Samsung संबंधित हि बातमी अनेक दिवसांपासून येत आहे कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी नोट’ सीरीज मध्ये नवीन डिवाईस लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि या Galaxy Note 10 Lite नावाने टेक मंचावर येईल. गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता, ज्यावरून फोनच्ये अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. तसेच आता Samsung Galaxy Note 10 Lite च्या कॅमेरा डिपार्टमेंट संबंधित महत्वाचे डिटेल्स पण समोर आले आहेत. एका ताजा रिपोर्ट मध्ये Galaxy Note 10 Lite च्या सेल्फी कॅमेरा सोबतच याच्या रियर सेंसरचा खुलासा झाला आहे.
Samsung Galaxy Note 10 Lite संबंधित हि नवीन माहिती डरॉयडशाउट नावाच्या वेबसाइटने पब्लिश केली आहे. या वेबसाइटनुसार Galaxy Note 10 Lite सॅमसंग द्वारा 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सह लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे गॅलेक्सी नोट सीरीजच्या कोणत्याही स्मार्टफोन मध्ये आतापर्यंत 32 मेगापिक्सलचा फ्रंट मिळाला नाही. त्यामुळे जर Galaxy Note 10 Lite 32MP सेल्फी कॅमेरा सह आला तर हा Samsung चा पहिला नोट डिवाईस असेल जो इतक्या पावरफुल फ्रंट कॅमेऱ्यासह येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस असू शकते.
गीकबेंच लिस्टिंग
Samsung Galaxy Note 10 Lite च्या गीकबेंच लिस्टिंग बद्दल बोलायचे तर बेंचमार्किंग साइट वर हा फोन एंडरॉयड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे जो वनयूआई 2.0 सह येईल. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9810 चिपसेट असल्याचे समोर आले आहे. गीकबेंच नुसार Samsung Galaxy Note 10 Lite मध्ये 6 जीबी रॅम मिळेल. स्कोरिंग पाहता गीकबेंच वर Samsung Galaxy Note 10 Lite ला सिंगल-कोर मध्ये 667 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये 2030 स्कोर देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S10 Lite चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार या स्मार्टफोन मध्ये 6.69 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो. तसेच असे सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा दिला जाईल. पावरबॅक साठी Samsung Galaxy S10 Lite मध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी असल्याचे समोर आले आहे.
Samsung Galaxy Note 10 Lite बद्दल कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स आणि डिटेल्स वर विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत Samsung स्वतः Galaxy Note 10 Lite बद्दल बोलत नाही.
















