जियोनं लाँच केले 6 क्रिकेट प्लॅन, IPL च्या चाहत्यांसाठी खास योजना

Image Credit: business standard
Highlights

  • क्रिकेट चाहत्यांसाठी जियोनं 6 नवीन रिचार्ज प्लॅन सादर केले.
  • कंपनीनं क्रिकेट बोनानजा ऑफर अंतगर्त प्लॅन सादर केले आहेत.
  • हे रिचार्ज 24 मार्च 2023 पासून उपलब्ध होतील.

जियोसिनेमावर आयपीएल बघणे अगदी मोफत आहे परंतु, सर्व सामने बघण्यासाठी जास्त डेटा लागतोच आणि म्हणून रिलायन्स जियोनं एकूण 6 नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. आकाश मुकेश अंबानी यांच्या कंपनीनं क्रिकेट प्लॅन्स डेली 3GB डेटासह सादर केले आहेत. तसेच तीन एक्सक्लूसिव्ह डेटा- अ‍ॅड ऑन पॅक 150जीबी डेटा बेनिफिट्ससह आणले आहेत. चला जाणून घेऊया या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनबाबत सर्वकाही.

मिळेल अनलिमिटेड ट्रू-5जी डेटा

सर्व क्रिकेट प्लॅन्ससह ग्राहकांना अनलिमिटेड ट्रू-5जी डेटा मिळेल. तसेच, जियो युजर्स स्क्रीनवर 4के क्लॅरिटीमध्ये मल्टीपल कॅमेरा अँगलवरून लाइव्ह मॅच बघता येईल. क्रिकेट चाहत्यांना मिळणारा शानदार अनुभव लक्षात घेऊन हे प्लॅन तयार करण्यात आले आहेत. कंपनीनं 999 रुपये, 399 रुपये आणि 219 रुपये प्लॅनसह 222 रुपये, 444 रुपये आणि 667 रुपयांच्या डेटा अ‍ॅड-ऑन पॅक्स देखील सादर केले आहेत. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला येणार भारतात, जोडीला येतायत OnePlus Nord Buds 2

3GB डेली डेटा असलेले क्रिकेट प्लॅन

999 रुपयांचा प्लॅन पाहता या रिचार्जमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह डेली 3जीबी डेटा मिळेल. तसेच, यात 241 रुपयांची किंमतीचा फ्री व्हाउचर ऑफर केला जात आहे.

399 रुपयांचा प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 3GB डेली डेटा आणि 61 रुपयांचा फ्री व्हाउचर दिला जात आहे.

219 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची वैधता आणि 3GB डेली डेटा मिळतो. तसेच प्लॅनमध्ये 25 रुपयांची किंमत असलेला व्हाउचर फ्री मिळेल. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G जागतिक बाजारात लाँच, Snapdragon 685 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन

डाटा अ‍ॅड-ऑन पॅक

222 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये युजर्सना 50जीबी डेटा मिळत आहे. याची वैधता बेस प्लॅन इतकी असेल. 444 रुपयांचा प्लॅनमध्ये 60 दिवसांची वैधतेव्यतिरिक्त 100जीबीचा डेटा मिळतो. अखेरीस 667 रुपयांच्या डेटा पॅक बद्दल बोलायचं तर यात 90 दिवसांच्या वैधतेसह 150जीबी डेटा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here