Xiaomi घेऊन येत आहे 108MP कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन Mi 10i, 5 जानेवारीला होईल भारतात लॉन्च

Xiaomi ने गेल्याच महिन्यात टेक मंचावर आपल्या ‘नोट सीरीज’ चा विस्तार करत Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G स्मार्टफोन सादर केले होते. हे दोन्ही मोबाईल फोन शाओमीने आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये लॉन्च केले होते, जे आता भारतात येण्यास तयार आहेत. शाओमी इंडियाने आज मीडिया इन्व्हाईट पाठवत घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 5 जानेवारीला भारतात आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे. शाओमीचा हा नवीन डिवायस भारतात Xiaomi Mi 10i नावाने लॉन्च होईल.

शाओमीने घोषणा केली आहे कि कंपनी 5 जानेवारीला भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने फोनचे नाव तर सांगितले नाही पण शेयर केलेल्या फोटो वरून समजले आहे कि हा आगामी स्मार्टफोन गेल्या महिन्यात चीन मध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट 9 5जी प्रो असेल. तसेच मिळालेल्या माहितीनुसार भारतात हा फोन Redmi Note 9 Pro 5G नाही तर Xiaomi Mi 10i नावाने लॉन्च केला जाईल. आता फोनचे स्पेसिफिकेशन्स पण पूर्णपणे रेडमी नोट 9 प्रो 5जी सारखे असतील कि नाही, यासाठी 5 जानेवारीची वाट बघावी लागेल.

Redmi Note 9 Pro 5G

Redmi Note 9 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स पाहता या हँडसेट मध्ये 6.67-इंचाचा FHD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि पंच-होल सेल्फी कॅमेऱ्यासह येतो. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 750G SoC सह Adreno 619 GPU आहे. इतकेच नव्हे तर फोन मध्ये 6GB LPDDR4 रॅम आणि 128GB UFS 2.1 पर्यंतचा स्टोरेज ऑप्शन आहे.

हे देखील वाचा : 50MP कॅमेऱ्यासह येईल शक्तीशाली स्मार्टफोन OnePlus 9, लॉन्चच्या आधी जाणून घ्या वैशिष्टये

सॉफ्टवेयर पाहता Redmi Note 9 Pro 5G स्मार्टपोन MIUI 12 सह अँड्रॉइड 10 वर चालतो. तसेच Redmi Note 9 Pro 5G मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 108MP प्राइमरी सेंसर, 13MP अल्ट्रा-वाइड लेंस, 2MP मॅक्रो यूनिट आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. फोन मध्ये फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,820mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सह येते. तसेच इतर फीचर्स पाहता फोन मध्ये सुरक्षेसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि 5 जी, 4 जी एलटीई, एनएफसी, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि चार्जिंग आणि डेटा सिंकसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे ऑप्शन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here