Samsung Galaxy A30 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एक्सक्लूसिव: कमी होणार आहेत सॅमसंग फोन्सच्या किंमत, दिवाळीच्या आधी येईल हि ऑफर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-a60-a90-launch-live-how-to-watch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-a60-a90-launch-live-how-to-watch/#respond Tue, 10 Sep 2019 10:37:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5265 ऑनलाइन स्टोरच्या माध्यमातून 2 मिलियन फोन विकण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे

The post एक्सक्लूसिव: कमी होणार आहेत सॅमसंग फोन्सच्या किंमत, दिवाळीच्या आधी येईल हि ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही दिवसांपासून सॅमसंगचे फोन्स खुप चर्चेत आहेत. बातमी अशी आहे कि कंपनी लवकरच गॅलेक्सी एम30एस, गॅलेक्सी ए50एस आणि गॅलेक्सी ए30एस सहित अनेक फोन्स लॉन्च करू शकते. आज आम्हाला सॅमसंग फोन बद्दल काही खास माहिती मिळाली आहे. 91मोबाईल्सला मिळालेल्या माहिती नुसार सॅमसंग लवकरच आपल्या अनेक फोन्सच्या किंमती मोठ्याप्रमाणावर कमी करू शकते, खासकरून ए सीरीज आणि एम सीरीजचे सर्व फोन्स. कंपनी हि ऑफर दिवाळीच्या आधी देण्याची तयारी करत आहे. आम्हाला हि माहिती इंडस्ट्री मधील अशा सोर्स कडून मिळाली जो सॅमसंग प्लानिंग आणि योजनांशी अनेक संबंधित आहे.

त्यांनी सांगितले कि ”सॅमसंग द्वारे फोनच्या किंमती करण्याचे दोन कारण आहेत. एक दिवाळीच्या काळात भारतात सर्वात जास्त खरेदी होते आणि याच काळात ऑर देऊन कंपनी जास्तीत जास्त लोक जोडू इच्छित आहे. दुसरे आणि मोठे कारण आहे ए सीरीज आणि एम सीरीज मध्ये नवीन फोन्स येत आहेत. लवकरच संपूर्ण गॅलेक्सी ए आणि एम सीरीजचा पोर्टफोलियो बदलला जाणार आहे आणि या फोन्सची किंमत तीच असेल ज्या किंमतीत हे जुने फोन्स आता विकले जात आहेत. त्यामुळे जुन्या फोन्सच्या किंमती कमी करून कंपनी त्याजागी नवीन फोन आणेल.”

अलीकडेच सॅमसंगचे सिनियर वाइस प्रसिडेंट, स्मार्टफोन बिजनेस, असीम वारसी यांनी 91मोबाईल्स सोबत झालेल्या मुलाखतीती म्हणले होते कि ”पुढील काही आठवड्यांत भारतात फक्त ऑनलाइन स्टोरच्या माध्यमातून 2 मिलियन फोन विकण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे जे जवळपास 3,000 कोटींच्या किंमतीचे असतील. या ऑनलाइन बिजनेस मध्ये तसे तर सॅमसंगचे सर्व फोन मॉडेल असतील पण मुख्य योगदान सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचे असेल.”

जरी त्यांनी तेव्हा फक्त ऑनलाइन बद्दल माहिती दिली असली तरी तुम्हाला तर माहीतच आहे कि आजपण सॅमसंग मोबाईल्सच्या एकूण सेल मध्ये ऑफलाईनचे योगदान जास्त मोठे आहे. त्यामुळे ऑफलाइन मध्ये कंपनीची तयारी अजून मोठी असेल.

माहिती नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30, गॅलेक्सी ए20, गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी एम20, गॅलेक्सी एम30 आणि गॅलेक्सी एम10 च्या किंमती कमी करणार आहे. त्याचबरोबर जुने जसे कि गॅलेक्सी एस10 आणि एस10 प्लस, गॅलेक्सी एस9 आणि एस9 प्लस सह अनेक फोन्सचा समावेश असेल.

The post एक्सक्लूसिव: कमी होणार आहेत सॅमसंग फोन्सच्या किंमत, दिवाळीच्या आधी येईल हि ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-a60-a90-launch-live-how-to-watch/feed/ 0
सॅमसंगचा धमाका : Galaxy A20, Galaxy A30 आणि Galaxy M20 वर मिळत आहे मोठा डिस्काउंट, इथे आहेत संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-a30-m20-offer-discount-price-drop-sale-availability/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-a30-m20-offer-discount-price-drop-sale-availability/#respond Thu, 02 May 2019 10:24:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4208 गॅलेक्सी ए सीरीजच्या Galaxy A20 आणि Galaxy A30 स्मार्टफोन सोबत Galaxy M20 1,500 रुपयांपर्यंत रुपये स्वस्तात विकला जाईल.

The post सॅमसंगचा धमाका : Galaxy A20, Galaxy A30 आणि Galaxy M20 वर मिळत आहे मोठा डिस्काउंट, इथे आहेत संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने भारतात आपली गॅलेक्सी ए आणि गॅलेक्सी एम सीरीज अंतर्गत एकापेक्षा एक लॉन्च केले आहेत. या दोन्ही सीरीज अश्या स्मार्टफोन्स सहयेतात जे कमी किंमतीत यूजर्सना शानदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स देतात. आपल्या फॅन्सना अजून एक भेट देत सॅमसंगने या दोन्ही सीरीजच्या हिट स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. सॅमसंगने खास ऑफर्सची सुरवात केली आहे ज्यात गॅलेक्सी ए सीरीजच्या Galaxy A20 आणि Galaxy A30 स्मार्टफोन सोबत Galaxy M20 1,500 रुपयांपर्यंत रुपये स्वस्तात विकला जाईल.

गॅलेक्सी ए सीरीज
आधी सॅमसंग द्वारा गॅलेक्सी ए सीरीज वर चालू असलेल्या ऑफर बद्दल बोलायचे तर या अंतर्गत Galaxy A20 आणि Galaxy A30 च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतात एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केले आहेत. Galaxy A20 सॅमसंग द्वारा 12,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच Galaxy A30 कंपनीने 16,990 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे.

सॅमसंग आता Special Support स्कीम अंतर्गत हे दोन्ही स्मार्टफोन्स स्वस्तात विकत आहे. कंपनीने Galaxy A30 च्या किंमतीत थेट 1,500 रुपये आणि Galaxy A20 च्या किंमतीत 1,000 रूपयांची कपात केली आहे. या प्राइज कट नंतर Galaxy A30 15,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल तर Galaxy A20 11,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

गॅलेक्सी एम सीरीज
गॅलेक्सी ए सीरीज प्रमाणे सॅमसंग ने गॅलेक्सी एम सीरीज चा Galaxy M20 पण 1,000 रुपयांनी स्वस्त केला आहे. हा स्मार्टफोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता Galaxy M20 चा 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता फोन मध्ये 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 12,990 होती. आता सॅमसंगच्या खास ऑफर अंतर्गत फोन मध्ये 3जीबी रॅम वेरिएंट फक्त 9,990 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

कुठून आणि केव्हा विकत घ्यावा
सॅमसंगने गॅलेक्सी ए सीरीज Galaxy A20 आणि Galaxy A30 स्मार्टफोन ऑनलाईन प्लॅटफार्म सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर विकला जात आहे. कंपनी ने सादर केलेली नवीन ऑफर आज म्हणजे 2 मे पासून सुरू झाली आहे जी 15 मे पर्यंत चालेल या काळात हे दोन्ही स्मार्टफोन स्वस्तात सेल साठी उपलब्ध होतील.

Galaxy A20
Samsung Galaxy M20 बद्दल बोलायचे तर कंपनी ने हे स्मार्टफोन सॅमसंग वेबसाइट व्यतिरिक्त फक्त शॉपिंग साइट अमेजॉन वर उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑफर अंतर्गत मिळणार्‍या प्राइज कट व्यतिरिक्त एसबीआई बँक कार्डने शॉपिंग केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळेल. तसेच हा फोन 6 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआई वर पण विकत घेता येईल. हे फोन 4 मे पासून 6 मे पर्यंत या ऑफर अंतर्गत सेल साठी उपलब्ध होतील.

The post सॅमसंगचा धमाका : Galaxy A20, Galaxy A30 आणि Galaxy M20 वर मिळत आहे मोठा डिस्काउंट, इथे आहेत संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-a30-m20-offer-discount-price-drop-sale-availability/feed/ 0
सॅमसंग ने केली कमाल, फक्त 40 दिवसांत विकले 20 लाख A सीरीजचे स्मार्टफोन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-sold-2-million-galaxy-a-series-smartphones-in-40-days/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-sold-2-million-galaxy-a-series-smartphones-in-40-days/#respond Tue, 16 Apr 2019 14:23:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4119 कंपनीनुसार फक्त 40 दिवसांत Samsung Galaxy A सीरीजच्या 20 लाख यूनिट्सची विक्री झाली आहे.

The post सॅमसंग ने केली कमाल, फक्त 40 दिवसांत विकले 20 लाख A सीरीजचे स्मार्टफोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने अलीकडेच आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये Galaxy A80 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता पर्यंत या सीरीज मध्ये कंपनीने आपले 6 हँडसेट लॉन्च केले आहेत. तर आता सॅमसंग ने दावा केला आहे कि 1 मार्चला लॉन्च झालेल्या ए सीरीजच्या स्मार्टफोन्सनी विक्रीचे नवीन रेकॉर्ड केले आहेत. कंपनीनुसार फक्त 40 दिवसांत Samsung Galaxy A सीरीजच्या 20 लाख यूनिट्सची विक्री झाली आहे.

तसेच या विक्रीतून कंपनीने 50 कोटी डॉलर (जवळपास 3,500 कोटी रुपये) ची कमाई केली आहे. याची माहिती सॅमसंग इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर रंजीवजीत सिंह यांनी दिली. रंजीवजीत म्हणाले “आम्ही आमच्यासाठी जे लक्ष्य निर्धारित केले होते त्यापेक्षा पुढे आम्ही जात आहोत.”

हे देखील वाचा: शाओमीचा दमदार Redmi Y3 भारतात लॉन्च साठी तयार, जाणून घ्या याबद्दल सर्वकाही

रंजीवजीत सिंह म्हणतात, ‘A50, A30 आणि A10 स्मार्टफोनला मेट्रो सिटी आणि छोट्या शहरांमधून चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. गेल्या 40 दिवसांत आम्ही 2 मिलियन (20 लाख) यूनिट्स विकले ज्यातून 500 मिलियन डॉलर्सचा (जवळपास 3,500 कोटी रुपये) सेल झाला.’ विशेष म्हणजे शाओमीला टक्कर देण्यासाठी सॅमसंग लवकरच भारतात सॅमसंग गॅलेक्सी A80, A70 लॉन्च करेल.

Galaxy A70 बद्दल बोलायचे तर कंपनीच्या वेबसाइट वर डिवाइसच्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती आली आहे. पण या लिस्टिंग मध्ये किंमतीचा उल्लेख नाही, अशा आहे कि कंपनी लवकरच भारतात एका इवेंटचे आयोजन करून या फोनची किंमत सांगेल.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधी बघा Realme 3 Pro मध्ये काय असेल खास

या डिवाइसच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर Samsung Galaxy A70 मध्ये 3D ग्लास्टिक डिजाइन, वॉटर ड्रॉप नॉच आणि बॉटमला बारीक चिन देण्यात आली आहे. तसेच फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे जो वर्टिकली शेप मध्ये आहे. तसेच फोन मध्ये उजवीकडे वॉल्यूम आणि पॉवर बटण आहे.

सोर्स: पीटीआई

The post सॅमसंग ने केली कमाल, फक्त 40 दिवसांत विकले 20 लाख A सीरीजचे स्मार्टफोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-sold-2-million-galaxy-a-series-smartphones-in-40-days/feed/ 0
शाओमीला टक्कर देईल सॅमसंगचा हा खास स्मार्टफोन, यात आहे 4000 एमएएच ची दमदार बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-launch-in-india-with-4000mah-battery-with-3gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-launch-in-india-with-4000mah-battery-with-3gb-ram-in-marathi/#respond Thu, 28 Feb 2019 11:38:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3744 कंपनी ने ए सीरीजचे हे स्मार्टफोन मुंबई मध्ये आयोजित एक इवेंट मध्ये सादर केले आहेत.

The post शाओमीला टक्कर देईल सॅमसंगचा हा खास स्मार्टफोन, यात आहे 4000 एमएएच ची दमदार बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने आज आपल्या गॅलेक्सी ए सीरीजचे स्मार्टफोन्स भारतात लॉन्च केले आहेत. सॅमसंगने आपल्या या सीरीज अंतर्गत गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनी ने ए सीरीजचे हे स्मार्टफोन मुंबई मध्ये आयोजित एक इवेंट मध्ये सादर केले आहेत.

कंपनीने गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 स्मार्टफोन आधीच सादर केले आहेत. सॅमसंगची नवीन गॅलेक्सी ए-सीरीजचे स्मार्टफोन इनफिनिटी-यू आणि इनफिनिटी-वी डिस्प्ले पॅनल सह सादर केले गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया ए10 स्मार्टफोनची भारतीय किंमत आणि याचे स्पेसिफिकेशंस.

सॅमसंगने भारतात आणले दोन दमदार फोन गॅलेक्सी ए50 आणि ए30, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम

किंमत आणि उपलब्धता
गॅलेक्सी ए10 च्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरीएंटची किंमत 8,490 रुपये आहे. कंपनी हा डिवाइस 20 मार्चपासून सॅमसंग ऑनलाइन स्टोर सोबत सर्व मोठ्या ई-कॉमर्स साइट वर सेल साठी उपलब्ध करेल. गॅलेक्सी10 ची बॉडी प्लास्टिकची असल्याचा दावा आहे. हा ब्लॅक आणि गोल्ड रंगात उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए10 चे स्पेसिफिकेशन्स
याचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.2 इंचाचा एचडी+ इनफिनिटी वी डिस्प्ले आणि एक्सीनॉस 7884बी ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. गरज पडल्यास माइक्रोएसडी कार्ड पण वापरला जाऊ शकतो.

शाओमीचा नवीन स्ट्रोक : रेडमी नोट 7 प्रो झाला भारतात लॉन्च, सोबत आला रेडमी नोट 7

याव्यतिरिक्त सॅमसंग गॅलेक्सी ए10 मध्ये मागील बाजूस एफ/ 1.9 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. फ्रंट पॅनल वर एफ/ 2.0 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेंसर दिला जाईल. याची बॅटरी 4,000 एमएएच ची असेल. या फोन मध्ये कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही. फोन अनलॉक करण्यासाठी फेस अनलॉक फीचर वापरता येईल. तसेच चार्जिंग आणि डेटा ट्रांसफर साठी यात माइक्रो-यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

The post शाओमीला टक्कर देईल सॅमसंगचा हा खास स्मार्टफोन, यात आहे 4000 एमएएच ची दमदार बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-launch-in-india-with-4000mah-battery-with-3gb-ram-in-marathi/feed/ 0
सॅमसंगने भारतात आणले दोन दमदार फोन गॅलेक्सी ए50 आणि ए30, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50-a30-launched-in-india-price-specifications-feature-sale-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50-a30-launched-in-india-price-specifications-feature-sale-in-marathi/#respond Thu, 28 Feb 2019 09:47:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3741 सॅमसंग ने गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी 30 भारतीय बाजारात आणले आहेत.

The post सॅमसंगने भारतात आणले दोन दमदार फोन गॅलेक्सी ए50 आणि ए30, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने गेल्याच आठवड्यात आपल्या गॅलेक्सी ए सीरीजचे दोन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केले होते. जागतिक मंचावर सादर होताच हे दोन्ही फोन सॅमसंग इंडियाच्या आफिशियल वेबसाइट वर पण लिस्ट झाले होते. कंपनीने आधीच दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा कर केला आहे, ज्यानंतर सॅमसंग फॅन्स सोबत स्मार्टफोन यूजर पण गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 च्या इंडिया लॉन्चची वाट बघत होते. आज हि प्रतीक्षा संपवत सॅमसंग ने गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी 30 भारतीय बाजारात आणले आहेत.

किंमत
सॅमसंगने गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 आज भारतात लॉन्च केले आहेत. कपंनीने दोन्ही स्मार्टफोन्सच्या किमतींचा खुलासा करत यांच्या विक्रीची घोषणा पण केली आहे.

गॅलेक्सी ए30 (4जीबी/64जीबी) = 16,990 रुपये
गॅलेक्सी ए50 (4जीबी/64जीबी) = 19,990 रुपये
गॅलेक्सी ए50 (6जीबी/128जीबी) = 22,990 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी ए50
सॅमसंग ने आपला स्मार्टफोन गॅलेक्सी एम सीरीज मध्ये इनफिनिटी यू डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनचा 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला छोटाशी ‘यू’ शेप नॉच आहे. सॅमसंग ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज केला आहे. गॅलेक्सी ए50 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस वर बेस्ड आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह कंपनीच्या एक्सनॉस 9610 चिपसेट वर चालतो.

गॅलेक्सी ए50 कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए7 प्रमाणे गॅलेक्सी ए50 पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच गॅलेक्सी ए50 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तर 8-मेगापिक्सलचा तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनचे हे दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतात. सेल्फी कॅमेरा पाहता गॅलेक्सी ए50 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 मध्ये बिक्सबे शार्टकट बटण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए50 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए30
सॅमसंग गॅलेक्सी ए30 डिजाईनच्या बाबतीत गॅलेक्सी ए50 सारखाच आहे. हा फोन पण 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी इंटरनल स्टोरेज वर सादर केला आहे. एंडरॉयड पाई सोबत फोन आक्टा-कोर प्रोसेसर एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ​16-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलच्या डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी गॅलेक्सी ए30 मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए30 मध्ये पण फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post सॅमसंगने भारतात आणले दोन दमदार फोन गॅलेक्सी ए50 आणि ए30, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50-a30-launched-in-india-price-specifications-feature-sale-in-marathi/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वर लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 ने पण घेतली एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50-and-a30-official-announced-triple-camera-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50-and-a30-official-announced-triple-camera-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 25 Feb 2019 15:32:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3715 सॅमसंगने गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 स्मार्टफोन समोर आणले आहेत

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वर लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 ने पण घेतली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून सॅमसंगच्या गॅलेक्सी ए सीरीज बद्दल लीक्स समोर येत होते. चर्चा अशी होती कि सॅमसंग लवकरच आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 स्मार्टफोन लॉन्च करेल. गॅलेक्सी ए सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोनचे फोटो तसेच यांचे स्पेसिफिकेशन्स लीक्स मध्ये समोर येत आहेत. पण आज आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग ने हे दोन्ही स्मार्टफोन्स आफिशियली लॉन्च केले आहेत. सॅमसंगने गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 स्मार्टफोन समोर आणले आहेत तसेच हे टेक मंचावर सादर केले गेले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए50
सॅमसंग ने आपला स्मार्टफोन गॅलेक्सी एम सीरीज मध्ये इनफिनिटी यू डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनचा 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला छोटाशी ‘यू’ शेप नॉच आहे. सॅमसंग ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज केला आहे. गॅलेक्सी ए50 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस वर बेस्ड आहे जो वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये वेगवेगळ्या चिपसेट सह लॉन्च होईल.

गॅलेक्सी ए50 कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए7 प्रमाणे गॅलेक्सी ए50 पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच गॅलेक्सी ए50 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तर 8-मेगापिक्सलचा तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनचे हे दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतात. सेल्फी कॅमेरा पाहता गॅलेक्सी ए50 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 मध्ये बिक्सबे शार्टकट बटण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए50 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन येत्या काही दिवसांत अनाउंस केला जाऊ शकतो. फोनची किंमत किती असेल हे समजले नाही पण हा फोन बाजारात ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए30
सॅमसंग ने प्रेस रिलीज मधून गॅलेक्सी ए30 पण सादर केला आहे. या फोनचा डिस्प्ले व बॅटरी गॅलेक्सी ए50 सारखीच असेल पण हा फोन ​16-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलच्या डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी गॅलेक्सी ए30 मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने गॅलेक्सी ए30 बाजारात दोन वेरिएंट मध्ये विकला जाईल ज्यात 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरीएंट असतील.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वर लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 ने पण घेतली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50-and-a30-official-announced-triple-camera-feature-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमीला मिळेल टक्कर, सॅमसंग घेऊन येत आहे तीन स्वस्तातले फोन गॅलेक्सी ए10, ए20 आणि ए30 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-a20-a30-to-launch-in-india-soon-price-rs-8490-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-a20-a30-to-launch-in-india-soon-price-rs-8490-in-marathi/#respond Tue, 05 Feb 2019 08:29:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3542 गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज चे हे तिन्ही स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित असतील

The post शाओमीला मिळेल टक्कर, सॅमसंग घेऊन येत आहे तीन स्वस्तातले फोन गॅलेक्सी ए10, ए20 आणि ए30 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने अलीकडेच आपली नवी स्मार्टफोन सीरीज ‘गॅलेक्सी एम’ नावाने सादर केली आहे. सॅमसंग ने हि सीरीज सर्वात आधी भारतात आणली आहे आणि या अंतर्गत गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन आज पासून आपल्या पहिल्या सेल साठी उपलब्ध झाले आहेत आणि हे लोकांना आवडत आहेत. सॅमसंग संबंधित अजून एक बातमी आली आहे कि कंपनी अजून तीन नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे आणि या स्मार्टफोनची किंमत खूप कमी असणार आहे.

सॅमसंग बद्दल बोलले जात आहे कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी ए सीरीज’ चे तीन नवीन स्मार्टफोन्स वर काम करत आहे आणि हे गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी ए20 आणि गॅलेक्सी ए30 नावांसह लॉन्च केले जातील. हि बातमी एमएसपी ने एक्सक्लूसिव कवर केली आहे. रिपोर्टनुसार सॅमसंगचे हे तिन्ही स्मार्टफोन खूप स्वस्त असणार आहेत तसेच लवकरच हे भारतीय बाजारात येतील.

रिपोर्टनुसार गॅलेक्सी ए10 ची किंमत भारतात 8,490 रुपयांपासून सुरु होईल आणि गॅलेक्सी ए20 आणि गॅलेक्सी ए30 पण लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च केले जातील. गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 च्या लॉन्च नंतर गॅलेक्सी ए सीरीज मध्ये स्वस्त स्मार्टफोन आणून सॅमसंग थेट शाओमी व रियलमी सारख्या ब्रॅण्ड्सना टक्कर देणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज बद्दल एमएसपीच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हे तिन्ही स्मार्टफोन एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केले जातील. विशेष म्हणजे गॅलेक्सी एम10 आणि एम20 दोन्ही स्मार्टफोन मध्ये हा डिस्प्ले दिला गेला नव्हता. म्हणजे गॅलेक्सी ए10, ए20 आणि ए30 कंपनीच्या गॅलेक्सी एम सीरीज पेक्षा पण एडवांस फीचर्स सह येतील. विशेष म्हणजे हे फोन गीकबेंच वर पण दिसले आहेत तिथे यांचे स्पेसिफिकेशन्स लिस्ट आहेत.

गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज चे हे तिन्ही स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित असतील तसेच ऑक्टाकोर प्रोसेसर सह एक्सनॉस 7885 चिपसेट वर लॉन्च केले जातील. लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि गॅलेक्सी ए10 मध्ये 2जीबी चा रॅम असेल. तसेच गॅलेक्सी ए20 3जीबी रॅम मेमरी तसेच गॅलेक्सी ए30 4जीबी रॅम वर लॉन्च केले जाऊ शकतात. रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए10, ए20 आणि ए30 स्मार्टफोन देशात मार्चच्या शेवट्पर्यंत लॉन्च केले जाऊ शकतात.

The post शाओमीला मिळेल टक्कर, सॅमसंग घेऊन येत आहे तीन स्वस्तातले फोन गॅलेक्सी ए10, ए20 आणि ए30 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-a20-a30-to-launch-in-india-soon-price-rs-8490-in-marathi/feed/ 0