Samsung Galaxy A34 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 24 Mar 2023 06:58:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती https://www.91mobiles.com/marathi/6gb-ram-samsung-galaxy-a34-5g-price-in-india-28999/ https://www.91mobiles.com/marathi/6gb-ram-samsung-galaxy-a34-5g-price-in-india-28999/#respond Fri, 24 Mar 2023 06:58:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19719 Samsung नं अलीकडेच भारतीय बाजारात Galaxy A34 5G फोन लाँच केला आहे. हा मोबाइल फोन 8GB RAM सह मार्केटमध्ये आला आहे जो 30,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकला जात आहे. तसेच 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की या फोनचा 6GB RAM व्हेरिएंट देखील भारतात लाँच होऊ शकतो जो 28,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. बँक व […]

The post 28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A34 5G 6GB RAM व्हेरिएंट देखील भारतात लाँच होऊ शकतो.
  • 6जीबी रॅम असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी फोनची किंमत 28,999 रुपये असू शकते.
  • सध्या फोन 8GB RAM सह दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.

Samsung नं अलीकडेच भारतीय बाजारात Galaxy A34 5G फोन लाँच केला आहे. हा मोबाइल फोन 8GB RAM सह मार्केटमध्ये आला आहे जो 30,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकला जात आहे. तसेच 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की या फोनचा 6GB RAM व्हेरिएंट देखील भारतात लाँच होऊ शकतो जो 28,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. बँक व कंपनी ऑफर्सनंतर हा तुम्हाला 24,999 रुपयांना पडू शकतो.

91मोबाइल्सला रिटेल सोर्सच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग कंपनी आपल्या गॅलेक्सी ए34 5जी फोनचा नवीन 6जीबी रॅम व्हेरिएंट देखील बाजारात आणण्याची तयारी करत आहे. या फोनची मार्केट प्राइस 28,999 रुपये असू शकते. फोनच्या किंमतीवर कंपनी 3,000 रुपयांचा बँक डिस्काउंट देऊ शकते तसेच 1,000 रुपयांचे सॅमसंग शॉप अ‍ॅप वेलकम व्हाउचर देखील मिळतील. या ऑफर्स नंतर Samsung Galaxy A34 5G 6GB RAM ची प्राइस 24,999 रुपये होऊ शकते. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G जागतिक बाजारात लाँच, Snapdragon 685 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जीची किंमत

Samsung Galaxy A34 5G चे बाजारातील मेमरी व्हेरिएंट्स आणि त्यांची किंमत पाहता याचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट 30,999 रुपयांमध्ये विकला जात आहे तर मोठा 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट 32,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. हा सॅमसंग फोन Light Green, Black, Light Violet आणि Silver कलरमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे या फोनच्या खरेदीवर उपरोक्त ऑफर मिळत आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ Super AMOLED Display
  • 48MP Triple Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 5000mAh Battery
  • 8GB RAM, 256GB Storage

Galaxy A34 5G मध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि व्हिजन बूस्टर टेक्नॉलॉजी सपोर्ट करतो. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनचे डायमेन्शन 161.3 x 78.1 x 8.2एमएम आणि वजन 199 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ 1.8 अपर्चर असलेला 48MP चा मुख्य कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ 2.2 अपर्चरसह 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चरसह 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: जियोनं लाँच केले 6 क्रिकेट प्लॅन, IPL च्या चाहत्यांसाठी खास योजना

या डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यांतची स्टोरेज मिळते, ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5.1 वर चालतो. कंपनीनं यात Samsung Knox फिचर देखील दिलं आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे.

The post 28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6gb-ram-samsung-galaxy-a34-5g-price-in-india-28999/feed/ 0
11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-5g-phone-galaxy-a54-5g-and-galaxy-a34-5g-price-sale-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-5g-phone-galaxy-a54-5g-and-galaxy-a34-5g-price-sale-features-specifications-in-marathi/#respond Thu, 23 Mar 2023 07:20:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19680 Samsung Galaxy A34 5G आणि Samsung Galaxy A54 5G कंपनीचे लेटेस्ट 5G Phones आहेत जे याच महिन्यात भारतात लाँच झाले आहेत. मिडबजेट सेग्मेंटमध्ये आलेले हे स्मार्टफोन आज भारतात पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध होत आहेत. हे दोन्ही फोन 11 5जी बँडला सपोर्ट करतात ज्यावर Reliance Jio आणि Airtel ची 5जी सर्व्हिस सहज वापरता येईल. पुढे गॅलेक्सी ए34 […]

The post 11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A34 5G आणि Samsung Galaxy A54 5G कंपनीचे लेटेस्ट 5G Phones आहेत जे याच महिन्यात भारतात लाँच झाले आहेत. मिडबजेट सेग्मेंटमध्ये आलेले हे स्मार्टफोन आज भारतात पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध होत आहेत. हे दोन्ही फोन 11 5जी बँडला सपोर्ट करतात ज्यावर Reliance Jio आणि Airtel ची 5जी सर्व्हिस सहज वापरता येईल. पुढे गॅलेक्सी ए34 5जी आणि ए54 5जीच्या प्राइस, सेल, ऑफर, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही वाचू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जीची किंमत

Samsung Galaxy A34 5G दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 30,999 रुपये आणि 32,999 रुपये आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी आजपासून कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर Awesome Lime, Awesome Graphite आणि Awesome Silver कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: 108MP Camera आणि 6,000mAh battery सह Samsung नं सादर केला Galaxy M54 5G

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जीची प्राइस

Samsung Galaxy A54 5G फोन देखील दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये आला आहे. फोनचा बेस मॉडेल 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता हे दोन्ही मॉडेल अनुक्रमे 38,999 रुपये आणि 40,999 रुपयांमध्ये आजपासून सेलसाठी उपलब्ध झाले आहेत. हा सॅमसंग फोन Awesome Lime, Awesome Graphite आणि Awesome Violet कलरमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy A34 5G आणि A54 5G ऑफर्स

सध्या कंपनी फोन खरेदी करणाऱ्या सर्व मोबाइल युजर्सना 25वॉट फास्ट चार्जर मोफत देत आहे. या चार्जरची किंमत 1299 रुपये आहे. तसेच 5,999 रुपयांचे Galaxy Buds सेल दरम्यान फक्त 999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. आयसीआयसीआय क्रेडिट व डेबिट कार्ड तसेच एसबीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यावर 3,000 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळत आहे. कंपनी 1,000 रुपयांपर्यंतचे शॉप अ‍ॅप वेलकम व्हाउचर देखील देत आहे जे कंपनीच्या वेबसाइटवर वापरता येतील.

भारतातील 5जी बँडचा सपोर्ट

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी तसेच ए54 5जी दोन्ही मोबाइल फोन 11 5G Bands सह मार्केटमध्ये आले आहेत. यातील N1(2100), N3(1800), N5(850), N7(2600), N8(900), N28(700), N66(AWS-3), N40(2300), N41(2500), N77(3700) आणि N78(3500) बँड्सचा समावेश आहे. हे 5जी बँड रिलायन्स जियो तसेच एयरटेलद्वारे भारतातील 5जी सर्व्हिसला पूर्णपणे सपोर्ट करण्यास उपयुक्त ठरतात.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 120Hz AMOLED Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 48MP Triple Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 5,000mAh Battery

Samsung Galaxy A34 5G फोन 6.6 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5.1 सह हा फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.4″ FHD+ 120Hz AMOLED Display
  • 50MP Triple Rear Camera
  • 32MP Selfie Camera
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 5,000mAh Battery

Samsung Galaxy A54 5G फोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग एक्सनॉस 1380 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. अँड्रॉइड 13 आधारित हा फोन वनयुआय 5.1 वर चालतो. हा सॅमसंग फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह चालतो. तसेच Samsung Galaxy A54 5G एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो.

The post 11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-5g-phone-galaxy-a54-5g-and-galaxy-a34-5g-price-sale-features-specifications-in-marathi/feed/ 0
Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G सादर; कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a54-5g-and-galaxy-a34-5g-unveiled/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a54-5g-and-galaxy-a34-5g-unveiled/#respond Wed, 15 Mar 2023 10:52:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19513 Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G फोन लवकरच होणार असल्याची बातमी आम्ही काही दिवसांपूर्वी दिली होती. आता कंपनीनं ये स्मार्टफोन्स जगासमोर ठेवले आहेत. सॅमसंगनं घोषणा करून Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G फोन सादर केले आहेत. दोन्ही फोन्समध्ये सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, OIS असलेला मेन कॅमेरा, 8GB RAM आणि 256GB […]

The post Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G सादर; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G लवकरच येऊ शकतात भारतात
  • फोनमध्ये OIS असलेला मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.
  • हे फोन्स 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह सादर

Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G फोन लवकरच होणार असल्याची बातमी आम्ही काही दिवसांपूर्वी दिली होती. आता कंपनीनं ये स्मार्टफोन्स जगासमोर ठेवले आहेत. सॅमसंगनं घोषणा करून Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G फोन सादर केले आहेत. दोन्ही फोन्समध्ये सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, OIS असलेला मेन कॅमेरा, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया यांची उपलब्धता आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्स.

Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G ची उपलब्धता

Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G हे फोन्स याच महिन्यात युरोप आणि भारतासह दक्षिण आशियामधील देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील, असं कंपनीनं सांगितलं आहे. हे दोन्ही फोन्स 6GB/128GB, 8GB/128GB आणि 8GB/256GB स्टोरेजमध्ये सादर करण्यात आले आहेत. आम्हाला रिटेल स्टोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार, हे फोन्स 16 मार्चला भारतात लाँच होतील.

Samsung Galaxy A54 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.4″ Super AMOLED Display
  • 50MP Triple Rear Camera
  • 32MP Selfie Camera
  • 5000mAh Battery
  • 8GB RAM, 256GB Storage

Galaxy A54 5G मध्ये 6.4-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा एक पंच होल स्टाइल डिस्प्ले आहे, जो व्हिजन बूस्टर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. फोनचे डायमेन्शन 158.2 x 76.7 x 8.2एमएम आणि वजन 202 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS सपोर्ट असलेला 50MP चा मुख्य कॅमेरा मिळतो ज्याचं अपर्चर एफ 1.8 आहे. जोडीला एफ 2.2 अपर्चरसह 12MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चरसह 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यांतची स्टोरेज मिळते, ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. सॅमसंगची Knox सिक्योरिटी देखील यात मिळते. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5.1 वर चालतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे.

Samsung Galaxy A34 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ Super AMOLED Display
  • 48MP Triple Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 5000mAh Battery
  • 8GB RAM, 256GB Storage

Galaxy A34 5G मध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि व्हिजन बूस्टर टेक्नॉलॉजी सपोर्ट करतो. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनचे डायमेन्शन 161.3 x 78.1 x 8.2एमएम आणि वजन 199 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ 1.8 अपर्चर असलेला 48MP चा मुख्य कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ 2.2 अपर्चरसह 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चरसह 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यांतची स्टोरेज मिळते, ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5.1 वर चालतो. कंपनीनं यात Samsung Knox फिचर देखील दिलं आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे.

The post Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G सादर; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a54-5g-and-galaxy-a34-5g-unveiled/feed/ 0
Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G फोन 16 मार्चला होऊ शकतात भारतात लाँच; वेबसाइटवर झाले लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a34-5g-and-a54-5g-phone-may-launch-in-india-on-16-march/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a34-5g-and-a54-5g-phone-may-launch-in-india-on-16-march/#respond Mon, 13 Mar 2023 09:11:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19408 सॅमसंगनं घोषणा केली आहे की येत्या 16 मार्चला भारतात ‘गॅलेक्सी ए’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला जाईल. कंपनीनं या घोषणेत सीरीजमधील स्मार्टफोनचं नाव सांगितलं नाही परंतु आम्हाला रिटेल स्टोरच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की 16 मार्चला Samsung Galaxy A34 5G आणि Samsung Galaxy A54 5G भारतात लाँच होऊ शकतात. या दोन्ही फोनचं सपोर्ट पेज कंपनीच्या […]

The post Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G फोन 16 मार्चला होऊ शकतात भारतात लाँच; वेबसाइटवर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • सॅमसंग 16 मार्चला भारतात ‘गॅलेक्सी ए’ सीरीजचे नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते.
  • या दिवशी Samsung Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात एंट्री करू शकतात.
  • या दोन्ही सॅमसंग फोन्सचं सपोर्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे.

सॅमसंगनं घोषणा केली आहे की येत्या 16 मार्चला भारतात ‘गॅलेक्सी ए’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला जाईल. कंपनीनं या घोषणेत सीरीजमधील स्मार्टफोनचं नाव सांगितलं नाही परंतु आम्हाला रिटेल स्टोरच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की 16 मार्चला Samsung Galaxy A34 5G आणि Samsung Galaxy A54 5G भारतात लाँच होऊ शकतात. या दोन्ही फोनचं सपोर्ट पेज कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आलं आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी आणि गॅलेक्सी ए54 5जी फोन 16 मार्चला भारतात लाँच होऊ शकतात. आम्हाला रिटेल स्टोरच्या माध्यमातून टीजर पोस्टर मिळाला आहे ज्यात या मोबाइल्सचा फोटो आणि नाव दिसत आहे. तसेच या दोन्ही स्मार्टफोन्सचं सपोर्ट पेज देखील सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे.

सॅमसंग इंडिया वेबसाइटवर लाइव्ह झालेल्या सपोर्ट पेजवर दोन्ही मोबाइल्सच्या रॅम व्हेरिएंट्सचा खुलासा देखील झाला आहे. Samsung Galaxy A54 5G फोन 8 जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे तर Samsung Galaxy A34 5G फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये दाखवण्यात आला आहे ज्यात 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅमचा समावेश आहे. आशा आहे हे दोन्ही फोन याच व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये विकले जातील.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी आणि गॅलेक्सी ए54 5जी ची लीक किंमत

इंडिया लाँच डेट समोर येण्यापुरवही या दोन्ही मोबाइल फोन्सची ग्लोबल प्राइस लीक करण्यात आली आहे. स्नूपीटेक नावाच्या एका एक टिपस्टरनं या स्मार्टफोन्सची युरोपियन किंमत शेयर केली होती. लीकमध्ये 128जीबी स्टोरेज असलेल्या Samsung Galaxy A34 5G ची किंमत EUR 419 सांगण्यात आली होती जी 35,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. तर Samsung Galaxy A54 5G च्या 128जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत EUR 519 (जवळपास 45,400 रुपये) असू शकते असं सांगण्यात आलं होतं. या सॅमसंग फोन्सची किंमत भारतात यापेक्षा कमी असेल अशी अपेक्षा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Dimensity 1080 SoC
  • 48MP Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 25W 5,000mAh Battery

91मोबाइल्सला काही दिवसांपूर्वी मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी 34 5जी मध्ये देखील 6.6 इंचाचा लार्ज फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. हा फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर चालू शकतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी या सॅमसंग फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, एफ/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चरसह 5 मेगापिक्सल मॅक्रो/बोका लेन्स मिळू शकते. Samsung Galaxy A34 13 मेगापिक्सल सेल्फी सेन्सरला सपोर्ट करू शकतो. सिक्योरिटीसाठी हा फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकतो तसेच हा मोबाइल आयपी67 सर्टिफाइड असू शकतो.

Samsung Galaxy A54 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.4″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Samsung Exynos 1380 SoC
  • 32MP Selfie Camera
  • 50MP Rear Camera
  • 25W 5,000mAh Battery

गॅलेक्सी 54 5जी 2340 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकतो. यात कंपनीचा एक्सनॉस 1380 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करू शकतो.

Samsung Galaxy A54 च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सल प्रायमरी दिला जाऊ शकतो. जोडीला एफ/2.2 अपर्चरसह 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तर एफ/2.4 अपर्चरसह 5 मेगापिक्सलची मॅक्रो/बोका लेन्स मिळू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग फोन 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हा फोन आयपी67 रेटेड असेल, ज्याच्या जोडीला ड्युअल सिम, एनएफसी, ओटीजी आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतील.

The post Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G फोन 16 मार्चला होऊ शकतात भारतात लाँच; वेबसाइटवर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a34-5g-and-a54-5g-phone-may-launch-in-india-on-16-march/feed/ 0