एक्सक्लूसिव: कमी होणार आहेत सॅमसंग फोन्सच्या किंमत, दिवाळीच्या आधी येईल हि ऑफर

गेल्या काही दिवसांपासून सॅमसंगचे फोन्स खुप चर्चेत आहेत. बातमी अशी आहे कि कंपनी लवकरच गॅलेक्सी एम30एस, गॅलेक्सी ए50एस आणि गॅलेक्सी ए30एस सहित अनेक फोन्स लॉन्च करू शकते. आज आम्हाला सॅमसंग फोन बद्दल काही खास माहिती मिळाली आहे. 91मोबाईल्सला मिळालेल्या माहिती नुसार सॅमसंग लवकरच आपल्या अनेक फोन्सच्या किंमती मोठ्याप्रमाणावर कमी करू शकते, खासकरून ए सीरीज आणि एम सीरीजचे सर्व फोन्स. कंपनी हि ऑफर दिवाळीच्या आधी देण्याची तयारी करत आहे. आम्हाला हि माहिती इंडस्ट्री मधील अशा सोर्स कडून मिळाली जो सॅमसंग प्लानिंग आणि योजनांशी अनेक संबंधित आहे.

त्यांनी सांगितले कि ”सॅमसंग द्वारे फोनच्या किंमती करण्याचे दोन कारण आहेत. एक दिवाळीच्या काळात भारतात सर्वात जास्त खरेदी होते आणि याच काळात ऑर देऊन कंपनी जास्तीत जास्त लोक जोडू इच्छित आहे. दुसरे आणि मोठे कारण आहे ए सीरीज आणि एम सीरीज मध्ये नवीन फोन्स येत आहेत. लवकरच संपूर्ण गॅलेक्सी ए आणि एम सीरीजचा पोर्टफोलियो बदलला जाणार आहे आणि या फोन्सची किंमत तीच असेल ज्या किंमतीत हे जुने फोन्स आता विकले जात आहेत. त्यामुळे जुन्या फोन्सच्या किंमती कमी करून कंपनी त्याजागी नवीन फोन आणेल.”

अलीकडेच सॅमसंगचे सिनियर वाइस प्रसिडेंट, स्मार्टफोन बिजनेस, असीम वारसी यांनी 91मोबाईल्स सोबत झालेल्या मुलाखतीती म्हणले होते कि ”पुढील काही आठवड्यांत भारतात फक्त ऑनलाइन स्टोरच्या माध्यमातून 2 मिलियन फोन विकण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे जे जवळपास 3,000 कोटींच्या किंमतीचे असतील. या ऑनलाइन बिजनेस मध्ये तसे तर सॅमसंगचे सर्व फोन मॉडेल असतील पण मुख्य योगदान सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचे असेल.”

जरी त्यांनी तेव्हा फक्त ऑनलाइन बद्दल माहिती दिली असली तरी तुम्हाला तर माहीतच आहे कि आजपण सॅमसंग मोबाईल्सच्या एकूण सेल मध्ये ऑफलाईनचे योगदान जास्त मोठे आहे. त्यामुळे ऑफलाइन मध्ये कंपनीची तयारी अजून मोठी असेल.

माहिती नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30, गॅलेक्सी ए20, गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी एम20, गॅलेक्सी एम30 आणि गॅलेक्सी एम10 च्या किंमती कमी करणार आहे. त्याचबरोबर जुने जसे कि गॅलेक्सी एस10 आणि एस10 प्लस, गॅलेक्सी एस9 आणि एस9 प्लस सह अनेक फोन्सचा समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here