50MP कॅमेऱ्यासह येईल शक्तीशाली स्मार्टफोन OnePlus 9, लॉन्चच्या आधी जाणून घ्या वैशिष्टये

प्रीमियम स्मार्टफोन बनवणारी कंपनी वनप्लसचा अपकमिंग फ्लॅगशिप फोन Oneplus 9 मार्केट मध्ये येण्याआधीच इंटरनेट वर चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती कि कंपनी पुढल्या वर्षी वनप्लस 9 सीरीज सादर करण्याची तयारी करत आहे. या सीरीज मध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro सोबतच OnePlus 9E पण सादर केला जाईल. तसेच, Oneplus 9 सीरीजच्या लॉन्चच्या आधी OnePlus 9 चे ी स्पेसिफिकेशन्स डीटेल लीक झाले आहेत.

GizmoChina वर पब्लिश SlashLeaks च्या रिपोर्टनुसार , OnePlus 9 मध्ये वर्टिकल लाइन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात प्राइमरी सेंसर 50 मेगापिक्सलचा असेल आणि हा f/1.9 अपर्चर सह येईल.

कॅमेरा

GizmoChina वरील Slashleaks च्या रिपोर्टनुसार OnePlus 9 मध्ये वर्टिकल लाइन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअप मध्ये 50MP चा प्राइमरी वाइड-अँगल सेंसर (f / 1.79) दिला जाईल, जो OnePlus 8 / 8T च्या 48MP पेक्षा मोठा आहे. तसेच f/1.8 अपर्चर सह 20 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस आणि ऑटोफोकस फीचर सह तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा असेल. याआधी बातमी समोर आली होती कि वनप्लस 9 सीरीजच्या कॅमेरा मध्ये Leica ची लेंस असेल, ज्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कि पिक्चर क्वॉलिटीच्या बाबतीत वनप्लस 9 सीरीजचे स्मार्टफोन्स खूप शानदार असतील.

मागील रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले होते कि OnePlus 9 मध्ये 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. वनप्लस 9 च्या कॅमेऱ्यांबाबत कंपनीने आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही. तसेच कंपनीने आतापर्यंत या सीरीज बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही.

हे देखील वाचा : Exclusive: Samsung Galaxy A32 ची लाइव इमेज आली समोर, अशी असेल डिजाइन

OnePlus 9 चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9 5G कथितरित्या 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR कंटेंट सह 6.55-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. डिस्प्ले मध्ये FHD + (1,080 x 2,400p) रिजॉल्यूशन आणि 20: 9 आस्पेक्ट रेश्यो असण्याची शक्यता आहे. सोबतच फोन मध्ये 8GB / 12GB रॅम आणि 256GBGB इंटरनल स्टोरेज सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज एक्सपांडेबिलिटीला सपोर्ट नसेल. डिवाइस एंड्रॉइड 11-आधारित ऑक्सीजनओएस वर काम करेल आणि पावर बॅकअपसाठी डिवाइस मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सह येऊ शकते.

सोर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here