिजाइन आणि डिस्प्ले
Redmi Note 7S मध्ये 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमीने हा गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे. तसेच हँडसेट ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला आहे जो फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्सला 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो वाली बेजल लेस डिस्प्ले देण्यात आली आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे.

प्रोसेसर आणि ऑपरेटिग सिस्टम
फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत Redmi Note 7S एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो जो कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह येतो.

कॅमेरा
फोटोग्राफी साठी शाओमी Redmi Note 7S मध्ये एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा सपोर्ट आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेप्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी
कनेक्टिविटी साठी शाओमी Redmi Note 7S डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. तसेच सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. सोबत Redmi Note 7S फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी हँडसेट मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट वाली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. Redmi Note 7S मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्सटर्नल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो.

The post Xiaomi फॅन्ससाठी खुशखबर : Redmi Note 7S ची आता बघावी लागणार नाही वाट, ओपन सेल झाला सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-redmi-note-7s-open-sale-starts-price-specifications/feed/ 0
48एमपी कॅमेरा आणि शानदार फीचर्स सह आला Redmi Note 7S, बघा याची किंमत https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7s-launch-in-india-know-price-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7s-launch-in-india-know-price-specifications-and-features/#respond Mon, 20 May 2019 12:53:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4343 गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन मुळे फोन ग्लॉसी बिल्ड सह सादर केला गेला आहे.

The post 48एमपी कॅमेरा आणि शानदार फीचर्स सह आला Redmi Note 7S, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता शाओमीने आपल्या Redmi Note 7 सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनी ने Redmi Note 7S या नावाने लॉन्च केला आहे. याआधी कंपनीने या सीरीज मध्ये Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 लॉन्च केले होते. विशेष म्हणजे Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7S मध्ये जास्त फरक नाही.

विशेष म्हणजे चीन मध्ये कंपनी ने Redmi Note 7 लॉन्च केला होता तोच फोन 48-मेगापिक्सल कॅमेरा सह Redmi Note 7S नावाने भारतात आता लॉन्च केला गेला आहे. तसेच फोनचा रियर पॅनल कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रटेक्शन सह येतो. गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन मुळे फोन ग्लॉसी बिल्ड सह सादर केला गेला आहे.

किंमत आणि उपलब्धता
Redmi Note 7S च्या किंमतीबद्दल बोलायचे तर कंपनीने हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. या फोनच्या 3जीबी रॅम+32जीबी स्टोरेज वेरीएंटची किंमत 10,999 रुपये आणि 4जीबी+64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तसेच डिवाइस सेल साठी 23 मे ला फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध होईल.

डिजाइन आणि डिस्प्ले
Redmi Note 7S मध्ये 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमीने हा गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे. तसेच हँडसेट ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला आहे जो फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्सला 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो वाली बेजल लेस डिस्प्ले देण्यात आली आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे.

हे देखील वाचा: एक्सक्लूसिव: क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान लॉन्च होईल Oppo A9, बघा काय असेल खास

प्रोसेसर आणि ऑपरेटिग सिस्टम
फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत Redmi Note 7S एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो जो कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह येतो.

कॅमेरा
फोटोग्राफी साठी शाओमी Redmi Note 7S मध्ये एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा सपोर्ट आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेप्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: एक्सक्लूसिव: लवकरच लॉन्च होतील Vivo Y15 आणि Y12, 5,000 एमएएच बॅटरी सह असेल ​ट्रिपल कॅमेरा

बॅटरी आणि कनेक्टिविटी
कनेक्टिविटी साठी शाओमी Redmi Note 7S डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. तसेच सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. सोबत Redmi Note 7S फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी हँडसेट मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट वाली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. Redmi Note 7S मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्सटर्नल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो.

The post 48एमपी कॅमेरा आणि शानदार फीचर्स सह आला Redmi Note 7S, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7s-launch-in-india-know-price-specifications-and-features/feed/ 0