सॅमसंग घेऊन येत आहे कागदाप्रमाणे घडी होणार फोन, बांधता येईल मनगटावर

सॅमसंगने फेब्रुवारीत आपला बहुप्रतीक्षित फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Fold सादर केला होता. सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन एखाद्या डायरी प्रमाणे बंद होतो. या फोनने टेक मंचावर येताच सर्वांचे लक्ष वेधले. Galaxy Fold बद्दल टेक एक्सपर्ट्स कडून संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. हा शानदार डिवाईस सादर केल्यानंतर सॅमसंग थांबणार नाही. आता बातमी समोर येत आहे कि सॅमसंग अजून एक अशाच अनोख्या स्मार्टफोन वर काम करत आहे जो एखाद्या डायरी नव्हे तर मनगटावरील घड्याळाप्रमाणे वाकेल.

91मोबाईल्स ने सॅमसंगच्या या अनोख्या डिवाईसची माहिती दिली आहे. 91मोबाईल्सला सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोनची पेटेंट फाईल मिळाली आहे ज्यात फोनच्या डिजाईनच्या सूचना लपलेल्या आहेत. हि पेटेंट फाईल यूनाईटेड स्टेट पेटेंट अँड ट्रेडमार्क ऑफिस म्हणजे USPTO च्या डाटाबेस मध्ये मिळाली आहे. या पेटेंट मध्ये सॅमसंग ने अनेक डिजाईन फाईल्सचा समावेश केला आहे. पेटेंट सोबत सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोनच्या डिजाईनचा फोटो पण समोर आला आहे.

पेटेंट वरून झाला खुलासा
प्राप्त पेटेंट मध्ये सॅमसंगचा रोलेबल डिवाईस दाखवण्यात आला आहे. हा डिवाईस अशा डिजाईन वर बनवला जात आहे जी एखाद्या बँड किंवा घड्याळाप्रमाणे गोलाकार असेल. पेटेंटे फाईल मध्ये या डिवाईसचे अनेक फोटोज आहेत. फोटो वरून समजले आहे कि सॅमसंगच्या या डिवाईस मध्ये 20 पेक्षा जास्त हींज दिले जातील जे एकमेकांच्या जवळ असतील. विशेष म्हणजे एखादा स्मार्टफोन याच हींजच्या सपोर्टने बंद होतो किंवा घडी होतो.

सॅमसंगचा हा आगामी डिवाईस पण याच ​हींजेसच्या सपोर्टने रोल होईल. ज्याप्रमाणे एखादा कागद गोल आकारात रोल केला जाऊ शकतो त्याप्रमाणे हा सॅमसंग डिवाईस पण रोल होईल. हा डिवाईस खूप जास्त फ्लेक्सीबल असेल आणि याच खास टेक्नॉलॉजीमुळे सॅमसंग फोन हातावर एखाद्या घड्याळाप्रमाणे किंवा बँड प्रमाणे बांधता येईल. पण पेटेंट मध्ये समोर आलेल्या फोटो वरून समजते कि सॅमसंगच्या या डिवाईसचा डिस्प्ले मोठा असेल, जो सामान्य घड्याळापेक्षा खूप रुंद असेल.

फोटोवरून समजले आहे कि हा डिवाईस फोल्ड केल्यानंतर डिस्प्लेचा भाग त्याच्या इतर भागांना कवर करेल, तसेच फोन उघडल्यावर हा पुन्हा एका सिंगल मोठ्या स्क्रीन मध्ये रूपांतरित होई. सॅमसंगच्या फोल्डेबल फोन मध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत तर या रोलेबल फोन मध्ये एकच डिस्प्ले दिसत आहे. विशेष म्हणजे USPTO वरील हे पेटेंट ऑगस्ट 2017 मधील आहेत जे वेळोवेळी अपडेट केले जात आहेत. नवीन अपडेट मध्ये या डिवाईसचे स्केच फोटोज मिळाले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड
सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर यात 7.3-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोल्ड करून एका छोट्या टॅबलट मध्ये रूपांतरित केला जाऊ शकतो, ज्यामुळे बाहेरील स्क्रीन 4.6-इंचाची होईल. गॅलेक्सी फोल्ड एंडरॉयड 9 पाई वर आधारित सॅमसंगच्या नव्या वनयूआई इंटरफेस वर सादर केला गेला आहे जो 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो.

या फोन मध्ये 6 कॅमेरा आहेत. फोनच्या बॅक आणि फ्रंट दोन्ही पॅनल्स वर तीन कॅमेरा सेंसर आहेत. रियर कॅमेरा सेटअप मध्ये मेन सेंसर 16एमपी चा आहे तो अल्ट्रा वाइडला सपोर्ट करतो आणि हा एफ/2.2 अपच्रर सह येतो. तसेच दुसरा सेंसर 12एमपी चा आहे जो डुअल पिक्सल ऑटोफोकस, ओआईएस ला सपोर्ट करतो. कंपनी ने हा वेरियेबल अपर्चर सह सादर केला आहे. हा एफ/1.5 पासून एफ/2.4 पर्यंत शूट करतो. तर तिसरा सेंसर टेलीफोटो आहे. यात 2एक्स ऑटिकल जूम सपोर्ट आहे.

तसेच फोल्डच्या आत पण 10एमपी चा एक कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 सह येतो. सोबत तुम्हाला सेल्फी साठी फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. मेन सेंसर 10एमपी चा आहे जो एफ2.2 अपर्चर सह येतो. तसेच आरजीबी सेंसर आहे जो डेफ्थ सेंसिंग साठी आहे आणि हा एफ/1.9 अपर्चर वाला आहे. या फोन मध्ये 12जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड मध्ये दोन वेगवेगळ्या बॅटरीज आहेत. या दोन्ही बॅटरीज फोनच्या वेगवेगळ्या डिस्प्लेला पावर देतात. या दोन्ही बॅटरिजची कॅपेसिटी मिळून 4,380एमएएच होते. Galaxy Fold ची किंमत 1,980 डॉलर (जवळपास 1,40,639 रुपये) ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here