21,000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे Samsung Galaxy S10 स्मार्टफोन, जाणून घ्या कशाप्रकारे आणि कुठून घ्यावा विकत

Samsung ने गेल्यावर्षी आपल्या फ्लॅगशिप ‘एस’ सीरीज मध्ये तीन पावरफुल स्मार्टफोन Samsung Galaxy S10, Samsung Galaxy S10+ आणि Samsung Galaxy S10e लॉन्च केले होते. या स्मार्टफोन्सचे अपग्रेड Samsung Galaxy S20 सीरीजच्या माध्यमातून समोर आले आहेत पण अजूनही अनेक असे भारतीय यूजर आहेत जे गॅलेक्सी एस20 च्या जास्त किंमतीमुळे गॅलेक्सी एस10 सीरीज घेऊ इच्छित आहेत. अश्याच स्मार्टफोन यूजर्सना भेट देत आता कंपनीने Samsung Galaxy S10 स्मार्टफोन थेट 21,000 रुपयांनी कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध केला आहे जी हा फोन विकत घेण्याची शानदार संधी आहे.

Samsung Galaxy S10 ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया वर या मोठ्या डिस्काउंट सह विक्रीसाठी उपलब्ध केला आत आहे. ज्या सॅमसंग फॅन्स व इतर स्मार्टफोन यूजर्सना हा फोन को विकत घ्यायचा आहे त्यांच्यासाठी गॅलेक्सी एस10 स्मार्टफोन विकत घेण्याची हि सुवर्णसंधी आहे. अमेझॉन वर Galaxy S10 ची छापील किंमत 71,000 रुपये आहे तर वेबसाइट हा फोन 21,001 रुपयांच्या डिस्काउंट नंतर आता 49,999 रुपयांमध्ये विकत आहे.

अमेझॉन इंडिया वर सॅमसंग गॅलेक्सी एस10 स्मार्टफोन 49,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन वेरिएंट सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट वर 57,800 रुपयांमध्ये विकला जात आहे तसेच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर Galaxy S10 चा Prism Black वेरिएंट 54,999 रुपये तर Prism Blue वेरिएंट 57,800 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S10

सॅमसंग गॅलेक्सी एस10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.1-इंचाच्या क्वॉडएचडी+ कर्व्ड डायनमिक एमोलेड इनफिनिटी ‘ओ’ ला सपोर्ट करतो जो 550 पीपीआई पिक्सल डेनसिटी सह येतो. हँडसेट मध्ये 7एनएम ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S10 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो सॅमसंगच्या डुअल ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी सह येतो. या सेटअप मध्ये 12 मेगापिक्सलची 77 डिग्री लेंस वाइड-अँगल कॅमेरा आहे. एक एफ/ 2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची 45 डिग्री टेलीफोटो लेंस आहे. तसेच 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस कॅमेरा आहे. हा सेटअप 10x डिजिटल झूमला सपोर्ट करतो.

फ्रंट पॅनल वर 10-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy S10 भारतात 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे तसेच फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. फोन मध्ये अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच 3,400 एमएएच ची बॅटरी फोन मध्ये जीव ओतण्याचे काम करते.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here