Redmi Note 12 4G जागतिक बाजारात लाँच, Snapdragon 685 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन

Highlights

  • Redmi Note 12 ग्लोबली सादर केला गेला आहे.
  • हा जगातील पहिला फोन ज्यात स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट आहे.
  • रेडमी नोट 12 मोबाइल एक 4G-ओन्ली डिवाइस आहे.

रेडमी नोट 12 4जी भारतात 30 मार्चला लाँच केला जाणार आहे. परंतु त्याआधीच हा हँडसेट ग्लोबल मार्केटमध्ये अधिकृतपणे सादर करण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगन 685 चिपसेटसह येणारा हा जगातील पहिला फोन बनला आहे जो या प्रोसेसरसह आला आहे. रेडमी नोट 12 लाइनअपमध्ये हा पहिला फोन नाही याआधी Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G जागतिक बाजारात आले आहेत. चला जाणून घेऊया या सीरिजमधील सर्वात नवीन स्मार्टफोनविषयी.

Redmi Note 12 ची किंमत

हा नवीन स्मार्टफोन 4/6/8GB रॅम आणि 64/128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. डिवाइसच्या बेस व्हर्जनची किंमत 199 युरो (जवळपास 17,000 रुपये) आहे आणि स्मार्टफोनच्या मिड व्हर्जनची किंमत 229.99 युरो (जवळपास 20,600 रुपये) आहे. तर 128 जीबी स्टोरेजच्या मोठ्या मॉडेलची किंमत 249.99 युरो (जवळपास 22,000 रुपये) आहे. कंपनीनं हा फोन आइस ब्लू, ओनेक्स ग्रे आणि मिंट ग्रीन कलरमध्ये सादर केला आहे. हे देखील वाचा: 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन फक्त 12,499 रुपयांमध्ये! Tecno Spark 10 Pro ची भारतात एंट्री

Redmi Note 12 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Redmi Note 12 4G मध्ये 6.67-इंच AMOLED FHD+ 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे जो सीरीजच्या इतर डिवाइसमध्ये देखील आहे. स्क्रीनची पीक ब्राईटनेस 1,200 निट्स, एक DCI-P3 कलर गेमुट आणि 4,500:000:1 चा कंट्रास्ट रेशियो आहे. तसेच, यात स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट आहे, जो जुन्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटचा अपग्रेडेड व्हर्जन आहे. तसेच फोन 4GB / 6GB / 8GB LPDDR4x RAM आणि 128GB / 256GB UFS 2.2 स्टोरेजसह आला आहे. जोडीला एक्स्ट्रा स्टोरेजसाठी, डिवाइसमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला येणार भारतात, जोडीला येतायत OnePlus Nord Buds 2

फोनमध्ये कॅमेरा स्पेक्स पाहता फ्रंटला यात 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. बॅक पॅनलमध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड यूनिट आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच नोट 12 मध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी आहे. डिवाइसच्या डावीकडे असलेल्या पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here