Redmi Note 9 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 22 Dec 2020 14:21:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi घेऊन येत आहे 108MP कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन Mi 10i, 5 जानेवारीला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-to-launch-in-india-on-5-january-with-108-megapixel-camera-redmi-note-9-pro-5g/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-to-launch-in-india-on-5-january-with-108-megapixel-camera-redmi-note-9-pro-5g/#respond Tue, 22 Dec 2020 14:21:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9414 शाओमी इंडियाने आज मीडिया इन्व्हाईट पाठवत घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 5 जानेवारीला भारतात आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे. शाओमीचा हा नवीन डिवायस भारतात Xiaomi Mi 10i नावाने लॉन्च होईल.

The post Xiaomi घेऊन येत आहे 108MP कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन Mi 10i, 5 जानेवारीला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्याच महिन्यात टेक मंचावर आपल्या ‘नोट सीरीज’ चा विस्तार करत Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G स्मार्टफोन सादर केले होते. हे दोन्ही मोबाईल फोन शाओमीने आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये लॉन्च केले होते, जे आता भारतात येण्यास तयार आहेत. शाओमी इंडियाने आज मीडिया इन्व्हाईट पाठवत घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 5 जानेवारीला भारतात आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे. शाओमीचा हा नवीन डिवायस भारतात Xiaomi Mi 10i नावाने लॉन्च होईल.

शाओमीने घोषणा केली आहे कि कंपनी 5 जानेवारीला भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने फोनचे नाव तर सांगितले नाही पण शेयर केलेल्या फोटो वरून समजले आहे कि हा आगामी स्मार्टफोन गेल्या महिन्यात चीन मध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट 9 5जी प्रो असेल. तसेच मिळालेल्या माहितीनुसार भारतात हा फोन Redmi Note 9 Pro 5G नाही तर Xiaomi Mi 10i नावाने लॉन्च केला जाईल. आता फोनचे स्पेसिफिकेशन्स पण पूर्णपणे रेडमी नोट 9 प्रो 5जी सारखे असतील कि नाही, यासाठी 5 जानेवारीची वाट बघावी लागेल.

Redmi Note 9 Pro 5G

Redmi Note 9 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स पाहता या हँडसेट मध्ये 6.67-इंचाचा FHD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि पंच-होल सेल्फी कॅमेऱ्यासह येतो. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 750G SoC सह Adreno 619 GPU आहे. इतकेच नव्हे तर फोन मध्ये 6GB LPDDR4 रॅम आणि 128GB UFS 2.1 पर्यंतचा स्टोरेज ऑप्शन आहे.

हे देखील वाचा : 50MP कॅमेऱ्यासह येईल शक्तीशाली स्मार्टफोन OnePlus 9, लॉन्चच्या आधी जाणून घ्या वैशिष्टये

सॉफ्टवेयर पाहता Redmi Note 9 Pro 5G स्मार्टपोन MIUI 12 सह अँड्रॉइड 10 वर चालतो. तसेच Redmi Note 9 Pro 5G मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 108MP प्राइमरी सेंसर, 13MP अल्ट्रा-वाइड लेंस, 2MP मॅक्रो यूनिट आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. फोन मध्ये फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,820mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सह येते. तसेच इतर फीचर्स पाहता फोन मध्ये सुरक्षेसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि 5 जी, 4 जी एलटीई, एनएफसी, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि चार्जिंग आणि डेटा सिंकसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे ऑप्शन आहेत.

The post Xiaomi घेऊन येत आहे 108MP कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन Mi 10i, 5 जानेवारीला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-to-launch-in-india-on-5-january-with-108-megapixel-camera-redmi-note-9-pro-5g/feed/ 0
108MP कॅमेरा आणि 8GB रॅम सह आली Redmi Note 9 5जी सीरीज, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-9-pro-5g-redmi-note-9-5g-and-redmi-note-9-4g-launched-know-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-9-pro-5g-redmi-note-9-5g-and-redmi-note-9-4g-launched-know-price-specification/#respond Fri, 27 Nov 2020 12:34:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9093 शाओमीने Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G सोबतच Redmi Note 9 4G वर्जन मध्ये पण सादर केला आहे.

The post 108MP कॅमेरा आणि 8GB रॅम सह आली Redmi Note 9 5जी सीरीज, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने काही दिवसांपूर्वी बाजारात आपली ‘रेडमी नोट’ सीरीज वाढवत तीन नवीन फोन लॉन्च केले होते. या फोन्स मध्ये Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max भारतीय बाजारात लॉन्च केले गेले होते. तसेच Redmi Note 9S थायलंड, मलेशिया आणि सिंगापुर मधील बाजारात आला होता. आता शाओमीने आपल्या घरच्या मार्केट मध्ये म्हणजे चीन मध्ये रेडमी नोट 9 सीरीजचे 5जी मॉडेल मध्ये सादर केले आहेत. या सीरीज मध्ये दोन 5G आणि एक 4G फोन सादर केले गेले आहेत.

शाओमीने Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G सोबतच Redmi Note 9 4G वर्जन मध्ये पण सादर केला आहे. या हँडसेट बद्दल बोलायचे झाले तर हे ब्रँडच्या नोट सीरीजचे पहिले 5G स्मार्टफोन आहेत. फोन Redmi Note 8 आणि Note 8 Pro चे अपग्रेडेड वर्जन म्हणून सादर केले गेले आहेत. सोबतच Redmi Note 9 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स जवळपास Mi 10T Lite सारखे आहेत, याचा लीक मध्ये पण उल्लेख झाला होता.

Redmi Note 9 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 9 Pro 5G बद्दल बोलायचे झाले तर या हँडसेट मध्ये 6.67-इंचाचा FHD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि पंच-होल सेल्फी कॅमेऱ्यासह येतो. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 750G SoC सह Adreno 619 GPU आहे. इतकेच नव्हे तर फोन मध्ये 6GB LPDDR4 रॅम आणि 128GB UFS 2.1 पर्यंतचा स्टोरेज ऑप्शन आहे. सॉफ्टवेयर पाहता Redmi Note 9 Pro 5G स्मार्टपोन MIUI 12 सह अँड्रॉइड 10 वर चालतो.

Redmi Note 9 Pro 5G मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 108MP प्राइमरी सेंसर, 13MP अल्ट्रा-वाइड लेंस, 2MP मॅक्रो यूनिट आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. तसेच फोन मध्ये फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणला पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स वर टाका एक नजर

फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,820mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सह येईल. तसेच इतर फीचर्सपाहता फोन मध्ये सुरक्षेसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि 5 जी, 4 जी एलटीई, एनएफसी, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि चार्जिंग आणि डेटा सिंकसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे ऑप्शन आहेत.

Redmi Note 9 5G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 9 5G पाहता यात 6.53-इंचाचा FHD+ पंच-होल डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट सह एलसीडी पॅनल वर येतात. तसेच फोन मध्ये मिड-रेंज मीडियाटेक डाइमेंसिटी 800U SoC आहे. फोन मध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 48MP चा मेन सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड लेंस, 2MP डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी Note 9 5G मध्ये 3MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

हैंडसेट अँड्रॉइड 10-बेस्ड MIUI 12 वर चालतो. इतकेच नव्हे तर फोन मध्ये Redmi Note 9 Pro 5G प्रमाणे साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनचे डायमेन्शन 161.96mm × 77.25mm × 9.20mm असे आहेत. डिवाइसचे वजन 200 ग्राम आहे.

Redmi Note 9 4G चे स्पेसिफिकेशन्स

ब्रँडने Redmi Note 9 4G पण सादर केला आहे जो भारतात लॉन्च झालेल्या Redmi Note 9 पेक्षा वेगळा आहे. दोन्ही डिवाइस पेक्षा वेगळा असलेला हा फोन फक्त 4G सपोर्ट सह येतो आणि तिन्ही मध्ये सर्वात किफायतशीर किंमत पण या फोनची आहे. वॉटर ड्रॉप डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम सह येणाऱ्या या हँडसेट मध्ये 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन स्नॅपड्रॅगॉन 662 SoC सह 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो.

हे देखील वाचा : Micromax In 1b Vs Redmi 9A: जाणून घ्या कोण जिंकेल लो बजेटची लढाई

Redmi Note 9 5G, Redmi Note 9 Pro 5G, Redmi Note 9 4G ची किंमत आणि उपलब्धता

Redmi Note 9 5G च्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत RMB 1299 (जवळपास 14,600 रुपये), 8GB + 128GB ऑप्शनची किंमत RMB 1499 (जवळपास 16,900 रुपये) आणि 8GB + 256GB मॉडेलची किंमत RMB 1699 (जवळपास 19,000 रुपये) आहे. तसेच Redmi Note 9 Pro 5G के 6GB + 128GB वेरिएंटची किंमत RMB 1599 (जवळपास 18,000 रुपये), 8GB 128GB ऑप्शनची किंमत RMB 1799 (जवळपास 20,000 रुपये) आणि 8GB + 256GB कॉन्फिगरेशनसाठी RMB 1999 (जवळपास 22,500 रुपये) द्यावे लागतील. सध्या Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G च्या भारतातील लॉन्च बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

चीन मध्ये Redmi Note 9 4G ची किंमत आरएमबी 999 (जवळपास 11,200 रुपये) पासून सुरु होते आणि आरएमबी 1499 (जवळपास 16,900 रुपये) पर्यंत जाते.

The post 108MP कॅमेरा आणि 8GB रॅम सह आली Redmi Note 9 5जी सीरीज, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-9-pro-5g-redmi-note-9-5g-and-redmi-note-9-4g-launched-know-price-specification/feed/ 0
8GB रॅम आणि Snapdragon 750G सह वेबसाइट वर आला Redmi Note 9 Pro 5G, 26 नोव्हेंबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-9-pro-5g-specs-spotted-on-geekbench-launch-on-26-november/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-9-pro-5g-specs-spotted-on-geekbench-launch-on-26-november/#respond Fri, 20 Nov 2020 14:20:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9031 गीकबेंच रिपोर्ट मधून आले आहे कि Redmi Note 9 Pro 5G काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या Mi 10T Lite चा रिब्रँडेड वर्जन असेल.

The post 8GB रॅम आणि Snapdragon 750G सह वेबसाइट वर आला Redmi Note 9 Pro 5G, 26 नोव्हेंबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi Note 9 सीरीज भारतासहित अनेक मार्केट मध्ये आली आहे. पण अजूनतरी Xiaomi ने आपल्या घरच्या मार्केट मध्ये हि सीरीज सादर केली नाही कारण कंपनी चीन मध्ये हि सीरीज 5G सह सादर करणार आहे. Xiaomi ने अलीकडेच सांगितले आहे कि Redmi Note 9 5G आणि याचा प्रो वेरिएंट चीन मध्ये 26 नोव्हेंबरला लॉन्च केला जाईल. 5जी कनेक्टिविटी व्यतिरिक्त फोन मध्ये ग्लोबल रेडमी नोट 9 मॉडेलच्या तुलनेत काही इतर बदल असण्याची शक्यता आहे. याचकारणामुळे Redmi Note 9 5G भारतासहित इतर ग्लोबल बाजारांमध्ये Redmi Note 9T म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. आता Redmi Note 9 Pro 5G च्या लॉन्चच्या आधी याचे स्पेसिफिकेशन्स गीकबेंच वर समोर आले आहेत.

बेंचमार्किंग साइट Geekbench लिस्टिंग नुसार Redmi Note 9 Pro 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750G चिपसेट असेल. तसेच यात ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU दिला जाईल. तसेच बेंचमार्किंग साइट वर समोर आले आहे कि रेडमी नोट 9 प्रो 5जी मध्ये 8GB रॅम आणि अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम सह येईल. इतकेच नव्हे तर डिवाइसला सिंगल-कोर मध्ये 645 गुण आणि मल्टी कोर मध्ये 1963 गुण मिळाले आहेत.

टेना लिस्टिंग

गीकबेंच रिपोर्ट मधून आले आहे कि Redmi Note 9 Pro 5G काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या Mi 10T Lite चा रिब्रँडेड वर्जन असेल. रेडमी नोट 9 5जी मॉडेल नंबर M2007J22C सह अलीकडेच TENAA वर दिसला होता. फोन 6.53 इंचाच्या फुल-एचडी+ आईपीएस डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंसिटी 800यू चिपसेट, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज सह येण्याची शक्यता आहे. तसेच लिस्टिंग वरून समजले आहे कि Redmi Note 9 5G मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल.

किंमत

काही दिवसांपूर्वी रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि रेडमी नोट 9 5जी 1,000 चीनी युआन (जवळपास 11,300 रुपये) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, Redmi Note 9 Pro 5G ची किंमत 1,500 चीनी युआन (जवळपास 17,000 रुपये) असू शकते.

The post 8GB रॅम आणि Snapdragon 750G सह वेबसाइट वर आला Redmi Note 9 Pro 5G, 26 नोव्हेंबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-9-pro-5g-specs-spotted-on-geekbench-launch-on-26-november/feed/ 0