डायरी प्रमाणे घडी होणाऱ्या सॅमसंगच्या फोल्डेबल फोनचा लॉन्च आला जवळ, नवी माहिती आली समोर

साउथ कोरियाच्या इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगच्या अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोनची माहिती बऱ्याच दिवसांपासून येत आहे. कंपनी ने गेल्यावर्षी आयोजित डेवलपर्स कांफ्रेंस मध्ये हा फोलडेबल फोन दाखवला होता. आतापर्यंत आलेल्या रिपोर्ट्स नुसार हा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एफ नावाने 20 जानेवारीला ऑफिशियली लॉन्च केला जाईल. आत इंटरनेट वर एक नवा खुलासा झाला आहे, ज्यात चीनच्या सीएआईआईटी च्या वेबसाइट वर हा दिसला आहे.

साइट वरून समजले आहे कि सॅमसंगचा एक स्मार्टफोन, ज्याचा मॉडेल नंबर SM-F9000 आहे, सीएमआईआईटी द्वारा प्रमाणित करण्यात आला आहे. ज्यावरून अंदाज लावला जात आहे कि हा सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन असेल. या सर्टिफिकेशन वारू असे समोर आले आहे कि अमेरिका आणि यूरोप सोबतच सॅमसंग फोल्डेबल फ्लॅगशिप चीन मध्ये पण लॉन्च केला जाईल, जो जगातील सर्वात मोठा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे.

20 फेब्रुवारीला अमेरिकेतील सॅन फ्रँसिस्को मध्ये या स्मार्टफोनचा अनपॅक्ड इवेंट आयोजित केला जाऊ शकतो. या इवेंट मध्ये कंपनी आपल्या एस10 सीरीजच्या स्मार्टफोन सोबत फोल्डेबल आणि 5जी फोन सादर करू शकते. कंपनी ने लॉन्च होणाऱ्या डिवाइस बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही.

काही दिवसांपूर्वी या फोल्डेबल स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल माहिती लीक झाली होती, ज्यात सांगण्यात आले होते कि यात 4,400mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. या स्मार्टफोनचे संभावित फीचर पाहता यात दोन स्क्रीन दिल्या जाऊ शक्यता. एक इनर स्क्रीन आणि एक आउटर स्क्रीन. याचा कवर डिस्प्ले 4.58 इंचाचा असू शकतो ज्याचा आसपेक्ट रेश्यो 21:9 असेल. या प्राइमरी म्हणजे मेन डिस्प्ले पाहता हा 7.3 इंचाचा असू शकतो. ज्याचे रिजोल्यूशन 1536X2152 दिले जाऊ शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here