Samsung Foldable Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 06:22:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 26 जुलैला लाँच होतील सॅमसंगचे नवीन फोल्डेबल फोन, Galaxy Z Flip 5 आणि Fold 5 ची होणार एंट्री! https://www.91mobiles.com/marathi/26-july-samsung-unpacked-event-in-seoul-galaxy-z-flip-5-and-fold-5-might-launch/ https://www.91mobiles.com/marathi/26-july-samsung-unpacked-event-in-seoul-galaxy-z-flip-5-and-fold-5-might-launch/#respond Thu, 06 Jul 2023 06:22:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21913 सॅमसंगनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की कंपनी साउथ कोरियामधील सियॉलमध्ये ‘Unpacked event’ करणार आहे तेव्हापासून लोकांच्या नजर कंपनीकडे वळल्या आहेत. आज कंपनीनं इव्हेंट डेटवरील पडदा हटवला आहे आणि सांगितलं आहे की 27वा सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंट 26 जुलैला आयोजित केला जाईल. तसेच खुलासा करण्यात आला आहे की ह्या दिवशी नवीन फोल्डेबल सॅमसंग फोन देखील लाँच […]

The post 26 जुलैला लाँच होतील सॅमसंगचे नवीन फोल्डेबल फोन, Galaxy Z Flip 5 आणि Fold 5 ची होणार एंट्री! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 27वा सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंट 26 जुलैला आयोजित केला जाईल.
  • कंपनी हा कार्यक्रम ‘Join the Flip Side’ टॅगलाईनसह प्रोमोट करत आहे.
  • कंपनीचे नवीन टीडब्ल्यूएस इअरबड्स Samsung Galaxy Buds 3 पण लाँच होऊ शकतात.

सॅमसंगनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की कंपनी साउथ कोरियामधील सियॉलमध्ये ‘Unpacked event’ करणार आहे तेव्हापासून लोकांच्या नजर कंपनीकडे वळल्या आहेत. आज कंपनीनं इव्हेंट डेटवरील पडदा हटवला आहे आणि सांगितलं आहे की 27वा सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंट 26 जुलैला आयोजित केला जाईल. तसेच खुलासा करण्यात आला आहे की ह्या दिवशी नवीन फोल्डेबल सॅमसंग फोन देखील लाँच केले जातील.

सॅमसंग अनपॅक्ड इव्हेंट डेट

सॅमसंगनं ऑफिशियली अनाउंस केलं आहे की ह्यात महिन्यात 26 जुलैला कंपनी सियॉलमध्ये ‘अनपॅक्ड इव्हेंट’ आयोजित करणार आहे ज्याच्या मंचावरून कंपनी नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करेल. कंपनी हा कार्यक्रम ‘Join the Flip Side’ टॅगलाईनसह प्रोमोट करत आहे. हा लाँच इव्हेंट भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल, त्याचबरोबर सॅमसंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच युट्युब चॅनेलवर देखील लाइव्ह पाहता येईल.

नवीन फोल्डेबल सॅमसंग फोन

लाँच डेटची घोषणा करण्यासोबतच कंपनीनं मीडिया इन्व्हाईटमध्ये फोल्डबेल फोनचे फोटो देखील शेयर करण्यात आले आहेत. हा फोटो कंपनीच्या ‘फ्लिप’ फोन सारखा आहे. इन्व्हाईट आणि टॅगलाईन पाहून अंदाज लावला जात आहे की कदाचित 26 जुलैला कंपनी फक्त Samsung Galaxy Z Flip 5 च लाँच करेल आणि Samsung Galaxy Z Fold 5 साठी वाट पाहावी लागेल. परंतु पुढील अपडेट येईस्तोवर ठोस काही सांगता येणार नाही.

हे सॅमसंग प्रोडक्ट होऊ शकतात लाँच

26 जुलैला Samsung Galaxy Z Flip 5 आणि Samsung Galaxy Z Fold 5 स्मार्टफोन लाँच होण्याच्या जास्त शक्यता आहे. तसेच सियॉलमध्ये आयोजित होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटच्या मंचावरून कंपनी आपला टॅबलेट डिवायस Samsung Galaxy Tab S9 Ultra देखील लाँच करू शकते.

समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्स तसेच लीक्स पाहता 26 जुलैला सॅमसंग स्मार्टवॉचची नवीन जेनरेशन Samsung Galaxy Watch 6 Classic आणि Samsung Galaxy Watch 6 देखील बाजारात येऊ शकतात. ह्या प्रोडक्ट्स व्यतिरिक्त कंपनीचे नवीन टीडब्ल्यूएस इअरबड्स Samsung Galaxy Buds 3 पण 26 जुलैला लाँच होऊ शकतात.

The post 26 जुलैला लाँच होतील सॅमसंगचे नवीन फोल्डेबल फोन, Galaxy Z Flip 5 आणि Fold 5 ची होणार एंट्री! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/26-july-samsung-unpacked-event-in-seoul-galaxy-z-flip-5-and-fold-5-might-launch/feed/ 0
जुलैमध्ये लाँच होतील नवीन Samsung foldable फोन, अशी असू शकते खासियत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-unpacked-in-july-south-korea-fold-z-5-and-flip-z-5-to-launch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-unpacked-in-july-south-korea-fold-z-5-and-flip-z-5-to-launch/#respond Wed, 07 Jun 2023 07:18:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21441 Samsung नं अधिकृत घोषणा करत सांगितलं आहे की कंपनी पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये ‘Unpacked event’ आयोजित करत आहे. ह्या इव्हेंटच्या मंचावरून कंपनीचे नवीन फोल्डेबल डिवायस टेक मार्केटमध्ये येतील, ज्यात Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 चा समावेश केला जाऊ शकतो. इव्हेंटयाची माहिती आणि फोन्सचे लीक स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता. सॅमसंग गॅलेक्सी […]

The post जुलैमध्ये लाँच होतील नवीन Samsung foldable फोन, अशी असू शकते खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung नं अधिकृत घोषणा करत सांगितलं आहे की कंपनी पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये ‘Unpacked event’ आयोजित करत आहे. ह्या इव्हेंटच्या मंचावरून कंपनीचे नवीन फोल्डेबल डिवायस टेक मार्केटमध्ये येतील, ज्यात Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 चा समावेश केला जाऊ शकतो. इव्हेंटयाची माहिती आणि फोन्सचे लीक स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 5 आणि झेड फ्लिप 5 रिलीज टाइम (ग्लोबल)

सॅमसंगनं सध्या कोणतीही लाँच डेट सांगितली नाही परंतु स्पष्ट केलं आहे की कंपनीचा पुढील ‘गॅलेक्सी अनपॅक्ड’ इव्हेंट जुलैच्या अखेरीस आयोजित केला जाईल. हा सॅमसंगचा 27वा अनपॅक्ड कार्यक्रम आहे जो साउथ कोरियन राजधानी सियोलमध्ये आयोजित केला जाईल. विशेष म्हणजे पहिल्यांदाच सॅमसंग आपल्या होम कंट्री दक्षिण कोरियामध्ये असा मोठा ग्लोबल इव्हेंट आयोजित करत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 5 आणि झेड फ्लिप 5 मॉडेल

सॅमसंगनं खुलासा करण्यात आला आहे की जुलैमध्ये होणाऱ्या अनपॅक्ड इव्हेंटमध्ये कंपनी आपला नवीन फोल्डेबल डिवायस सादर करेल. कंपनीनं ह्या नवीन मोबाइल फोन्सच्या नावांची माहिती दिली नाही परंतु आशा आहे की Samsung Galaxy Z Fold 5 आणि Samsung Galaxy Z Flip 5 येतील बाजारात.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 5 आणि झेड फ्लिप 5 इंडिया रिलीज डेट

27वा गॅलेक्सी अनपॅक्ड एक ग्लोबल इव्हेंट असेल जो सियोलच्या माध्यमातून पूरी दुनिया मध्ये दिखाया जाएगा. काही समय से सॅमसंग अपने फ्लॅगशिप Galaxy Z आणि Galaxy S स्मार्टफोन्स को ग्लोबल लाँच सोबतच भारतीय बाजार उतार देती आहे. यावेळी पण ऐसा ही होने की उम्मीद आहे. जुलै मध्ये ग्लोबल लाँच होने सोबतच गॅलेक्सी झेड फोल्ड 5 आणि गॅलेक्सी झेड फ्लिप 5 भारतात पण ऑफिशियल हो सकते आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 5 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

स्क्रीन : लीक्सनुसार ह्या फोनमध्ये 6.2 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही कव्हर स्क्रीन असेल जी फोल्ड फोनमध्ये बाहेरून दिसेल. तसेच फोनमध्ये 7.6 इंचाची इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी फोन डायरी प्रमाणे उघडल्यानंतर समोर येईल. दोन्हीमध्ये डायनॅमिक अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर केला जाईल.

प्रोसेसर : Galaxy Z Fold 5 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो जो 3.2गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालेल. तसेच ग्राफिक्ससाठी ह्या फोनमध्ये एड्रेनो 740 जीपीयू मिळू शकतो.

कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 10 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स मिळू शकते. तसेच फ्रंट पॅनलवर 12 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी झेड फोल्ड 5 स्मार्टफोनमध्ये 4,700एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. ह्या फोनमध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आणि वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 5 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

स्क्रीन : Galaxy Z Flip 5 स्मार्टफोनबद्दल चर्चा आहे की ह्या स्मार्टफोनमध्ये देखील 6.2 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले मिळेल जो फोनमध्ये दिली जाईल. फोन फोल्ड झाल्यानंतर जी स्क्रीन बाहेर असेल जिचा आकार 3.4 इंच असू शकतो. ह्याला कव्हर डिस्प्ले म्हणतात.

प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या सॅमसंग फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट दिला जाऊ शकतो जो 3.2गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालेल. ग्राफिक्ससाठी ह्या फोनमध्ये एड्रेनो 730 जीपीयू असल्याचं समोर आलं आहे.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्रायमरी वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy Z Flip 5 मध्ये 3,700एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. लीक्स नुसार हा फोन देखील 27वॉट फास्ट चार्जिंग तसेच वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स मिळतील.

The post जुलैमध्ये लाँच होतील नवीन Samsung foldable फोन, अशी असू शकते खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-unpacked-in-july-south-korea-fold-z-5-and-flip-z-5-to-launch/feed/ 0
Samsung Galaxy Bloom असेल कंपनीच्या आगामी फोल्डेबल फोनचे नाव, 11 फेब्रुवारीला होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-bloom-upcoming-foldable-phone-reveal-galaxy-unpacked-2020-ces/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-bloom-upcoming-foldable-phone-reveal-galaxy-unpacked-2020-ces/#respond Fri, 10 Jan 2020 12:45:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6253 सॅमसंग गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये सादर केल्या जाणाऱ्या Galaxy S20 4G आणि Galaxy S20+ 4G स्मार्टफोनचे प्रोडक्शन भारतात सुरु झाले आहे.

The post Samsung Galaxy Bloom असेल कंपनीच्या आगामी फोल्डेबल फोनचे नाव, 11 फेब्रुवारीला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 11 फेब्रुवारीला सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे ज्यात कंपनी आपली नवीन टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्ट्स जगासमोर सादर करेल. सॅमसंगने आपल्या या ईवेंटला ‘Galaxy UNPACKED‘ असे नाव दिले आहे. कंपनीने अजुनपर्यंत सांगितले नाही कि या दिवशी कोणते Samsung डिवाईस सादर केले जातील पण चर्चा अशी आहे कि कंपनी 11 फेब्रुवारीला आपल्या ‘गॅलेक्सी एस सीरीज’ चा विस्तार करेल त्याचबरोबर ब्रँडचा नेक्स्ट फोल्डेबल फोन पण टेक जगासमोर आणेल. आता लॉन्चच्या आधी समोर आले आहे कि Samsung च्या या नवीन फोल्डेबल फोनचे नाव असेल Galaxy Bloom.

मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंगने आपल्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोनचे नाव सांगितले आहे आणि कंपनीचा हा नवीन डिवाईस Samsung Galaxy Bloom नावाने टेक मार्केट मध्ये येईल. साउथ कोरियन पब्लिकेशनने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि कन्ज्यूमर इलेक्ट्रॉकि शो (CES) 2020 मध्ये काल सॅमसंगने एक मीटिंग घेतली होती, ज्यात Samsung Electronics CEO DJ Koh यांच्यसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आणि या मीटिंग मध्ये सॅमसंगच्या आगामी फोल्डेबल फोनचा स्लाईड शो दाखवत कंपनीने खुलासा केला आहे कि हा स्मार्टफोन Galaxy Bloom नावाने लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy Bloom

कंपनी द्वारा आयोजित मीटिंग मधून गॅलेक्सी ब्लूमचा एक फोटो पण लीक झाला आहे ज्यात फोन दाखवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार Galaxy Bloom मध्ये 13.3 इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाईल जो आतल्या बाजूस फोल्ड होईल. फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप पण दिसत आहे जो वरच्या बाजूला उजवीकडे हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर असतील अशी शक्यता आहे. फोटो बघून अंदाज लावला जात आहे कि Samsung Galaxy Bloom फोल्ड केल्यानंतर याच्या डिस्प्लेचा वरचा भाग थोडा बाहेर राहील आणि कदाचित यावर टाईम व अन्य नोटिफिकेशन्स दिसतील. Galaxy Bloom बद्दल अजूनही काही ठोस बोलणे कठीण आहे, यासाठी Samsung च्या घोषणेची वाट बघावी लागेल.

Galaxy UNPACKED 2020

सॅमसंग द्वारा 11 फेब्रुवारीला आयोजित केल्या जाणाऱ्या ईवेंट बद्दल बोलायचे तर कंपनी या दिवसही आपल्या एस सीरीजचा स्मार्टफोन Galaxy S11 किंवा Galaxy S20 नावाने लॉन्च करू शकते. Galaxy Bloom बद्दल बोलले जात आहे कि सॅमसंगच्या अपकमिंग फोल्डेबल फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर असेल. तसेच डिवाइस मध्ये फ्रंट कॅमेरा 10-मेगापिक्सलचा असेल. याव्यतिरिक्त माहिती समोर आली आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये सादर केल्या जाणाऱ्या Galaxy S20 4G आणि Galaxy S20+ 4G स्मार्टफोनचे प्रोडक्शन भारतात सुरु झाले आहे. याचा अर्थ असा आहे कि भारतीय मार्केट मध्ये Galaxy S20 सीरीजचा 5G वर्जन येणार नाही.

The post Samsung Galaxy Bloom असेल कंपनीच्या आगामी फोल्डेबल फोनचे नाव, 11 फेब्रुवारीला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-bloom-upcoming-foldable-phone-reveal-galaxy-unpacked-2020-ces/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे कागदाप्रमाणे घडी होणार फोन, बांधता येईल मनगटावर https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-rollable-display-device-patent-uspto/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-rollable-display-device-patent-uspto/#respond Thu, 02 May 2019 11:06:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4214 पेटेंट मध्ये समोर आलेल्या फोटो वरून समजते कि सॅमसंगच्या या डिवाईसचा डिस्प्ले मोठा असेल, जो सामान्य घड्याळापेक्षा खूप रुंद

The post सॅमसंग घेऊन येत आहे कागदाप्रमाणे घडी होणार फोन, बांधता येईल मनगटावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने फेब्रुवारीत आपला बहुप्रतीक्षित फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Fold सादर केला होता. सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन एखाद्या डायरी प्रमाणे बंद होतो. या फोनने टेक मंचावर येताच सर्वांचे लक्ष वेधले. Galaxy Fold बद्दल टेक एक्सपर्ट्स कडून संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. हा शानदार डिवाईस सादर केल्यानंतर सॅमसंग थांबणार नाही. आता बातमी समोर येत आहे कि सॅमसंग अजून एक अशाच अनोख्या स्मार्टफोन वर काम करत आहे जो एखाद्या डायरी नव्हे तर मनगटावरील घड्याळाप्रमाणे वाकेल.

91मोबाईल्स ने सॅमसंगच्या या अनोख्या डिवाईसची माहिती दिली आहे. 91मोबाईल्सला सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोनची पेटेंट फाईल मिळाली आहे ज्यात फोनच्या डिजाईनच्या सूचना लपलेल्या आहेत. हि पेटेंट फाईल यूनाईटेड स्टेट पेटेंट अँड ट्रेडमार्क ऑफिस म्हणजे USPTO च्या डाटाबेस मध्ये मिळाली आहे. या पेटेंट मध्ये सॅमसंग ने अनेक डिजाईन फाईल्सचा समावेश केला आहे. पेटेंट सोबत सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोनच्या डिजाईनचा फोटो पण समोर आला आहे.

पेटेंट वरून झाला खुलासा
प्राप्त पेटेंट मध्ये सॅमसंगचा रोलेबल डिवाईस दाखवण्यात आला आहे. हा डिवाईस अशा डिजाईन वर बनवला जात आहे जी एखाद्या बँड किंवा घड्याळाप्रमाणे गोलाकार असेल. पेटेंटे फाईल मध्ये या डिवाईसचे अनेक फोटोज आहेत. फोटो वरून समजले आहे कि सॅमसंगच्या या डिवाईस मध्ये 20 पेक्षा जास्त हींज दिले जातील जे एकमेकांच्या जवळ असतील. विशेष म्हणजे एखादा स्मार्टफोन याच हींजच्या सपोर्टने बंद होतो किंवा घडी होतो.

सॅमसंगचा हा आगामी डिवाईस पण याच ​हींजेसच्या सपोर्टने रोल होईल. ज्याप्रमाणे एखादा कागद गोल आकारात रोल केला जाऊ शकतो त्याप्रमाणे हा सॅमसंग डिवाईस पण रोल होईल. हा डिवाईस खूप जास्त फ्लेक्सीबल असेल आणि याच खास टेक्नॉलॉजीमुळे सॅमसंग फोन हातावर एखाद्या घड्याळाप्रमाणे किंवा बँड प्रमाणे बांधता येईल. पण पेटेंट मध्ये समोर आलेल्या फोटो वरून समजते कि सॅमसंगच्या या डिवाईसचा डिस्प्ले मोठा असेल, जो सामान्य घड्याळापेक्षा खूप रुंद असेल.

फोटोवरून समजले आहे कि हा डिवाईस फोल्ड केल्यानंतर डिस्प्लेचा भाग त्याच्या इतर भागांना कवर करेल, तसेच फोन उघडल्यावर हा पुन्हा एका सिंगल मोठ्या स्क्रीन मध्ये रूपांतरित होई. सॅमसंगच्या फोल्डेबल फोन मध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत तर या रोलेबल फोन मध्ये एकच डिस्प्ले दिसत आहे. विशेष म्हणजे USPTO वरील हे पेटेंट ऑगस्ट 2017 मधील आहेत जे वेळोवेळी अपडेट केले जात आहेत. नवीन अपडेट मध्ये या डिवाईसचे स्केच फोटोज मिळाले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड
सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर यात 7.3-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोल्ड करून एका छोट्या टॅबलट मध्ये रूपांतरित केला जाऊ शकतो, ज्यामुळे बाहेरील स्क्रीन 4.6-इंचाची होईल. गॅलेक्सी फोल्ड एंडरॉयड 9 पाई वर आधारित सॅमसंगच्या नव्या वनयूआई इंटरफेस वर सादर केला गेला आहे जो 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो.

या फोन मध्ये 6 कॅमेरा आहेत. फोनच्या बॅक आणि फ्रंट दोन्ही पॅनल्स वर तीन कॅमेरा सेंसर आहेत. रियर कॅमेरा सेटअप मध्ये मेन सेंसर 16एमपी चा आहे तो अल्ट्रा वाइडला सपोर्ट करतो आणि हा एफ/2.2 अपच्रर सह येतो. तसेच दुसरा सेंसर 12एमपी चा आहे जो डुअल पिक्सल ऑटोफोकस, ओआईएस ला सपोर्ट करतो. कंपनी ने हा वेरियेबल अपर्चर सह सादर केला आहे. हा एफ/1.5 पासून एफ/2.4 पर्यंत शूट करतो. तर तिसरा सेंसर टेलीफोटो आहे. यात 2एक्स ऑटिकल जूम सपोर्ट आहे.

तसेच फोल्डच्या आत पण 10एमपी चा एक कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 सह येतो. सोबत तुम्हाला सेल्फी साठी फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. मेन सेंसर 10एमपी चा आहे जो एफ2.2 अपर्चर सह येतो. तसेच आरजीबी सेंसर आहे जो डेफ्थ सेंसिंग साठी आहे आणि हा एफ/1.9 अपर्चर वाला आहे. या फोन मध्ये 12जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड मध्ये दोन वेगवेगळ्या बॅटरीज आहेत. या दोन्ही बॅटरीज फोनच्या वेगवेगळ्या डिस्प्लेला पावर देतात. या दोन्ही बॅटरिजची कॅपेसिटी मिळून 4,380एमएएच होते. Galaxy Fold ची किंमत 1,980 डॉलर (जवळपास 1,40,639 रुपये) ठेवण्यात आली आहे.

The post सॅमसंग घेऊन येत आहे कागदाप्रमाणे घडी होणार फोन, बांधता येईल मनगटावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-rollable-display-device-patent-uspto/feed/ 0
सॅमसंग ने दाखवला आपला फोल्डेबल फोन, वीडियो केला जारी! बघा कशाप्रकारे चालेल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-official-video-teaser-specifications-in-hindi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-official-video-teaser-specifications-in-hindi/#respond Fri, 01 Feb 2019 17:48:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3522 किंमत भारतीय करंसी अनुसार 1 लाख 25 हजार रुपयांच्या आसपास असेल

The post सॅमसंग ने दाखवला आपला फोल्डेबल फोन, वीडियो केला जारी! बघा कशाप्रकारे चालेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग 20 फेब्रुवारीला सॅन फ्रांसिस्को मध्ये एक ईवेंट आयोजित करत आहे. बातमी अशी आहे कि या ईवेंट मध्ये गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 लाइट आणि गॅलेक्सी एस10 प्लस सोबतच सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन पण टेक मंचावर येईल. सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनचे अनेक लीक्स आलेले आहेत ज्यात फोनच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. आज सॅमसंगने एक ऑफिशियल वीडियो शेयर केला आहे ज्यात कंपनीचा फोल्डेबल फोन दाखवण्यात आला आहे.

सॅमसंगने एक ​वीडियो शेअर केला आहे ज्यात हा फोल्डेबल फोन दाखवण्यात आला आहे. सॅमसंग ने हा वीडियो आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करण्यासाठी सादर केला आहे ज्यात फोल्डेबल फोन सोबत कंपनीचे इतर डिवाईस पण आहेत. सॅमसंगचा हा वीडियो 1 मिनिटाचा आहे ज्यात दोन ठिकाणी फोल्डेबल फोन दाखवण्यात आला आहे. कंपनी ने हा ऑफिशियली सादर केला नाही किंवा फोल्डेबल फोनचे नाव पण सांगितलेले नाही.

सॅमसंगच्या वीडियो मध्ये फोल्डेबल फोन एका तरुणीच्या हातात दाखवण्यात आला आहे. तरुणी हा फोन पुस्तकाप्रमाणे उघडते. पुस्तकाच्या कवर प्रमाणे या फोल्डेबल फोनचा कवर मोबाईलच्या डिस्प्ले सारखा दिसला आहे ज्यावर शार्टकट मेनू आहे. हा कवर फोल्डेबल फोनची मुख्य स्क्रीन म्हणता येईल. या मेन डिस्प्ले वर बेजल लेस ​स्क्रीन देण्यात आली आहे. डिस्प्ले वर कोणताही कॅमेरा सेंसर किंवा नॉच दिसत नाही. डिस्प्लेच्या चारही बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे.

या वीडियो मध्ये फोन उघडल्यानंतर आतून प्रकाश आला आहे जो फोनचा सेकेंडरी डिस्प्ले असू शकतो. याच सेकेंडरी डिस्प्लेच्या उजवीकडे फुलव्यू स्क्रीन दिसत आहे तथा तिथेही कोणतीही नॉच किंवा कॅमेरा सेंसर देण्यात आलेला नाही. वीडियो बघून वाटले कि सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन उघल्यावर डावीकडील पॅनल जास्त पातळ आहे तर उजवीकडील पॅनलची जाडी थोडी जास्त आहे.

या फोल्डेबल फोनच्या बॅक पॅनल वर डिस्प्ले असेल कि नाही हे या वीडियो मध्ये स्पष्ट झाले नाही. या पॅनल वर रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्यामुळे सॅमसंगच्या फोल्डेबल फोन मध्ये सेल्फी कशी घेता येईल हे स्पष्ट झाले नाही. काही दिवसांपूर्वी लीक्स मध्ये सांगण्यात आले होते कि सॅमसंग आपला फोल्डेबल फोन 7.3-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करू शकते जो घडी झाल्यानंतर 4-इंचाच्या सेकेंडरी डिस्प्ले मध्ये रूपांतरित होईल.

सॅमसंग फोल्डेबल फोन बद्दल बोलले जात आहे कि फोन मध्ये 512जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल तसेच हा फोन क्वालकॉमच्या आगामी सर्वात नवीन आणि ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालेल. विशेष म्हणजे एक विदेशी मीडिया रिपोर्ट नुसार सॅमसंग आपला फोल्डेबल फोन 2 मिलियन वॉन मध्ये लॉन्च करेल. हि किंमत भारतीय करंसी अनुसार 1 लाख 25 हजार रुपयांच्या आसपास असेल. सध्यातरी सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनसाठी 20 फेब्रुवारीच्या वाट बघितली जात आहे.

The post सॅमसंग ने दाखवला आपला फोल्डेबल फोन, वीडियो केला जारी! बघा कशाप्रकारे चालेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-official-video-teaser-specifications-in-hindi/feed/ 0
डायरी प्रमाणे घडी होणाऱ्या सॅमसंगच्या फोल्डेबल फोनचा लॉन्च आला जवळ, नवी माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-galaxy-f-clears-cmiit-certification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-galaxy-f-clears-cmiit-certification-in-marathi/#respond Fri, 18 Jan 2019 08:08:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3409 20 फेब्रुवारीला अमेरिकेतील सॅन फ्रँसिस्को मध्ये या स्मार्टफोनचा अनपॅक्ड इवेंट आयोजित केला जाऊ शकतो.

The post डायरी प्रमाणे घडी होणाऱ्या सॅमसंगच्या फोल्डेबल फोनचा लॉन्च आला जवळ, नवी माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियाच्या इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगच्या अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोनची माहिती बऱ्याच दिवसांपासून येत आहे. कंपनी ने गेल्यावर्षी आयोजित डेवलपर्स कांफ्रेंस मध्ये हा फोलडेबल फोन दाखवला होता. आतापर्यंत आलेल्या रिपोर्ट्स नुसार हा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एफ नावाने 20 जानेवारीला ऑफिशियली लॉन्च केला जाईल. आत इंटरनेट वर एक नवा खुलासा झाला आहे, ज्यात चीनच्या सीएआईआईटी च्या वेबसाइट वर हा दिसला आहे.

साइट वरून समजले आहे कि सॅमसंगचा एक स्मार्टफोन, ज्याचा मॉडेल नंबर SM-F9000 आहे, सीएमआईआईटी द्वारा प्रमाणित करण्यात आला आहे. ज्यावरून अंदाज लावला जात आहे कि हा सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन असेल. या सर्टिफिकेशन वारू असे समोर आले आहे कि अमेरिका आणि यूरोप सोबतच सॅमसंग फोल्डेबल फ्लॅगशिप चीन मध्ये पण लॉन्च केला जाईल, जो जगातील सर्वात मोठा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे.

20 फेब्रुवारीला अमेरिकेतील सॅन फ्रँसिस्को मध्ये या स्मार्टफोनचा अनपॅक्ड इवेंट आयोजित केला जाऊ शकतो. या इवेंट मध्ये कंपनी आपल्या एस10 सीरीजच्या स्मार्टफोन सोबत फोल्डेबल आणि 5जी फोन सादर करू शकते. कंपनी ने लॉन्च होणाऱ्या डिवाइस बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही.

काही दिवसांपूर्वी या फोल्डेबल स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल माहिती लीक झाली होती, ज्यात सांगण्यात आले होते कि यात 4,400mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. या स्मार्टफोनचे संभावित फीचर पाहता यात दोन स्क्रीन दिल्या जाऊ शक्यता. एक इनर स्क्रीन आणि एक आउटर स्क्रीन. याचा कवर डिस्प्ले 4.58 इंचाचा असू शकतो ज्याचा आसपेक्ट रेश्यो 21:9 असेल. या प्राइमरी म्हणजे मेन डिस्प्ले पाहता हा 7.3 इंचाचा असू शकतो. ज्याचे रिजोल्यूशन 1536X2152 दिले जाऊ शकते.

The post डायरी प्रमाणे घडी होणाऱ्या सॅमसंगच्या फोल्डेबल फोनचा लॉन्च आला जवळ, नवी माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-galaxy-f-clears-cmiit-certification-in-marathi/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे अगदी नवीन ‘गॅलेक्सी एफ’ सीरीज, डायरी प्रमाणे बंद होणार फोल्डेबल फोन या महिन्यात होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-galaxy-f-series-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-galaxy-f-series-in-marathi/#respond Fri, 02 Nov 2018 07:29:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2766 सॅमसंग फोल्डेबल फोन कसा दिसेल तसेच याचे नाव काय असेल हे अजून आॅफिशियल झाले नाही.

The post सॅमसंग घेऊन येत आहे अगदी नवीन ‘गॅलेक्सी एफ’ सीरीज, डायरी प्रमाणे बंद होणार फोल्डेबल फोन या महिन्यात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग च्या फोल्डेबल फोनची अनेक वर्षांपासून चालू आहे. आधी लीक्स समोर येत होते ज्यात फोनच्या डिजाईन आणि लुक संबंधित माहिती दिली जात होती. पण गेल्या महिन्यात सॅमसंग फोल्डेबल फोन बद्दल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी डी जे कोह यांनी विधान केल्यामुळे या फोनची चर्चा अजूनच वाढली आहे. सॅमसंग फोल्डेबल फोन कसा दिसेल तसेच याचे नाव काय असेल हे अजून आॅफिशियल झाले नाही. पण फोल्डेबल फोन संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि सॅमसंग हा फोल्डेबल फोन ‘गॅलेक्सी एफ’ सीरीज मध्ये लॉन्च करेल.

सॅम मोबाईल ने सॅमसंग च्या फोल्डेबल फोन बद्दल एक्सक्लूसिव बातमी दिली आहे. या रिपोर्ट अनुसार सॅमसंग या फोल्डेबल फोन साठी एक नवीन स्मार्टफोन सीरीज घेऊन येणार आहे जिचे नाव गॅलेक्सी एफ सीरीज असेल आणि या सीरीज अंतर्गत कंपनीचा फोल्डेबल फोन लॉन्च होईल. रिपोर्ट अनुसार या महिन्यात आयोजित होणाऱ्या एसडीसी 2018 मध्ये सॅमसंग आपला हा फोन जागासमोर अनु शकते आणि हा टेक मंचावर सादर करू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी एफ सीरीजच्या या फोल्डेबल फोनचा मॉडेल नंबर या रिपोर्ट मध्ये एसएम-एफ900यू सांगण्यात आला आहे. रिपोर्ट अनुसार सॅमसंग आपल्या फोल्डेबल फोन साठी एक वेगळा एंडरॉयड यूजर इंटरफेस बनवत आहे जो खूप यूनिक असेल. या एंडरॉयड यूआई साठी सॅमसंग कंपनी गूगल सोबत मिळून काम करत आहे. सॅमसंग फोल्डेबल फोन बद्दल बोलले जात आहे कि फोन मध्ये 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल.

सॅमसंग चे वरिष्ठ अधिकारी डी जे कोह यांनी एका इंटरव्यू मध्ये सांगितले आहे कि कंपनीचा फोल्डेबल डिवाईस टॅबलेट आणि फोन दोन्हींचे काम करेल. हा डिवाईस टॅबलेटच्या आकाराचा असेल पण यूजर याला फोल्ड करून म्हणजेच घडी करून एखाद्या फोन प्रमाणे आपल्या खिशात ठेऊ शकतील. कोह यांच्या अनुसार सॅमसंगचा फोल्डेबल डिवाईस यूजर्सना मल्टीटास्क करण्यास खूप उपयोगी पडेल.

सॅमसंग चे म्हणणे आहे कि हा डिवाईस मल्टी टास्किंग सोबतच इजी पॉर्टबिलिटी वाला असेल. म्हणजे यूजर्स टॅबलेट म्हणून यावर त्यांची कामे करू शकतील आणि एखाद्या सामान्य फोन प्रमाणे हा खिशात ठेवता येईल. सॅमसंग काही दिवसांनी होणाऱ्या आपल्या वार्षिक कॉफ्रेंस मध्ये हा फोल्डेबल फोन शोकेस करेल जो पुढल्या वर्षी बाजारात लॉन्च होईल अशी अशा आहे.

The post सॅमसंग घेऊन येत आहे अगदी नवीन ‘गॅलेक्सी एफ’ सीरीज, डायरी प्रमाणे बंद होणार फोल्डेबल फोन या महिन्यात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-galaxy-f-series-in-marathi/feed/ 0
टॅबलेटच्या आकाराचा असेल आणि घडी करून खिशात ठेवता येईल सॅमसंगचा फोल्डेबल फोन : सीईओ https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-will-transform-from-tablet-to-phone-d-j-koh-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-will-transform-from-tablet-to-phone-d-j-koh-in-marathi/#respond Fri, 12 Oct 2018 12:33:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2483 सॅमसंगच्या अधिकाऱ्याने आपल्या मुलाखतीती सांगितले आहे कि, आम्ही असा प्रॉडक्ट बनवू इच्छित नाही जो ग्राहकांना विकल्यांनंतर त्यांना चांगला अनुभव देऊ शकणार नाही.

The post टॅबलेटच्या आकाराचा असेल आणि घडी करून खिशात ठेवता येईल सॅमसंगचा फोल्डेबल फोन : सीईओ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग एक फोल्डेबल फोन बनवत आहे सर्व स्मार्टफोन यूजर्सना माहित आहे. सॅमसंगच्या या फोल्डेबल स्मार्टफोन बद्दल ऐकून एक वर्ष झाले पण अजूनही कंपनी ने आपला अनोखा प्रोडक्ट सदर केला नाही. सॅमसंग फोल्डेबल फोन बद्दल आता पर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या डिजाईन आणि याच्या डिस्प्ले बद्दल अनेक गोष्टी वाचनात आल्या आहेत. पण आता स्वतः सॅमसंग मोबाइल बिजनेस चे सीईओ डी जे कोह ने सॅमसंग फोल्डेबल फोन संबंधित मोठे विधान केले आहे.

सॅमसंगचे वरिष्ठ अधिकारी डी जे कोह ने कंपनीच्या आगामी फोल्डेबल फोनच्या डिजाईन बद्दल मोठा खुलासा केला आहे. कोह ने सीनेटला दिलेल्या एका मुलाखतीती सांगितले आहे कि कंपनीचा फोल्डेबल डिवाईस टॅबलेट आणि फोन दोन्हीचे काम करेल. हा डिवाईस टॅबलेटच्या आकाराचा असेल पण यूजर याला फोल्ड म्हणजे घडी करून एखाद्या फोन प्रमाणे आपल्या खिशात ठेवू शकतील.

कोह नुसार सॅमसंगचा फोल्डेबल डिवाईस यूजर्सना मल्टीटास्क करण्यास उपयोगी पडेल. कोह ने सांगितले आहे कि हा डिवाईस मल्टी टास्किंग सोबत इझी पॉर्टबिलिटी सह येईल. म्हणजे यूजर्स टॅबलेट म्हणून यावर आपली कामे करू शकतील आणि एखाद्या फोन प्रमाणे याला खिशात ठेऊन फिरू पण शकतील. सीनेटला कोह ने सांगितले आहे कि हा फोल्डेबल फोन यूजर्सच्या उपयोगी पडणे गरजेचे आहे आणि याचीच काळजी आम्ही घेत आहोत.

सॅमसंगच्या अधिकाऱ्याने आपल्या मुलाखतीती सांगितले आहे कि, आम्ही असा प्रॉडक्ट बनवू इच्छित नाही जो ग्राहकांना विकल्यांनंतर त्यांना चांगला अनुभव देऊ शकणार नाही. आम्ही असे काहीच करणार नाही ज्यामुळे प्रॉडक्ट बाजारात आल्यानंतर 6 ते 9 महिन्यात त्याची निर्मिती बंद होईल.

कोह यांनी सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन कधी येईल याची माहिती दिली नाही. पण ते म्हणाले कि जेव्हा आम्ही फोल्डेबल फोन घेऊन येऊ तेव्हा तो आमच्या युजर्ससाठी महत्वपूर्ण असेल. ज्यात यूजर एक्सपीरियंस सॅमसंगच्या मापदंडानुसार मिळत नाही असा कोणताही प्रॉडक्ट बाजारात आणायला मला आवडणार नाही.

सॅमसंग सीईओ आणि सीनेट मध्ये झालेल्या या चर्चेतून हे स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग फक्त आपल्या फोल्डेबल फोन कडून अपेक्षा ठेऊन आहे असे नाही तर सोबतच आपल्या फॅन्सना ते एक दर्जेदार डिवाईस देऊ इच्छित आहेत. आशा आहे कि सॅमसंग लवकरच आपला अनोखा फोन जगासमोर सादर करेल.

The post टॅबलेटच्या आकाराचा असेल आणि घडी करून खिशात ठेवता येईल सॅमसंगचा फोल्डेबल फोन : सीईओ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-phone-will-transform-from-tablet-to-phone-d-j-koh-in-marathi/feed/ 0