108MP Camera आणि 6,000mAh battery सह Samsung नं सादर केला Galaxy M54 5G

Highlights

  • Samsung Galaxy M54 5G गल्फ देशांमध्ये सादर करण्यात आला आहे.
  • हा सॅमसंग मोबाइल 108MP Camera सह मार्केटमध्ये आला आहे.
  • फोनमध्ये 6,000mAh battery आणि 25W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

Samsung नं आपल्या गॅलेक्सी ‘एम’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन Galaxy M54 5G ऑफिशियल केला आहे. हा मोबाइल फोन मध्य पूर्व देशांमध्ये सादर करण्यात आला आहे जो सर्वप्रथम अरब देशांमध्ये विकला जाईल. 108MP Camera, 8GB RAM, Exynos 1380 प्रोसेसर आणि 6,000mAh battery सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोनची खासियत आहे. संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ 120Hz AMOLED Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Samsung Exynos 1380
  • 108MP Triple Camera
  • 32MP Selfie Sensor
  • 25W 6,000mAh battery

Samsung Galaxy M54 5G फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या लार्ज फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. सॅमसंगनं आपल्या या फोनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. हे देखील वाचा: 30 मार्चला भारतात येतोय Redmi Note 12 4G; मिळणार 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो सॅमसंग वनयुआय 5.1 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग एक्सनॉस 1380 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंगनं आपला फोन 8जीबी रॅमसह सादर केला आहे जो 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेजसह मार्केटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हा फोन 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी हा सॅमसंग फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम54 5जी च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: रियलमी जीटी नियो 5 एसईची लाँच डेट समजली, AnTuTu लिस्टिंगमधून स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Samsung Galaxy M54 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा ड्युअल सिम फोन आहे ज्यात 5जी व 4जी दोन्ही वापरता येईल. या फोनमध्ये एनएफसी आणि नाविक सारखे फीचर्स देखील मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here