Samsung Galaxy S10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 06 Jul 2020 10:42:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 21,000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे Samsung Galaxy S10 स्मार्टफोन, जाणून घ्या कशाप्रकारे आणि कुठून घ्यावा विकत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-available-with-rs-21000-discount-in-india-amazon-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-available-with-rs-21000-discount-in-india-amazon-sale-offer/#respond Mon, 06 Jul 2020 10:42:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7600 अमेझॉन इंडिया वर सॅमसंग गॅलेक्सी एस10 स्मार्टफोन 49,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

The post 21,000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे Samsung Galaxy S10 स्मार्टफोन, जाणून घ्या कशाप्रकारे आणि कुठून घ्यावा विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्यावर्षी आपल्या फ्लॅगशिप ‘एस’ सीरीज मध्ये तीन पावरफुल स्मार्टफोन Samsung Galaxy S10, Samsung Galaxy S10+ आणि Samsung Galaxy S10e लॉन्च केले होते. या स्मार्टफोन्सचे अपग्रेड Samsung Galaxy S20 सीरीजच्या माध्यमातून समोर आले आहेत पण अजूनही अनेक असे भारतीय यूजर आहेत जे गॅलेक्सी एस20 च्या जास्त किंमतीमुळे गॅलेक्सी एस10 सीरीज घेऊ इच्छित आहेत. अश्याच स्मार्टफोन यूजर्सना भेट देत आता कंपनीने Samsung Galaxy S10 स्मार्टफोन थेट 21,000 रुपयांनी कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध केला आहे जी हा फोन विकत घेण्याची शानदार संधी आहे.

Samsung Galaxy S10 ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया वर या मोठ्या डिस्काउंट सह विक्रीसाठी उपलब्ध केला आत आहे. ज्या सॅमसंग फॅन्स व इतर स्मार्टफोन यूजर्सना हा फोन को विकत घ्यायचा आहे त्यांच्यासाठी गॅलेक्सी एस10 स्मार्टफोन विकत घेण्याची हि सुवर्णसंधी आहे. अमेझॉन वर Galaxy S10 ची छापील किंमत 71,000 रुपये आहे तर वेबसाइट हा फोन 21,001 रुपयांच्या डिस्काउंट नंतर आता 49,999 रुपयांमध्ये विकत आहे.

अमेझॉन इंडिया वर सॅमसंग गॅलेक्सी एस10 स्मार्टफोन 49,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन वेरिएंट सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट वर 57,800 रुपयांमध्ये विकला जात आहे तसेच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर Galaxy S10 चा Prism Black वेरिएंट 54,999 रुपये तर Prism Blue वेरिएंट 57,800 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S10

सॅमसंग गॅलेक्सी एस10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.1-इंचाच्या क्वॉडएचडी+ कर्व्ड डायनमिक एमोलेड इनफिनिटी ‘ओ’ ला सपोर्ट करतो जो 550 पीपीआई पिक्सल डेनसिटी सह येतो. हँडसेट मध्ये 7एनएम ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S10 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो सॅमसंगच्या डुअल ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी सह येतो. या सेटअप मध्ये 12 मेगापिक्सलची 77 डिग्री लेंस वाइड-अँगल कॅमेरा आहे. एक एफ/ 2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची 45 डिग्री टेलीफोटो लेंस आहे. तसेच 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस कॅमेरा आहे. हा सेटअप 10x डिजिटल झूमला सपोर्ट करतो.

फ्रंट पॅनल वर 10-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy S10 भारतात 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे तसेच फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. फोन मध्ये अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच 3,400 एमएएच ची बॅटरी फोन मध्ये जीव ओतण्याचे काम करते.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 वीडियो

The post 21,000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे Samsung Galaxy S10 स्मार्टफोन, जाणून घ्या कशाप्रकारे आणि कुठून घ्यावा विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-available-with-rs-21000-discount-in-india-amazon-sale-offer/feed/ 0
Samsung Galaxy Note 10 Lite मध्ये असेल 32MP सेल्फी कॅमेरा, लॉन्चच्या आधी माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-lite-32mp-selfie-camera-10mp-wide-angle-lens-revealed-leaked-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-lite-32mp-selfie-camera-10mp-wide-angle-lens-revealed-leaked-specifications/#respond Tue, 03 Dec 2019 11:21:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5949 Galaxy Note 10 Lite ला सिंगल-कोर मध्ये 667 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये 2030 स्कोर देण्यात आला आहे.

The post Samsung Galaxy Note 10 Lite मध्ये असेल 32MP सेल्फी कॅमेरा, लॉन्चच्या आधी माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung संबंधित हि बातमी अनेक दिवसांपासून येत आहे कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी नोट’ सीरीज मध्ये नवीन डिवाईस लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि या Galaxy Note 10 Lite नावाने टेक मंचावर येईल. गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता, ज्यावरून फोनच्ये अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. तसेच आता Samsung Galaxy Note 10 Lite च्या कॅमेरा डिपार्टमेंट संबंधित महत्वाचे डिटेल्स पण समोर आले आहेत. एका ताजा रिपोर्ट मध्ये Galaxy Note 10 Lite च्या सेल्फी कॅमेरा सोबतच याच्या रियर सेंसरचा खुलासा झाला आहे.

Samsung Galaxy Note 10 Lite संबंधित हि नवीन माहिती डरॉयडशाउट नावाच्या वेबसाइटने पब्लिश केली आहे. या वेबसाइटनुसार Galaxy Note 10 Lite सॅमसंग द्वारा 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सह लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे गॅलेक्सी नोट सीरीजच्या कोणत्याही स्मार्टफोन मध्ये आतापर्यंत 32 मेगापिक्सलचा फ्रंट मिळाला नाही. त्यामुळे जर Galaxy Note 10 Lite 32MP सेल्फी कॅमेरा सह आला तर हा Samsung चा पहिला नोट डिवाईस असेल जो इतक्या पावरफुल फ्रंट कॅमेऱ्यासह येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस असू शकते.

गीकबेंच लिस्टिंग

Samsung Galaxy Note 10 Lite च्या गीकबेंच लिस्टिंग बद्दल बोलायचे तर बेंचमार्किंग साइट वर हा फोन एंडरॉयड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे जो वनयूआई 2.0 सह येईल. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9810 चिपसेट असल्याचे समोर आले आहे. गीकबेंच नुसार Samsung Galaxy Note 10 Lite मध्ये 6 जीबी रॅम मिळेल. स्कोरिंग पाहता गीकबेंच वर Samsung Galaxy Note 10 Lite ला सिंगल-कोर मध्ये 667 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये 2030 स्कोर देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S10 Lite चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार या स्मार्टफोन मध्ये 6.69 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो. तसेच असे सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा दिला जाईल. पावरबॅक साठी Samsung Galaxy S10 Lite मध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy Note 10 Lite बद्दल कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स आणि डिटेल्स वर विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत Samsung स्वतः Galaxy Note 10 Lite बद्दल बोलत नाही.

The post Samsung Galaxy Note 10 Lite मध्ये असेल 32MP सेल्फी कॅमेरा, लॉन्चच्या आधी माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-lite-32mp-selfie-camera-10mp-wide-angle-lens-revealed-leaked-specifications/feed/ 0
Samsung Galaxy S10 5G model मध्ये लागली ​आग, यूजरचे झाले मोठे नुकसान https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-5g-model-burn-blast-flames-accident/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-5g-model-burn-blast-flames-accident/#respond Tue, 30 Apr 2019 15:19:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4185 सॅमसंग ने Galaxy S10 5G model पूर्णपणे यूजर्स साठी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

The post Samsung Galaxy S10 5G model मध्ये लागली ​आग, यूजरचे झाले मोठे नुकसान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन्स मध्ये आग लागणे व ब्लास्ट होण्याच्या घटना अधून मधून समोर येत असतात. या घटनांमधून अनके यूजर सुरक्षित वाचतात तर काही घटना मोठी नुकसान करतात. स्मार्टफोन मध्ये आग लागणे व ब्लास्ट होण्याची गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा सॅमसंगचे नाव सर्वात वर येते. तीन वर्षांपूर्वी सॅमसंग ने Galaxy Note 7 बाजरात आणला होता. या डिवाईस मध्ये बॅटरी ब्लास्टचे इतक्या जास्त घटना झाल्या कि सॅमसंगला Galaxy Note 7 मार्केट मधून काढून घ्यावा लागला. या डिवाईसमुळे सॅमसंगला पैशांचे भारी नुकसान झाले होते सोबत कंपनीच्या नावाला पण बट्टा लागला होता. आता पुन्हा एकदा सॅमसंग आरोपीच्या पिंजऱ्यात आली आहे. Samsung Galaxy S10 5G model मध्ये ब्लास्ट झाल्याची बातमी समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण टेक विश्वाला धक्का बसला आहे.

सॅमसंग संबंधित हि धक्कादायक बातमी साउथ कोरिया मधून आली आहे. यात सांगण्यात आले आहे कि सॅमसंगचा लेटेस्ट फ्लॅगशिप डिवाईस Galaxy S10 5G दुर्घटनाग्रस्त झाला आहे आणि फोन मध्ये ब्लास्ट झाला आहे. Samsung Galaxy S10 5G model वापरणाऱ्या यूजरने इंटरनेट वर फोन मध्ये झालेल्या ब्लास्टची माहिती दिली आहे. या घटनेची बातमी देण्यासोबत यूजरने आपल्या फोनचे फोटोज पण शेयर केले आहेत ज्यात फोन जळालेला दिसत आहे.

Samsung Galaxy S10 5G model यूजर ली ने ​दक्षिण कोरियातील मीडियाला सांगितले आहे कि त्याने काही दिवसांपूर्वी सॅमसंगचा हा महाग स्मार्टफोन विकत घेतला होता. एके दिवशी तो आपल्या घरी बसला होता आणि त्याचा हा फोन टेबल वर होता. ली ला जळाल्याचा वास येऊ लागला. फोन कडे पाहिल्यानंतर त्याला Samsung Galaxy S10 5G model मधून धूर येत असल्याचे दिसले. घाबरून त्याने फोन टेबलवरून खाली टाकला. ली म्हणतो कि जेव्हा त्याने फोन टेबल वरून टाकला तेव्हा फोन खूप जास्त गरम होता.

ली ने Samsung Galaxy S10 5G मध्ये आग लागण्याच्या घटनेविषयी म्हटले कि त्याने फोन सोबत कोणतीही अशी छेडछाड केली नाही ज्यामुळे त्यात आग लागेल किंवा ब्लास्ट होईल. तर दुसरीकडे या घटनेविषयी बोलताना सॅमसंग ने दावा केला आहे कि त्यांच्या नवीन स्मार्टफोन मध्ये असा कोणताही दोष नाही ज्यामुळे त्यात आग लागेल किंवा ब्लास्ट होईल. सॅमसंग ने Galaxy S10 5G model पूर्णपणे यूजर्स साठी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

सॅमसंग ने Galaxy S10 5G model मध्ये झालेल्या या दुर्घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे कि त्यांच्या फोन मध्ये कोणत्याही इंटरनल दोषामुळे ब्लास्ट होऊ शकत नाही. ली च्या स्मार्टफोन मध्ये लागलेली आग एखाद्या बाह्य कारणामुळे लागल्याचे सॅमसंग ने सांगितले आहे आणि म्हटले आहे कि Samsung Galaxy S10 5G model सोबत छेडछाड करण्यात आली आहे​ ज्यामुळे कंपनीच्या फोन मध्ये अशी दुर्घटना झाली आहे.

कंपनी वरील आरोप खोटे ठरवत सॅमसंग ने ली ला 1,200 यूएस डॉलरची रक्कम देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे हि किंमत भारतीय करंसीनुसार 83,500 रुपयांच्या आसपास आहे. या घटनेचे पुढे काय होईल सांगता येत नाही. पण याबाबतीती सॅमसंगची चूक असो वा यूजरची, पण टेक बाजार दिग्गज कंपनीला Samsung संशयाच्या नजरेने बघत आहे. सोबत लोकांमध्ये भीती आहे कि Galaxy S10 5G सोबत Galaxy Note 7 सारख्याच दुर्घटना होतील.

The post Samsung Galaxy S10 5G model मध्ये लागली ​आग, यूजरचे झाले मोठे नुकसान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-5g-model-burn-blast-flames-accident/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज भारतात झाली लॉन्च, बघा सर्व मॉडेल्सची किंमत आणि कधी होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-plus-s20e-launched-in-india-price-specifications-sale-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-plus-s20e-launched-in-india-price-specifications-sale-offer-in-marathi/#respond Wed, 06 Mar 2019 10:35:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3786 सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट सह शॉपिंग साइट फ्लिपकार्ट व अमेजन वरून विकत घेता येतील

The post सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज भारतात झाली लॉन्च, बघा सर्व मॉडेल्सची किंमत आणि कधी होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्याच महिन्यात आपली बहूप्रतिक्षीत स्मार्टफोन सीरीज ‘गॅलेक्सी एस10’ सीरीज जागतिक टेक मंचावर सादर केली होती. हि सीरीज सादर करत सॅमसंग ने एक साथ तीन नवीन फोन गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस आणि गॅलेक्सी एस10ई सादर केले होते. इंटरनेशनल लॉन्च नंतर काही दिवसांनी सॅमसंग ने घोषणा केली होती कि हे तिन्ही स्मार्टफोन भारतातात येतील. गॅलेक्सी एस10 सीरीजचे तिन्ही मॉडेल आधीच देशात प्री-बुकिंग साठी उपलब्ध झाले होते तर सॅमसंग ने आपल्या फॅन्सची प्रतीक्षा संपवत आज गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस आणि गॅलेक्सी एस10ई भारतात लॉन्च केले आहेत.

सॅमसंग इंडिया ने राष्ट्रीय राजधानीत ईवेंट मधून गॅलेक्सी एस10 सीरीज भारतीय बाजारात आणली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10ई आणि गॅलेक्सी एस10 प्लस चे सर्व वेरिएंट्स भारतात 8 मार्च पासूनच सेल साठी उपलब्ध होतील. हे तिन्ही स्मार्टफोन मॉडेल्स वेगवेगळ्या आर्कषक ऑफर्स सह ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट सह शॉपिंग साइट फ्लिपकार्ट व अमेजन वरून विकत घेता येतील. तसेच ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर सॅमसंग रजिस्ट्रर्ड रिटेल स्टोर्स वरून हे तिन्ही स्मार्टफोन मॉडेल्स विकत घेता येतील.

गॅलेक्सी एस10 सीरीजच्या किंमती

गॅलेक्सी एस10ई
6जीबी रॅम / 128जीबी मेमरी = 55,900 रुपये

गॅलेक्सी एस10 प्लस
8जीबी रॅम / 128जीबी मेमरी = 66,900 रुपये
8जीबी रॅम / 512जीबी मेमरी = 84,900 रुपये

गॅलेक्सी एस10 प्लस
8जीबी रॅम / 128जीबी मेमरी = 73,900 रुपये
8जीबी रॅम / 512जीबी मेमरी = 91,900 रुपये
12जीबी रॅम / 1टीबी मेमरी = 1,17,900 रुपये

सॅमसंगच्या गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10+ आणि गॅलेक्सी एस10ई चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

सॅमसंग ने आपले तिन्ही स्मार्टफोन्स 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केले आहेत तसेच हे फोन इनफिनिटी ओ ​डिस्प्लेला सपोर्ट करतात. डिस्प्ले साईज आणि रेज्ल्यूशन पाहता..

गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये 6.4-इंचाचा क्यूएचडी प्लस कर्व्ड डायनामाइक एमोलेड पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे.
गॅलेक्सी एस10 6.1-इंचाच्या क्वॉडएचडी प्लस कर्व्ड डायनामाइक एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो.
गॅलेक्सी एस10 5.8-इंचाच्या फुलएचडी+ फ्लॅट डायनामाइक एमोलेड पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे.

विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि एस10 प्लस चा फ्रंट पॅनल कंपनी ने गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला आहे. या दोन्ही स्मार्टफोनचा बॅक पॅनल गोरिल्ला ग्लास 5 ने सुसज्ज आहे. अशाचप्रकारे गॅलेक्सी एस10ई च्या फ्रंट व बॅक पॅनलला कंपनी ने गोरिल्ला ग्लास 5 ची मजबूती दिली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10ई चा डिस्प्ले 438 पीपीआई ला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एस10 चा ​डिस्प्ले 550 पीपीआई तर गॅलेक्सी एस10 प्लस चा डिस्प्ले 522 पीपीआई ला सपोर्ट करतो. इथे पीपीआई म्हणजे (पिक्सल पर इंच) आहे.

कॅमेरा सेटअप

सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज आपल्या डिजाईन व डिस्प्ले सोबत फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण खूप खास आहे. एकीकडे तिन्ही फोन मध्ये कॅमेरा प्लेसमेंट खूप वेगळ्या स्टाईल मध्ये करण्यात आली आहे त्याचबरोबर कॅमेरा सेंसरची पावर आणि फीचर पण शानदार आहेत.

गॅलेक्सी एस10 प्लसच्या फ्रंट पॅनल वर दोन पंच-होल आहेत ज्यात दोन सेल्फी कॅमेरा आहेत. यात एफ/1.9 अपर्चर वाला 10-मेगापिक्सलचा प्राइमरी सेल्फी तर एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी आरजीबी डेफ्थ सेंसिंग सेंसर देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एस10 सिंगल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या पंच-होल मध्ये एफ/1.9 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एस10ई मध्ये सेल्फी साठी 10-मेगापिक्सलचा पंच-होल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस च्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर आहेत. तिथे 12-मेगापिक्सलचा वेरिएबल अपर्चर वाला प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा सेंसर एफ/1.5 पासून एफ/2.4 अपर्चर पर्यंत सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे एफ/2.4 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा तिसरा सेंसर देण्यात आला आहे. या फोनचा रियर कॅमेरा सेटअप 2एक्स ऑप्टिकल आणि 10 एक्स डिजीटल झूम सोबत वाइड एंगल आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सारख्या फीचर्सला सपोर्ट करतो.

तसेच गॅलेक्सी एस10ई डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

बॅटरी

दमदार प्रोसे​सिंग कायम ठेवण्यासाठी सॅमसंग ने आपल्या गॅलेक्सी एस10 सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोन्सना फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज केले आहे. या तिन्ही फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. सोबतच गॅलेक्सी एस10 सीरीजचे तिन्ही फोन वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतात.

गॅलेक्सी एस10+ कंपनी ने 4,100एमएएच च्या बॅटरी वर लॉन्च केला आहे.
गॅलेक्सी एस10 स्मार्टफोन 3,400एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
गॅलेक्सी एस10ई मध्ये पावर बॅकअप साठी 3,100एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

रॅम व मेमरी

सॅमसंग ने गॅलेक्सी एस10 सीरीजचे तिन्ही स्मार्टफोन्स एकापेक्षा जास्त रॅम व स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले आहेत. चला एक नजर टाकूया..

गॅलेक्सी एस10 स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन 8जीबी रॅमला सपोर्ट करतो ज्यासोबत एक वेरिएंट मध्ये 128जीबी इंटरनल मेमरी तसेच दुसऱ्या मध्ये 512जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

गॅलेक्सी एस10+ दोन रॅम सह तीन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये सादर झाला आहे. हा फोन 8जीबी रॅम आणि 12जीबी रॅमला सपोर्ट करतो. स्टोरेज बद्दल बोलायचे तर हा 128जीबी, 512जीबी तसेच 1टीबी स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे.

गॅलेक्सी एस10ई सॅमसंग ने 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी तसेच 8जीबी रॅम सह 512जीबी मेमरी वर लॉन्च केला आहे.

विशेष म्हणजे सॅमसंग ने गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस आणि गॅलेक्सी एस10ई कंपनीच्या एक्सनॉस 9820 चिपसेट वर सादर केले गेले आहेत.

The post सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज भारतात झाली लॉन्च, बघा सर्व मॉडेल्सची किंमत आणि कधी होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-plus-s20e-launched-in-india-price-specifications-sale-offer-in-marathi/feed/ 0
6 मार्चला भारतात लॉन्च होईल सॅमसंगची गॅलेक्सी एस10 सीरीज, बघा यांचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-plus-s10e-to-launch-in-india-on-6-march-know-price-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-plus-s10e-to-launch-in-india-on-6-march-know-price-specification-in-marathi/#respond Wed, 27 Feb 2019 10:18:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3736 तिन्ही स्मार्टफोन आनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सोबत आफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होणार आहेत.

The post 6 मार्चला भारतात लॉन्च होईल सॅमसंगची गॅलेक्सी एस10 सीरीज, बघा यांचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्याच आठवड्यात अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आपली गॅलेक्सी एस10 सीरीज सादर करत एक साथ तीन नवीन फोन गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस आणि गॅलेक्सी एस10ई सादर केले होते. या स्मार्टफोन्स सोबत सॅमसंग ने गॅलेक्सी एस10 चा 5जी मॉडेल पण समोर आणला होता. सॅमसंग ने गॅलेक्सी एस10 सीरीज इनफिनिटी ओ डिस्प्ले वर सादर केला आहे. टेक मंचावर आल्यांनतरच समजले होते कि कंपनी लवकरच हे स्मार्टफोन्स भारतीय बाजारात पण आणेल. आता सॅमसंग इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवून सांगितले आहे कि येत्या 6 मार्चला गॅलेक्सी एस10 भारतात लॉन्च केला जाईल.

सॅमसंग इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवत सांगितले आहे कि कंपनी येत्या 6 मार्चला राजधानी दिल्ली मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून गॅलेक्सी एस10 सीरीज भारतीय बाजारात येईल. याच दिवशी सॅमसंग गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10ई आणि गॅलेक्सी एस10 प्लस स्मार्टफोन देशात लॉन्च केले जातील. हे तिन्ही स्मार्टफोन आनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सोबत आफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होणार आहेत.

अशा असतील किंमती

गॅलेक्सी एस10 सीरीजच्या आधीच या सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोन मॉडेलच्या भारतीय किंमती पण समोर आल्या आहेत, ज्या अशाप्रकारे आहेत :

गॅलेक्सी एस10ई
6जीबी रॅम / 128जीबी मेमरी = 55,900 रुपये

गॅलेक्सी एस10 प्लस
8जीबी रॅम / 128जीबी मेमरी = 66,900 रुपये
8जीबी रॅम / 512जीबी मेमरी = 84,900 रुपये

गॅलेक्सी एस10 प्लस
8जीबी रॅम / 128जीबी मेमरी = 73,900 रुपये
8जीबी रॅम / 512जीबी मेमरी = 91,900 रुपये
12जीबी रॅम / 1टीबी मेमरी = 1,17,900 रुपये

बघा सॅमसंगच्या गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10+ आणि गॅलेक्सी एस10ई मधील फरक

डिस्प्ले

सॅमसंग ने आपले तिन्ही स्मार्टफोन्स 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केले आहेत तसेच हे फोन इनफिनिटी ओ ​डिस्प्लेला सपोर्ट करतात. डिस्प्ले साईज आणि रेज्ल्यूशन पाहता..

गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये 6.4-इंचाचा क्यूएचडी प्लस कर्व्ड डायनामाइक एमोलेड पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे.
गॅलेक्सी एस10 6.1-इंचाच्या क्वॉडएचडी प्लस कर्व्ड डायनामाइक एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो.
गॅलेक्सी एस10 5.8-इंचाच्या फुलएचडी+ फ्लॅट डायनामाइक एमोलेड पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे.

विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि एस10 प्लस चा फ्रंट पॅनल कंपनी ने गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला आहे. या दोन्ही स्मार्टफोनचा बॅक पॅनल गोरिल्ला ग्लास 5 ने सुसज्ज आहे. अशाचप्रकारे गॅलेक्सी एस10ई च्या फ्रंट व बॅक पॅनलला कंपनी ने गोरिल्ला ग्लास 5 ची मजबूती दिली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10ई चा डिस्प्ले 438 पीपीआई ला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एस10 चा ​डिस्प्ले 550 पीपीआई तर गॅलेक्सी एस10 प्लस चा डिस्प्ले 522 पीपीआई ला सपोर्ट करतो. इथे पीपीआई म्हणजे (पिक्सल पर इंच) आहे.

कॅमेरा सेटअप

सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज आपल्या डिजाईन व डिस्प्ले सोबत फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण खूप खास आहे. एकीकडे तिन्ही फोन मध्ये कॅमेरा प्लेसमेंट खूप वेगळ्या स्टाईल मध्ये करण्यात आली आहे त्याचबरोबर कॅमेरा सेंसरची पावर आणि फीचर पण शानदार आहेत.

गॅलेक्सी एस10 प्लसच्या फ्रंट पॅनल वर दोन पंच-होल आहेत ज्यात दोन सेल्फी कॅमेरा आहेत. यात एफ/1.9 अपर्चर वाला 10-मेगापिक्सलचा प्राइमरी सेल्फी तर एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी आरजीबी डेफ्थ सेंसिंग सेंसर देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एस10 सिंगल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या पंच-होल मध्ये एफ/1.9 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एस10ई मध्ये सेल्फी साठी 10-मेगापिक्सलचा पंच-होल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस च्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर आहेत. तिथे 12-मेगापिक्सलचा वेरिएबल अपर्चर वाला प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा सेंसर एफ/1.5 पासून एफ/2.4 अपर्चर पर्यंत सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे एफ/2.4 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा तिसरा सेंसर देण्यात आला आहे. या फोनचा रियर कॅमेरा सेटअप 2एक्स ऑप्टिकल आणि 10 एक्स डिजीटल झूम सोबत वाइड एंगल आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सारख्या फीचर्सला सपोर्ट करतो.

तसेच गॅलेक्सी एस10ई डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

बॅटरी

दमदार प्रोसे​सिंग कायम ठेवण्यासाठी सॅमसंग ने आपल्या गॅलेक्सी एस10 सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोन्सना फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज केले आहे. या तिन्ही फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. सोबतच गॅलेक्सी एस10 सीरीजचे तिन्ही फोन वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतात.

गॅलेक्सी एस10+ कंपनी ने 4,100एमएएच च्या बॅटरी वर लॉन्च केला आहे.
गॅलेक्सी एस10 स्मार्टफोन 3,400एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
गॅलेक्सी एस10ई मध्ये पावर बॅकअप साठी 3,100एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

रॅम व मेमरी

सॅमसंग ने गॅलेक्सी एस10 सीरीजचे तिन्ही स्मार्टफोन्स एकापेक्षा जास्त रॅम व स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले आहेत. चला एक नजर टाकूया..

गॅलेक्सी एस10 स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन 8जीबी रॅमला सपोर्ट करतो ज्यासोबत एक वेरिएंट मध्ये 128जीबी इंटरनल मेमरी तसेच दुसऱ्या मध्ये 512जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

गॅलेक्सी एस10+ दोन रॅम सह तीन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये सादर झाला आहे. हा फोन 8जीबी रॅम आणि 12जीबी रॅमला सपोर्ट करतो. स्टोरेज बद्दल बोलायचे तर हा 128जीबी, 512जीबी तसेच 1टीबी स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे.

गॅलेक्सी एस10ई सॅमसंग ने 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी तसेच 8जीबी रॅम सह 512जीबी मेमरी वर लॉन्च केला आहे.

विशेष म्हणजे सॅमसंग ने गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस आणि गॅलेक्सी एस10ई क्वालकॉमच्या नवीन आणि पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर लॉन्च केले आहेत. भारतात ये तिन्ही स्मार्टफोन कंपनीच्या एक्सनॉस 9820 चिपसेट वर सादर केले जाऊ शकतात.

The post 6 मार्चला भारतात लॉन्च होईल सॅमसंगची गॅलेक्सी एस10 सीरीज, बघा यांचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-plus-s10e-to-launch-in-india-on-6-march-know-price-specification-in-marathi/feed/ 0
बघा सॅमसंग गॅलेक्सी एस10, एस10+ आणि एस10ई ची भारतातील किंमत, आहेत का आयफोन पेक्षा महाग https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-galaxy-s10-galaxy-s10e-india-price-revealed-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-galaxy-s10-galaxy-s10e-india-price-revealed-in-marathi/#respond Fri, 22 Feb 2019 10:11:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3687 लॉन्चच्या एका दिवसानंतर कंपनी ने आता या तिन्ही फोनच्या भारतीय किंमतींचा खुलासा केला आहे.

The post बघा सॅमसंग गॅलेक्सी एस10, एस10+ आणि एस10ई ची भारतातील किंमत, आहेत का आयफोन पेक्षा महाग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग ने सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये आपली गॅलेक्सी एस10 सीरीज सादर केली आहे. या सीरीज मध्ये तीन नवीन मॉडेल सादर केले गेले आहेत, ज्यात सॅमसंग गॅलेक्सी एस10, सॅमसंग गॅलेक्सी एस10+ आणि सॅमसंग गॅलेक्सी एस10ई यांचा समावेश आहे. तिन्ही स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन एक सारखे आहेत. जसे कि प्रोसेसर, एचडीआर10+ सर्टिफिकेशन सह डायनमिक एमोलेड डिस्प्ले, फास्ट वायरलेस चार्जिंग 2.0 आणि वायरलेस पावर शेयर. लॉन्चच्या एका दिवसानंतर कंपनी ने आता या तिन्ही फोनच्या भारतीय किंमतींचा खुलासा केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10, एस10+ आणि सॅमसंग गॅलेक्सी एस10ई ची भारतीय किंमत
सॅमसंग गॅलेक्सी एस10+ च्या 1टीबी, 512जीबी आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत क्रमश: 1,17,900 रुपये, 91,900 रुपये आणि 73,900 रुपये आहे. तसेच गॅलेक्सी एस10एस च्या 512जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 84,900 रुपये आहे. तर याच्या 128जीबी वेरिएंटची किंमत 66,900 रुपये आहे. या सीरीजचा सर्वात स्वस्त वेरिएंट गॅलेक्सी एस10ई बद्दल बोलायचे तर याच्या 128जीबी वेरिएंटची किंमत 55,900 रुपये आहे.

विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज स्मार्टफोन शुक्रवार पासून फ्लिपकार्ट वर प्री-ऑर्डर बुकिंग साठी उपलब्ध होतील. हि माहिती ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट ने आपल्या वेबसाइट वर दिली आहे. तसेच हा डिवाइस कंपनीच्या वेबसाइट वर पण लिस्ट आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10ई चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
सॅमसंग गॅलेक्सी एस10ई मध्ये 5.8-इंचाचा फुल एचडी+ फ्लॅट डायनेमिक ऐमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा एस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. गॅलेक्सी एस10ई कंपनी च्या एस10 सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. यात क्वालकॉमचा 855 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर देण्यात आला आहे. पण भारतात हा डिवाइस कंपनी आपल्या स्वतःच्या सॅमसंग ऑक्टा कोर एक्सनोस 9820 प्रोसेसर वर सादर शकते.

यात तुम्हाला 8 नॅनोमीटर फॅबरिककेशन वाला ऑक्टाकोर (2×2.7 गीगाहट्र्ज मॉनगूज एम4 + 2×2.3 गीगाहट्र्ज कोर्टेक्स-ए75 आणि 4×1.9 गीगाहट्र्ज कोटेक्स-ए55) प्रोसेसर मिळेल. तसेच फोन मध्ये 6जीबी व 8जीबी रॅम देण्यात आला आहे. सोबत स्टोरेज साठी फोन मध्ये 128जीबी व 256जीबी स्टोरेजचे ऑप्शन आहेत. तसेच स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येइल.

फोटोग्राफी साठी गॅलेक्सी एस10ई मध्ये 12-मेगापिक्सलचा वाइंड एंगल+ 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. गॅलेक्सी एस10ई मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 10-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पवार बॅकअप साठीलिए गॅलेक्सी एस10ई मध्ये 3,100एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते. फोनची फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वायर आणि वायरलेस चार्जर सह चालेल. फोन एंडरॉयड पाई वर चालतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि सॅमसंग गॅलेक्सी 10+ स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स साठी इथे क्लिक करा

The post बघा सॅमसंग गॅलेक्सी एस10, एस10+ आणि एस10ई ची भारतातील किंमत, आहेत का आयफोन पेक्षा महाग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-galaxy-s10-galaxy-s10e-india-price-revealed-in-marathi/feed/ 0
12जीबी रॅम, ट्रिपल कॅमेरा आणि 1टीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च झाले सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-and-galaxy-s10-plus-launched-with-tripal-camera-1tb-memory-and-12gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-and-galaxy-s10-plus-launched-with-tripal-camera-1tb-memory-and-12gb-ram/#respond Thu, 21 Feb 2019 08:39:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3679 जगातील पहिला फोन आहे ज्यात अल्ट्रासोनिक इनडिप्ले फिंगरप्रिंट स्कॅनर वापरण्यात आला आहे

The post 12जीबी रॅम, ट्रिपल कॅमेरा आणि 1टीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च झाले सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवस चर्चेत रोहिल्यांनंतर अखेरीस ती वेळ आलीच, सॅमसंग ने आपला फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस10 सादर केला आहे. कंपनी ने अमेरिकेतील सॅनफ्रांसिस्को मधील एका इवेंट मध्ये हे फोन्स सादर केले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत गॅलेक्सी एस सीरीज मध्ये एक किंवा दोन फोन लॉन्च व्हायचे पण यावेळी कंपनी ने चार फोन आणले आहेत. सॅमसंगने गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस, गॅलेक्सी एस10ई आणि गॅलेक्सी एस10 5जी सादर केले आहेत. पण यात सर्वात जास्त चर्चा गॅलेक्सी एस10 आणि एस10 प्लस होत आहे जे खूप दमदार आहेत. कंपनीने पहिल्यांदा 12जीबी रॅम असलेला फोन सादर केला आहे. सोबत मोठी मेमरी पण आहे आणि दमदार कॅमेरा पण आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज फोन लॉन्च मध्ये सुजान डिसिल्वा, डायरेक्टर प्रोडक्ट सॅमसंगचे म्हणणे होते कि “सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लस सह आम्ही जगातील पहिला इनफिनिटी ओ डिस्प्ले असलेला फोन लॉन्च करत आहोत जो सुपर एमोलेड डिस्प्ले सह येतो आणि यह एचडीआर10 सपोर्ट करतो. तसेच त्यांनी असे पण सांगितले कि हा जगातील पहिला फोन आहे ज्यात अल्ट्रासोनिक इनडिप्ले फिंगरप्रिंट स्कॅनर वापरण्यात आला आहे.”

सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस ची डिजाइन

सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि एस10 प्लस ची डिजाइन पाहता हे फोन्स पण आधी लॉन्च एस किंवा नोट सीरीजच्या प्रमाणे ग्लास बॅक पॅनल सह सादर केले गेले आहेत पण जुन्या फोन पेक्षा थोडे मोठे आहेत. दोन्ही फोन कंपनी ने ट्रिपल कॅमेऱ्यासह सादर केले आहेत जो हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे. सोबत फ्लॅश लाईट आहे. गॅलेक्सी एस10 प्लस के फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या वर उजवीकडे दोन छोटेशे छिद्र देण्यात आले आहेत. या दोन्ही छिद्रात डुअल कॅमेरा सेंसर आहे. तसेच गॅलेक्सी एस10 मध्ये तुम्हाला सिंगल कॅमेरा सेंसर मिळेल. कंपनी ने पंच होल स्टाइल मध्ये सेल्फी कॅमेरा दिला आहे. याआधी चीन मध्ये सॅमसंग ने गॅलेक्सी ए8एस सादर केला होता जो जगातील पहिला पंच होल वाल कॅमेरा होता. याला कंपनी ने इनफिनिटी होलचे नाव दिले होते.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस आईपी68 रेटेड आहेत ज्यामुळे ते दिढ मीटर पाण्यात जवळपास 30 मिनटे राहून पण खराब होणार नाहीत. सोबतच फोन धूळरोधक पण आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लसचा डिस्प्ले

नावाप्रमाणेच गॅलेक्सी एस10 प्लसची स्क्रीन थोडी मोठी आहे. कंपनी ने सॅमसंग गॅलेक्सी एस10 19:9 आसपेक्ट रेशियो असलेली 6.1-इंचाची कर्व्ड डायनेमिक सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो असलेली 6.4-इंचाची कर्व्ड डायनेमिक सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही फोन क्वाड एचडी+ (1440 x 3040) पिक्सल रेजल्यूशनला सपोर्ट करतात आणि बेजल लेस डिस्प्ले सह येतात.

इतकेच नव्हे तर यात एचडीआर10 आणि ऑलवेज़ ऑन डिस्प्ले सपोर्ट पण आहे. राहिला प्रश्न प्रोटेक्शनचा तर कंपनी ने हे फोन गोरिल्ला ग्लास 6 ने सुसज्ज केले आहेत जी कोर्निंगची नवीनतम प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस चा रॅम व प्रोसेसर

तुम्हाला तर माहितीच आहे सॅमसंग आपले फ्लॅगशिप फोन नेहमी क्वालकॉम आणि एक्सनोस सहित दोन चिपसेट वर लॉन्च करते आणि यावेळी पण असेच झाले आहे. यूएस मध्ये हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर होई तर भारतासह दुसऱ्या देशात एक्सनोस एक्नोस 9820 चिपसेट असलेला फोन येईल. यात तुम्हाला 8 नॅनोमीटर फॅबरिककेशन वाला ऑक्टाकोर (2×2.7 गीगाहट्र्ज मॉनगूज एम4 + 2×2.3 गीगाहट्र्ज कोर्टेक्स-ए75 आणि 4×1.9 गीगाहट्र्ज कोटेक्स-ए55) मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 मध्ये 8जीबी रॅम देण्यात आला आहे. सोबत या फोन मध्ये 128जीबी आणि 512जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 512जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लस 8जीबी आणि 12जीबी रॅम सह सादर केला गेला आहे. तसेच कंपनी ने यात 128जीबी, 512जीबी आणि 1टीबी मेमरी दिली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मेमरी असलेला फोन आहे. सोबत 512जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट पण आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस चा कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस च्या बॅक पॅनल मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. याचा मेन कॅमेरा 12-मेगापिक्सलचा आहे जो वेरियेबल अपर्चर सह येतो. हा सेंसर एफ/1.5 अपर्चर पासून एफ/2.4 पर्यंत सपोर्ट करतो. यात वाइड एंगल सह ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सपोर्ट देण्यात आला आहे. असे आपण आधीपण एस10 प्लस आणि नोट9 मध्ये बघितले आहे. तसेच सेकेंडरी कॅमेरा पण 12-मेगापिक्सल एफ/2.4 अपर्चर वाला आहे. हा सेंसर टेलीफोटो लेंस आहे. तसेच तिसरा सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.4 अपर्चर क्षमता असलेला आहे. फोन मध्ये 2एक्स ऑप्टिकल आणि 10 एक्स डिजिटल जूम सपोर्ट आहे.

गॅलेक्सी एस10 मध्ये 8-मेगापिक्सलची सिंगल सेल्फी लेंस आहे जी एफ/1.9 अपर्चर सह येते. तसेच गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये तुम्हाला 10-मेगापिक्सल (एफ/1.9 आर्चर) + 8-मेगापिक्सल (एफ/2.2 अपर्चर) चा डुअल सेंसर मिळेल. यात दूसरा सेंसर आरजीबी आहे जो डेफ्थ सेंसिंग साठी पण उपयोगी पडतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस चा ओएस

सॅमसंगचे हे दोन्ही फोन कंपनीच्या नवीन वन यूआई वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई आधारित आहें. हा एंडरॉयडचा नवीन ओएस आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस मधील कनेक्टिविटी ऑप्शन

दोन्ही मॉडेल मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे. सोबत 4जी वोएलटीई, वाईफाई आणि ब्लूटूथ पण देण्यात आली आहे. या फोन्स सह कंपनी ने इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरवात केली आहे. त्याचबरोबर फेस डिटेक्शन पण आहे.

पावर बॅकअप साठी सॅमसंग गॅलेक्सी एस10 मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये तुम्हाला 4,000 चा पावर बॅकअप मिळेल. कंपनी ने यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला जात आहे जो फार्स्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त वायरलेस चार्जिग पण आहे.

कधी येतील भारतात

6 मार्चला हे फोन भारतात लॉन्च केले जातील. चांगली बाब अशी कि या फोन्सचे सर्व मॉडेल भारतात उपलब्ध होतील ज्यात 12जीबी रॅम असलेला फोन पण आहे. राहिला प्रश्न किंमतीचा तर पन्नास हजारापासून 1 लाखापर्यंत याच्या किंमती असतील.

The post 12जीबी रॅम, ट्रिपल कॅमेरा आणि 1टीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च झाले सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-and-galaxy-s10-plus-launched-with-tripal-camera-1tb-memory-and-12gb-ram/feed/ 0
सॅमसंगच्या घडी होणाऱ्या फोनचे नाव असेल गॅलेक्सी फोल्ड, असतील हि वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/samsungs-foldable-phone-will-be-officially-called-galaxy-fold-galaxy-unpacked-event-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsungs-foldable-phone-will-be-officially-called-galaxy-fold-galaxy-unpacked-event-in-marathi/#respond Wed, 20 Feb 2019 12:33:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3676 गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंटची लाइव स्ट्रीमिंग सॅमसंगच्या फेसबुक आणि ट्विटर पेज सोबत यूट्यूब चॅनेलवर केली जाईल.

The post सॅमसंगच्या घडी होणाऱ्या फोनचे नाव असेल गॅलेक्सी फोल्ड, असतील हि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन कंपनी सॅमसंग आज म्हणजे 20 फेब्रुवारीला आपल्या गॅलेक्सी एस10 सीरीजचे नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. सॅन फ्रँसिस्को मध्ये आयोजित गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंट मध्ये गॅलेक्सी एस10+, गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10ई स्मार्टफोन्स लॉन्च केले जातील. तसेच रिपोर्ट्स नुसार कंपनी गॅलेक्सी एस10 सीरीज व्यतिरिक्त आपला पहिला फोल्डेबल फोन पण लॉन्च करेल.

आता लॉन्चच्या थोडावेळ आधीच या फोल्डेबल डिवाइसचे ऑफिशल नाव लीक झाले आहे. पॉप्युलर टिपस्टर इवान ब्लास ने ट्वीट करून सांगितले कि कंपनीच्या या फोल्डेबल फोनचे ऑफिशल नाव ‘सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड’ असेल. आतापर्यंत आलेल्या रिपोर्ट्स मध्ये या फोल्डेबल फोनला गॅलेक्सी एफ, गॅलेक्सी फ्लेक्स आणि गॅलेक्सी एक्स अशी नावे देण्यात आली होती.

डुअल कॅमेरा आणि वाटर ड्रॉप नॉच सह लॉन्च झाला वीवोचा स्वस्तातला फोन यू1

सॅन फ्रँसिस्को मध्ये होणारा इवेंट आज संध्यकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार 21 फेब्रुवारी 12:30 वाजता) सुरु होईल. इतकेच तर गॅलेक्सी एस10 सीरीजच्या या फोन्सची प्री-बुकिंग पण आज रात्री सुरु होईल.

गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंटची लाइव स्ट्रीमिंग सॅमसंगच्या फेसबुक आणि ट्विटर पेज सोबत यूट्यूब चॅनेलवर केली जाईल. लॉन्चच्या आधी या सर्व फोन्स बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत.

48एपमी ट्रिपल कॅमेरा, 32एमपी पॉपअप सेल्फी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला वीवो वी15 प्रो

गॅलेक्सी एस10 सीरीज मध्ये असू शकतात हे फीचर्स
समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस10, एस10+, एस10ई मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर असेल. तसेच गॅलेक्सी एस10 चे 6जीबी/8जीबी रॅम सोबत 128जीबी/512जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट असतील. गॅलेक्सी एस10+ पाहता याचे 6जीबी/8जीबी/12जीबी रॅम सह 128जीबी/512जीबी आणि 1टीबी स्टोरेज वेरिएंट सादर केले जाऊ शकतात. शेवटी बोलूया गॅलेक्सी एस10 सीरीजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी एस10ई बद्दल, यात 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असेल.

The post सॅमसंगच्या घडी होणाऱ्या फोनचे नाव असेल गॅलेक्सी फोल्ड, असतील हि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsungs-foldable-phone-will-be-officially-called-galaxy-fold-galaxy-unpacked-event-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव: 6 मार्चला भारतात लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज, 15 मार्च पासून होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-to-launch-in-india-on-6th-march-and-sale-starts-from-15th-march-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-to-launch-in-india-on-6th-march-and-sale-starts-from-15th-march-in-marathi/#respond Wed, 06 Feb 2019 13:22:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3562 विशेष म्हणजे कोणताही मॉडेल 1 लाखांपेक्षा जास्त बजेट मध्ये नसेल.

The post एक्सक्लूसिव: 6 मार्चला भारतात लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज, 15 मार्च पासून होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही दिवसांपासून सॅमसंगच्या नव्या फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस10 ची चर्चा सुरु आहे. अलीकडे कंपनी ने माहिती दिली आहे कि 20 फेब्रुवारीला यांचा ग्लोबल लॉन्च केला जाईल. या बातमी सोबतच भारतात पण सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीजची चाहूल लागली आहे आणि आज 91मोबाईल्स कडे या फोन बद्दल खास माहिती आहे. आमच्याकडे फोनच्या लॉन्च डेट पासून सेल डेट पर्यंतची बातमी आहे.

प्राप्त माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस10 भारतात 6 मार्चला लॉन्च केला जाईल. तसेच 15 मार्च पासून हा फोन भारतात सेल साठी उपलब्ध होईल. आम्हाला हि माहिती सॅमसंगच्या एका अशा डिस्ट्रीब्यूटर कडून मिळाली आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी सोबत आहे. त्यांनी आम्हाला गॅलेक्सी एस10 बद्दल अजून पण बरीच खास माहिती दिली आहे. तसेच इतर काही सोर्स कडून आम्ही या बातमीची पडताळणी केली आहे.

त्यांनी सांगितले कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीजचे सर्व फोन गॅलेक्सी एस10ई, गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस भारतात लॉन्च केले जातील. पण सर्वात खास बात जी समोर आली आहे ती अशी कि यात 12जीबी रॅम मॉडेल वाला गॅलेक्सी एस10 प्लस पण असेल जो 5जी सपोर्ट सह येईल.

जी माहिती आम्हाला देण्यात आली आहे त्यानुसार सॅमसंग गॅलेक्सी एस10ई ची किंमत 50,000 रुपयांपासून सुरु होईल. तर गॅलेक्सी एस10 कंपनी 65,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च करणार आहे तसेच सर्वात महाग गॅलेक्सी एस10 असेल ज्याची बेस किंमत 75,000 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी माहिती दिली आहे कि कोणताही मॉडेल 1 लाखांपेक्षा जास्त बजेट मध्ये नसेल.

सॅमसंग कडून अजूनतरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु एवढे नक्की कि ग्लोबल लॉन्च सोबत कंपनी भारतातील याच्या उपलब्धतेबद्दल माहिती देऊ शकते.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीजचे स्पेसिफिकेशन पाहता आतापर्यंत आलेल्या लीक नुसार सॅमसंग गॅलेक्सी एस10ई मध्ये 5.8-इंचाची सुपर एमोलेड स्क्रीन असेल. कंपनी हि 1440 x 2960 पिक्सल रेजल्यूशन सह सादर करू शकते जी 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह येईल. फोनची स्क्रीन गोरिल्ला ग्लास 6 कोटेड असू शकते. फोन 8 नॅनो मीटर फॅबरिकेशन असलेल्या एक्सनोस 9820 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो आणि यात 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी मिळू शकते.

गॅलेक्सी एस10 पाहता हा फोन थोड्या मोठ्या स्क्रीन सह सादर केला जाऊ शकतो. फोन मध्ये 6.1-इंचाची 1440 x 2960 पिक्सल रेजल्यूशन असलेली सुपर एमोलेड स्क्रीन मिळू शकते जो एचडीआर10 सपोर्ट सह येईल. हा फोन पण गोरिल्ला ग्लास 10 सपोर्ट सह येऊ शकतो. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसर हा फोन पण 8 नॅनो मीटर फॅबरिकेशन वाल्या एक्सनोस 9820 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो आणि यात 6जीबी रॅम व्यतिरिक्त एक मॉडेल 8जीबी वाला पण असेल. दोन्ही सोबत 128जीबी मेमरी मिळेल.

या सीरीजचा सर्वात वरचा मॉडेल सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लस असेल. हा फोन 6.4-इंचाच्या स्क्रीन सह लॉन्च होईल आणि कंपनी हा 1440 x 2960 पिक्सल रेजल्यूशन वाल्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह अनु शकते. फोन मध्ये गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्सन सोबत एचडीआर10 सपोर्ट मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार याचा सर्वात वरच्या वेरियंट मध्ये 12जीबी रॅम असेल आणि 1टीबी इंटरनल मेमरी असू शकते. तसेच 512जीबी चा एक्सटर्नल मेमरी सपोर्ट पण असेल. भारतात हा फोन पण एक्सनोस 9820 चिपसेट सह येऊ शकतो. तसेच यूएस सहित काही बाजारांत मध्ये कंपनी हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह सादर करू शकते.

The post एक्सक्लूसिव: 6 मार्चला भारतात लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज, 15 मार्च पासून होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-to-launch-in-india-on-6th-march-and-sale-starts-from-15th-march-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लसचा खरा फोटो, डुअल पंच-होल डिस्प्ले सह असेल क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-s10-real-image-dual-punch-hole-display-quad-rear-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-s10-real-image-dual-punch-hole-display-quad-rear-camera-in-marathi/#respond Fri, 01 Feb 2019 12:30:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3513 गॅलेक्सी एस10 प्लसची सर्वात मोठी खासियत फोन मधील दोन पंच होल असतील. तसेच हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लसचा खरा फोटो, डुअल पंच-होल डिस्प्ले सह असेल क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग येत्या 20 फेब्रुवारीला सॅन फ्रांसिस्को मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मधून कंपनीचा गॅलेक्सी एस10 टेक मंचावर येईल. चर्चा अशी आहे कि यादिवशी सॅमसंग गॅलेक्सी एस10 सोबत गॅलेक्सी एस10 लाइट, गॅलेक्सी एस10 प्लस अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च करेल. तसेच सॅमसंग या ईवेंट मध्ये आपला पहिला 5जी स्मार्टफोन पण दाखवू शकते. सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज बद्दल आतापर्यंत अनेकप्रकारचे लीक्स आले आहेत. पण आज 91मोबाईल्स सॅमसंगच्या अधिकृत घोषणेच्या आधी गॅलेक्सी एस10 प्लस ची ईमेंज घेऊन आला आहे.

91मोबाईल्सला सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लस चा खरा फोटो मिळाला आहे. या फोटोज मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दखवण्यात आले आहेत. या फोटोज मधून एकीकडे गॅलेक्सी एस10 प्लस च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे तर दुसरीकडे या फोनच्या काही फीचर्सचा खुलासा पण फोन लॉन्चच्या आधी झाला आहे. गॅलेक्सी एस10 प्लसची सर्वात मोठी खासियत फोन मधील दोन पंच होल असतील. तसेच हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

गॅलेक्सी एस10 प्लस च्या फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या उजवीकडे दोन छोटे छिद्र देण्यात आले हायेत. या दोन्ही छिद्रांमध्ये दोन कॅमेरा सेंसर आहेत. आतपर्यंत सिंगल पंच होल डिस्प्ले वाले फोनच बाजारात आले आहेत पण गॅलेक्सी एस10 प्लस नवा रिकॉर्ड बनावट डुअल ​पंच होल डिस्प्ले असलेला फोन आणत आहे. फोन मध्ये फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे जो दोन्ही बाजूने कर्व्ड आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आले आहे तर डाव्या पॅनल वर वाल्यूम बटण आणि बिक्सबे बटण आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लसच्या बॅक पॅनल वर हॉरिजॉन्टल शेप मध्ये क्चॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो फ्लॅश लाईट सह येतो. या चार कॅमेरा सेंसर्स मध्ये प्राइमरी शूटर सह एक टेलीफोटो लेंस, एक वाईड एंगल लेंस आणि एक स्टैंडर्ड लेंस असेल. गॅलेक्सी एस10 प्लसच्या बॅक पॅनल वर ​फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही. बॅक पॅनल वर मधोमध सॅमसंग लोगो आहे तसेच खालच्या बाजूला गॅलेक्सी एस10 प्लस लिहिण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता गॅलेक्सी एस10 प्लस क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर ​लॉन्च केला जाऊ शकतो. तर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये बोलले जात आहे कि गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9820 चिपसेट असेल. काही दिवसांपूर्वी ​गीकबेंच वर गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये 6जीबी रॅम असल्याचे समोर आले होते. गॅलेक्सी एस10 प्लसच्या फोटो नंतर लवकरच या फोनचे स्पेसिफिकेशन्स पण आम्ही घेऊन येऊ.

The post एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लसचा खरा फोटो, डुअल पंच-होल डिस्प्ले सह असेल क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-s10-real-image-dual-punch-hole-display-quad-rear-camera-in-marathi/feed/ 0