Xiaomi ने केली कमाल, फक्त 6 महिन्यांत विकले 1.5 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे फोन

भारतात शाओमी आपली वेगळी ओळख बनवण्यात आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाली आहे. कंपनीने फक्त 6 महिन्यांत ग्लोबली रेडमी नोट 7 सीरीजचे 1.5 कोटी पेक्षा जास्त स्मार्टफोन विकण्यात यश मिळवले आहे यावरूनच याचा अंडज लावता येतो.

शाओमीचे इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी याची माहिती देत ट्विट केले आहे. तसेच हा आनंद साजरा करण्यासाठी कंपनीने मोफत Redmi Note 7 Pro व Redmi Note 7s देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी तुम्हाला मनु कुमार जैन यांच्या ट्विटला रीट्वीट करावे लागेल. जर तुम्ही भाग्यशाली असाल तर Redmi Note 7S किंवा Redmi Note 7 Pro पैकी कोणताही एक फोन तुम्हाला मोफत मिळू शकतो. Redmi Note 7 Pro ची सुरवाती किंमत 13,999 रुपये आणि अलीकडेच लॉन्च केलेल्या Redmi Note 7s स्मार्टफोनची 10,999 रुपये आहे.

हे देखील वाचा: जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला Nokia 9 भारतात झाला लॉन्च, बघा किंमत आणि लॉन्च ऑफर्स

विशेष म्हणजे कंपनीने काही दिवसांपूर्वी Redmi Note 7 डिस्कंटीन्यू करत Redmi Note 7s लॉन्च केला होता. आता कंपनी Redmi Note 7s आणि Redmi Note 7 Pro स्मार्टफोन विकत आहे.

Redmi Note 7s आणि Redmi Note 7 Pro चे स्पेसिफिकेशंस पाहता दोन्ही स्मार्टफोन एकसारखेच आहेत. दोन्ही फोन मध्ये तुम्हाला 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले नॉच सह मिळेल. तसेच Redmi Note 7s स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आहे जो 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज सह येतो. तसेच Redmi Note 7 Pro स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 675 एसओसी सह येतो ज्यात 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम सह 128जीबी ची स्टोरेज आहे.

हे देखील वाचा: Galaxy A50s फोन पण लॉन्च करेल Samsung, बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट

फोटोग्राफी साठी दोन्ही स्मार्टफोनच्या मागे 48-मेगापिक्सल + 5 मेगिपिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. पण या दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात थोडा फरक आहे. Redmi Note 7s मध्ये सॅमसंगचा ISOCELL GM1 सेंसर आहे तर Redmi Note 7 Pro मध्ये सोनी IMX586 सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे ज्यात यूएसबी टाइप-सी सह 18 वॉटची फास्ट चार्जिंग आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here