चीनी स्मार्टफोन निर्माता शाओमीने आपल्या Redmi Note 7 सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनी ने Redmi Note 7S या नावाने लॉन्च केला आहे. याआधी कंपनीने या सीरीज मध्ये Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 लॉन्च केले होते. विशेष म्हणजे Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7S मध्ये जास्त फरक नाही.
विशेष म्हणजे चीन मध्ये कंपनी ने Redmi Note 7 लॉन्च केला होता तोच फोन 48-मेगापिक्सल कॅमेरा सह Redmi Note 7S नावाने भारतात आता लॉन्च केला गेला आहे. तसेच फोनचा रियर पॅनल कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रटेक्शन सह येतो. गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन मुळे फोन ग्लॉसी बिल्ड सह सादर केला गेला आहे.
किंमत आणि उपलब्धता
Redmi Note 7S च्या किंमतीबद्दल बोलायचे तर कंपनीने हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. या फोनच्या 3जीबी रॅम+32जीबी स्टोरेज वेरीएंटची किंमत 10,999 रुपये आणि 4जीबी+64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तसेच डिवाइस सेल साठी 23 मे ला फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध होईल.
डिजाइन आणि डिस्प्ले
Redmi Note 7S मध्ये 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमीने हा गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे. तसेच हँडसेट ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला आहे जो फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्सला 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो वाली बेजल लेस डिस्प्ले देण्यात आली आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे.
हे देखील वाचा: एक्सक्लूसिव: क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान लॉन्च होईल Oppo A9, बघा काय असेल खास
प्रोसेसर आणि ऑपरेटिग सिस्टम
फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत Redmi Note 7S एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो जो कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह येतो.
कॅमेरा
फोटोग्राफी साठी शाओमी Redmi Note 7S मध्ये एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा सपोर्ट आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेप्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा: एक्सक्लूसिव: लवकरच लॉन्च होतील Vivo Y15 आणि Y12, 5,000 एमएएच बॅटरी सह असेल ट्रिपल कॅमेरा
बॅटरी आणि कनेक्टिविटी
कनेक्टिविटी साठी शाओमी Redmi Note 7S डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. तसेच सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. सोबत Redmi Note 7S फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी हँडसेट मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट वाली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. Redmi Note 7S मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्सटर्नल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो.














