सॅमसंग ने केली कमाल, फक्त 40 दिवसांत विकले 20 लाख A सीरीजचे स्मार्टफोन्स

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने अलीकडेच आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये Galaxy A80 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता पर्यंत या सीरीज मध्ये कंपनीने आपले 6 हँडसेट लॉन्च केले आहेत. तर आता सॅमसंग ने दावा केला आहे कि 1 मार्चला लॉन्च झालेल्या ए सीरीजच्या स्मार्टफोन्सनी विक्रीचे नवीन रेकॉर्ड केले आहेत. कंपनीनुसार फक्त 40 दिवसांत Samsung Galaxy A सीरीजच्या 20 लाख यूनिट्सची विक्री झाली आहे.

तसेच या विक्रीतून कंपनीने 50 कोटी डॉलर (जवळपास 3,500 कोटी रुपये) ची कमाई केली आहे. याची माहिती सॅमसंग इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर रंजीवजीत सिंह यांनी दिली. रंजीवजीत म्हणाले “आम्ही आमच्यासाठी जे लक्ष्य निर्धारित केले होते त्यापेक्षा पुढे आम्ही जात आहोत.”

हे देखील वाचा: शाओमीचा दमदार Redmi Y3 भारतात लॉन्च साठी तयार, जाणून घ्या याबद्दल सर्वकाही

रंजीवजीत सिंह म्हणतात, ‘A50, A30 आणि A10 स्मार्टफोनला मेट्रो सिटी आणि छोट्या शहरांमधून चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. गेल्या 40 दिवसांत आम्ही 2 मिलियन (20 लाख) यूनिट्स विकले ज्यातून 500 मिलियन डॉलर्सचा (जवळपास 3,500 कोटी रुपये) सेल झाला.’ विशेष म्हणजे शाओमीला टक्कर देण्यासाठी सॅमसंग लवकरच भारतात सॅमसंग गॅलेक्सी A80, A70 लॉन्च करेल.

Galaxy A70 बद्दल बोलायचे तर कंपनीच्या वेबसाइट वर डिवाइसच्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती आली आहे. पण या लिस्टिंग मध्ये किंमतीचा उल्लेख नाही, अशा आहे कि कंपनी लवकरच भारतात एका इवेंटचे आयोजन करून या फोनची किंमत सांगेल.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधी बघा Realme 3 Pro मध्ये काय असेल खास

या डिवाइसच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर Samsung Galaxy A70 मध्ये 3D ग्लास्टिक डिजाइन, वॉटर ड्रॉप नॉच आणि बॉटमला बारीक चिन देण्यात आली आहे. तसेच फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे जो वर्टिकली शेप मध्ये आहे. तसेच फोन मध्ये उजवीकडे वॉल्यूम आणि पॉवर बटण आहे.

सोर्स: पीटीआई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here