एक्सक्लूसिव: क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान लॉन्च होईल Oppo A9, बघा काय असेल खास

गेल्या महिन्यात OPPO ने आपला मिड-रेंज स्मार्टफोन OPPO A9 होम मार्केट चीन मध्ये लॉन्च केला होता. आता 91mobiles च्या बातमीनुसार OPPO A9 कंपनी ICC Cricket World Cup 2019 मध्ये लॉन्च करेल जो 30 मे ला सुरु होत आहे.

आमच्या सोर्सनुसार OPPO A9 कंपनी भारतात दोन रॅम व स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च करेल. यात 6जीबी + 64जीबी आणि 6जीबी + 128जीबी स्टोरेज वेरिएंट असतील. चीन मध्ये डिवाइस दोन रॅम वेरिएंट 4जीबी व 6जीबी आहेत. दोन्ही रॅम वेरिएंट सह 128जीबी स्टोरेज आहे. सध्या आमच्याकडे डिवाइसच्या लॉन्च डेटची कोणतीही माहिती नाही.

डिजाइन
OPPO A9 ची डिजाईन भारतात लॉन्च झालेल्या OPPO F11 Pro सारखी आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. फोनचे तीन किनारे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे जो पॅनलच्या मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे तसेच लाईट खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे. OPPO A9 च्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आले आहेत.

ओपो ए9 स्पेसिफिकेशन्स
OPPO A9 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.70 टक्के आहे. OPPO A9 6.53-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. चीनी बाजारात हा फोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर झाला आहे जो कलर ओएस 6.0 वर आधारित आहे. प्रोसेसिंग साठी OPPO A9 मध्ये 2.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट देण्यात आला आहे.

OPPO A9 चीन मध्ये 6जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. तसेच ग्राफिक्स साठी OPPO A9 मध्ये माली-जी72 एमपी3 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A9 ​डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी OPPO A9 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A9 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सपोर्ट करतो. चांगल्या गेमिंग एक्सपीरियंस साठी कंपनी ने हा फोन गेमबूस्ट 2.0 मोड सह आणला आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजी सह येतो. तसेच या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here