Galaxy A50s फोन पण लॉन्च करेल Samsung, बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट

Samsung Galaxy A सीरीज मध्ये काही नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. कालच या सीरीजच्या लो बजेट स्मार्टफोन Galaxy A10s ची माहिती समोर आली होती ज्यात फोन थाईलँडच्या सर्टिफिकेशन साइट एनबीटीसी वर लिस्ट दिसला होता. आज एका दिवसानंतर या सीरीजचा अजून एक स्मार्टफोन Galaxy A50s पण समोर आला आहे. Samsung चा हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर स्पॉट केला गेला आहे ज्यातून Galaxy A50s संबंधित महत्वाची माहिती समोर आली आहे.

Galaxy A50s गीकबेंच वर SM-A507FN मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग आज म्हणजे 9 जुलैची आहे. Galaxy A50s ची हि लिस्टिंग समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि कंपनी गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन फोन वर काम करत आहे, त्याचबरोबर Galaxy A50s च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण गीकबेंच ने केला आहे.

गीकबेंच नुसार Samsung Galaxy A50s कंपनीने एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो वन यूजर इंटरफेस वर चालेल. तसेच प्रोसेसिंग साठी गॅलेक्सी ए50एस मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9610 चिपसेट असल्याचे या लिस्टिंग मध्ये समोर आले आहे. गीकबेंच वर Galaxy A50s 4जीबी रॅम सह दाखवण्यात आले आहे. हा फोन बाजारात एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. गीकबेंच स्कोरिंग पाहता सिंगल-कोर मध्ये या फोनला 1676 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये गॅलेक्सी ए50 एस ला 5434 स्कोर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Xiaomi Redmi 7A कि Realme C2, कोणता फोन आवडला तुम्हाला

Samsung Galaxy A50

सॅमसंग ने आपला हा स्मार्टफोन गॅलेक्सी ए सीरीज मध्ये इनफिनिटी यू डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनचा 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला छोटाशी ‘यू’ शेप नॉच आहे. सॅमसंग ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज केला आहे.

Galaxy A50 कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए7 प्रमाणे Galaxy A50 पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच Galaxy A50 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तर 8-मेगापिक्सलचा तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनचे हे दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतात. सेल्फी कॅमेरा पाहता Galaxy A50 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4420एमएएच बॅटरी सह Vivo चा नवीन फोन लीक

सॅमसंग Galaxy A50 मध्ये बिक्सबे शार्टकट बटण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Galaxy A50 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन येत्या काही दिवसांत अनाउंस केला जाऊ शकतो. फोनची किंमत किती असेल हे समजले नाही पण हा फोन बाजारात ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here