सॅमसंगने भारतात आणले दोन दमदार फोन गॅलेक्सी ए50 आणि ए30, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम

सॅमसंगने गेल्याच आठवड्यात आपल्या गॅलेक्सी ए सीरीजचे दोन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केले होते. जागतिक मंचावर सादर होताच हे दोन्ही फोन सॅमसंग इंडियाच्या आफिशियल वेबसाइट वर पण लिस्ट झाले होते. कंपनीने आधीच दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा कर केला आहे, ज्यानंतर सॅमसंग फॅन्स सोबत स्मार्टफोन यूजर पण गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 च्या इंडिया लॉन्चची वाट बघत होते. आज हि प्रतीक्षा संपवत सॅमसंग ने गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी 30 भारतीय बाजारात आणले आहेत.

किंमत
सॅमसंगने गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 आज भारतात लॉन्च केले आहेत. कपंनीने दोन्ही स्मार्टफोन्सच्या किमतींचा खुलासा करत यांच्या विक्रीची घोषणा पण केली आहे.

गॅलेक्सी ए30 (4जीबी/64जीबी) = 16,990 रुपये
गॅलेक्सी ए50 (4जीबी/64जीबी) = 19,990 रुपये
गॅलेक्सी ए50 (6जीबी/128जीबी) = 22,990 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी ए50
सॅमसंग ने आपला स्मार्टफोन गॅलेक्सी एम सीरीज मध्ये इनफिनिटी यू डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनचा 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला छोटाशी ‘यू’ शेप नॉच आहे. सॅमसंग ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज केला आहे. गॅलेक्सी ए50 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस वर बेस्ड आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह कंपनीच्या एक्सनॉस 9610 चिपसेट वर चालतो.

गॅलेक्सी ए50 कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए7 प्रमाणे गॅलेक्सी ए50 पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच गॅलेक्सी ए50 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तर 8-मेगापिक्सलचा तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनचे हे दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतात. सेल्फी कॅमेरा पाहता गॅलेक्सी ए50 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 मध्ये बिक्सबे शार्टकट बटण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए50 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए30
सॅमसंग गॅलेक्सी ए30 डिजाईनच्या बाबतीत गॅलेक्सी ए50 सारखाच आहे. हा फोन पण 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी इंटरनल स्टोरेज वर सादर केला आहे. एंडरॉयड पाई सोबत फोन आक्टा-कोर प्रोसेसर एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ​16-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलच्या डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी गॅलेक्सी ए30 मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए30 मध्ये पण फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here