Samsung Galaxy S21 Ultra - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 23 Feb 2021 11:02:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 24,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे Samsung सर्वात पावरफुल फोन Galaxy S21 Ultra 5G, जाणून घ्या कुठे मिळेल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-ultra-5g-gets-24000-rupees-discount-amazon-feb-fest-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-ultra-5g-gets-24000-rupees-discount-amazon-feb-fest-sale/#respond Tue, 23 Feb 2021 11:02:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10130 Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोन 3200 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या क्वाॅडएचडी+ ऐज डिस्प्लेला सपोर्ट करतो. तसेच, फोन अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 वर चालतो.

The post 24,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे Samsung सर्वात पावरफुल फोन Galaxy S21 Ultra 5G, जाणून घ्या कुठे मिळेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगचा सर्वात पावरफुल गॅलेक्सी एस21 अल्ट्रा 5G लॉन्चनंतर एका महिन्यांनी कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हि बातमी त्या ग्राहकांसाठी उपयोगाची आहे जे हा हँडसेट महागड्या किंमतीमुळे खरेदी करू शकले नाहीत. एका महिन्यात हा फ्लॅगशिप फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध आहे. अमेझॉन इंडियावर ‘Fab Phones Fest’ मध्ये हँडसेट 24 हजार रुपयांच्या मोठ्या डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. (samsung galaxy s21 ultra 5g gets 24000 rupees discount amazon feb fest sale)

इथून घ्या विकत

ई-कॉमर्स साइट अमेझॉनवर ‘Fab Phones Fest’ ची सुरुवात करण्यात आली आहे. हा फेस्ट 22 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारी पर्यंत सुरु राहील. या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्रा 5G 24 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकत घेण्याची संधी दिली जात आहे.

हे देखील वाचा : डुअल सेल्फी आणि जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला Vivo S9 घेईल 3 मार्चला एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही

किती असेल किंमत

सॅमसंगने या फोनचा 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 1,05,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. आता मर्यादित काळासाठी या फोनचा 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज वेरियंट 81,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोन 3200 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या क्वाॅडएचडी+ ऐज डिस्प्लेला सपोर्ट करतो. तसेच, फोन अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 वर चालतो. फोन मध्ये प्रोसेसिंगसाठी सॅमसंगचा एक्सनाॅस 2100 चिपसेट देण्यात आला आहे. चिपसेट 5 नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनला आहे आणि डुअल मोड 5जीला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S21 Ultra क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईटसह एफ/1.8 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची डुअल पिक्सल अल्ट्रा वाइड लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 10 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि एफ/4.9 अपर्चर असलेली 10 मेगापिक्सलची सेकंडरी टेलीफोटो लेंस आहे.

हे देखील वाचा : OnePlus 9 च्या लॉन्चच्याआधी जाणून घ्या कोणत्या फीचर्ससह येईल हा पावरफुल फोन

सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्राचा कॅमेरा सेग्मेंट 100एक्स स्पेस जूम 10एक्स + 3एक्स आप्टिकल जूमला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी Galaxy S21 Ultra मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 40 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो फेज डिटेक्शन टेक्नॉलॉजी सह चालतो.

इतकेच नव्हे तर सॅमसंगचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीसह येतो जी 25वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. फोन Phantom Black आणि Sliver कलरमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्रा व्हिडीओ

The post 24,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे Samsung सर्वात पावरफुल फोन Galaxy S21 Ultra 5G, जाणून घ्या कुठे मिळेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-ultra-5g-gets-24000-rupees-discount-amazon-feb-fest-sale/feed/ 0
Exclusive: लॉन्चच्या आधी समोर आली Samsung Galaxy S21, S21+ आणि S21 Ultra ची किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-ultra-plus-price-leak-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-ultra-plus-price-leak-exclusive/#respond Mon, 21 Dec 2020 12:54:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9384 Blass ने शेअर केलेल्या Samsung Galaxy S21, Galaxy S21 + आणि Galaxy S21 Ultra चे लीक झालेल्या रेंडर वरून तिन्ही हँडसेटच्या संपूर्ण डिजाइनचा खुलासा झाला होता.

The post Exclusive: लॉन्चच्या आधी समोर आली Samsung Galaxy S21, S21+ आणि S21 Ultra ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung लवकरच आपल्या दमदार गॅलेक्सी एस21 सीरीज मध्ये तीन नवीन फोन्स सादर करणार आहे. आता पर्यंत समोर आलेल्या लीकनुसार सॅमसंग 14 जानेवारीला Galaxy S21 सीरीज सादर करू शकते. पण कंपनीने अधिकृतपणे याची माहिती दिली नाही. आता टिप्स्टर इशान अग्रवालने 91mobiles ला एस21 सीरीज मध्ये येणाऱ्या तिन्ही हँडसेट Samsung Galaxy S21, S21+, and S21 Ultra च्या किंमतीची माहिती दिली आहे.

अशी असेल किंमत

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार गॅलेक्सी एस21 च्या 128 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 849 यूरो (जवळपास 76,000 रुपये) असेल. तर, गॅलेक्सी एस21+ चा 128 जीबी स्टोरेज वेरियंट 1,049 यूरो (जवळपास 94,500 रुपये) व 256 जीबी स्टोरेज वेरियंट 1,099 यूरो मध्ये लॉन्च केला जाईल. गॅलेक्सी एस21 अल्ट्रा चा 128 जीबी स्टोरेज वेरियंट 1,399 यूरो (जवळपास 1.26 लाख रुपये) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टाॅप 10 स्मार्टफोन, हे आहेत स्वस्त बजेट मध्ये बेस्ट ऑप्शन

रेंडर्स पण झाले लीक

किंमती व्यतिरिक्त टिप्स्टरने अपकमिंग सॅमसंग गॅलेक्सी एस21+ चे नवीन रेंडर्स पण जारी केले आहेत. या रेंडर्स वरून फोनच्या फ्रंट व रियर डिजाइन सोबतच माहिती मिळाली आहे कि फोन्स तीन कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. इशान अग्रवालनुसार, गॅलेक्सी एस21 आणि गॅलेक्सी एस21+ च्या किंमती सॅमसंग गॅलेक्सी एस20 आणि गॅलेक्सी एस20+ च्या तुलनेत कमी करण्यात आल्या आहेत. तसेच गॅलेक्सी एस21 अल्ट्रा कंपनीच्या गॅलेक्सी एस20 अल्ट्रा पेक्षा महाग असेल. तसेच दुसऱ्या ट्वीट मध्ये इशानने एक फोटो शेयर केला आहे ज्याबाबत दावा केला गेला आहे कि हा सॅमसंग गॅलेक्सी एस21+ च्या कवरचा फोटो आहे. या तस्वीर मध्ये फोन वर तीन कॅमेरा मॉड्यूल आणि फ्लॅश दिसला होता.

डिजाइन

याआधी Blass ने शेअर केलेल्या Samsung Galaxy S21, Galaxy S21 + आणि Galaxy S21 Ultra चे लीक झालेल्या रेंडर वरून तिन्ही हँडसेटच्या संपूर्ण डिजाइनचा खुलासा झाला होता. लीक झालेले रेंडर सांगत आहेत कि सॅमसंग गॅलेक्सी एस 21 चार कलर ऑप्शन-गोल्ड, पर्पल, व्हाइट आणि ब्लॅक मध्ये येईल. हँडसेट मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप सह सादर केला जाईल. तसेच फ्रंटला मध्यभागी पंचहोल-डिजाइन सह एक फ्लॅट डिस्प्ले आणि उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन असेल. तर गॅलेक्सी एस 21 प्लस मध्ये गॅलेक्सी एस 21 सारखी डिजाइन असेल दोन्ही हँडसेटच्या मध्ये महत्वपूर्ण फरक स्क्रीन आकार आणि बॅटरीच्या क्षमतेचा असेल.

हे देखील वाचा : Samsung पासून Xiaomi पर्यंतचे हे आहेत 15 हजारांपेक्षा कमी किंमतीतले बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, बघा संपूर्ण यादी

स्पेसिफिकेशन्स

गॅलेक्सी S21 अल्ट्रा मध्ये कथितरित्या एक अतिरिक्त कॅमेरा सेंसर आणि मागे एक लेजर ऑटोफोकस सेंसर सह येईल. आधीच्या लीकच्या आधारावर बोलायचे झाले तर यात 10MP 10x सुपर-टेलीफोटो झूम लेंस, 108MP मुख्य सेंसर, 12MP अल्ट्रावाइड लेंस आणि 10MP 3x टेलीफोटो कॅमेरा असण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा कडून अपेक्षा करता येईल कि हा एका मोठ्या बॅटरी सह येईल. खासकरून गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा इतर मॉडेल्सच्य विपरीत घुमवदार डिस्प्ले पॅनल सह येईल.

The post Exclusive: लॉन्चच्या आधी समोर आली Samsung Galaxy S21, S21+ आणि S21 Ultra ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-ultra-plus-price-leak-exclusive/feed/ 0
Samsung Galaxy S21 सीरीज 14 जानेवारीला होईल लाॅन्च, 29 जानेवारी पासून सुरु होईल भारतात सेल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-series-launch-on-14-jan-and-india-sale-starts-from-29-january/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-series-launch-on-14-jan-and-india-sale-starts-from-29-january/#respond Fri, 11 Dec 2020 12:49:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9268 सॅमसंग गॅलेक्सी एस21 ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) वर लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी एस21 सीरीजचा एंट्री लेवल फोन SM-G991B मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे.

The post Samsung Galaxy S21 सीरीज 14 जानेवारीला होईल लाॅन्च, 29 जानेवारी पासून सुरु होईल भारतात सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy S21 सीरीज अनेक दिवस चर्चेचा विषय बनली आहे. कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही पण बोलले जात आहे कि या सीरीज अंतगर्त Samsung Galaxy S21, Samsung Galaxy S21 Plus आणि Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोन लाॅन्च केले जातील. सॅमसंगने सध्या सीरीजच्या लाॅन्च डेटची माहिती दिली नाही पण एका ताजा रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि पुढील महिन्याच्या 14 तारखेला सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरीज टेक मंचावर येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरीज संबंधित हि मोठी बातमी अँड्रॉइड अथाॅरिटी वेबसाइटने शेयर केली आहे. वेबसाइटने दावा केला आहे कि सॅमसंग येत्या 14 जानेवारीला टेक मंचावर आपली ‘गॅलेक्सी एस21’ सीरीज सादर करणार आहे. यादिवशी एक इंटरनेशनल लाॅन्च होईल आणि त्या मंचावरून वेगवेगळ्या बाजारांमध्ये हि सीरीज सादर केली जाईल. रिपोर्टनुसार 14 जानेवारीला लाॅन्च झाल्यानंतर हि सीरीज 29 जानेवारी पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy S21 सीरीज बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय बाजारात या सीरीज मध्ये क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन चिपसेट असेल तसेच भारतात हा सॅमसंगच्या एक्सनाॅस 2100 चिपसेट सह बाजारात येईल. ग्लोबल लाॅन्च नंतर हि सीरीज भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल जिची विक्री 29 जानेवारी पासून सुरु होईल. रिपोर्टनुसार सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर वर आतापासून 2,000 रुपये देऊन सीरीजचा कोणताही स्मार्टफोन प्री-बुक केला जाऊ शकतो. सीरीजच्या लाॅन्च, किंमत आणि बुकिंग संबंधित ठोस माहितीसाठी आपल्याला सध्या सॅमसंगच्या अधिकृत माहितीची वाट बघावी लागले.

हे देखील वाचा : Nokia घेऊन येत आहे स्वस्त एंडराॅयड ‘गो’ स्मार्टफोन, 15 डिसेंबरला होईल लाॅन्च

सॅमसंग गॅलेक्सी एस21 ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) वर लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी एस21 सीरीजचा एंट्री लेवल फोन SM-G991B मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. Samsung Galaxy S21 बद्दल मागील एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या एफएचडी+ डिस्प्ले वर लाॅन्च होऊ शकतो जो एमोलेड पॅनल वर बनला असेल. तसेच, फोन 4,000mAh च्या बॅटरी सह कथितरित्या 25W पर्यंतच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल. पण मागील रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि स्मार्टफोन बॉक्स मध्ये चार्जर असणार नाही.

Samsung Galaxy S21 Ultra

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्रा मध्ये 6.8-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले असेल जो अँड्रॉइड 11-बेस्ड One UI 3.0 वर चालेल. फोन 108MP प्राइमरी रियर कॅमेरा आणि 40MP फ्रंट-फेसिंग कॅमेऱ्या सह येईल. सोबतच टिप्सटरने सांगितले आहे कि या फ्लॅगशिप फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल. तसेच या फ्लॅगशिप फोन मध्ये हाई रिफ्रेश रेट स्क्रीन (144Hz) असू शकते. पण सध्या याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. येत्या काळात लवकरच फोन बद्दल अजून बरीच माहिती समोर येईल अशी शक्यता आहे.

The post Samsung Galaxy S21 सीरीज 14 जानेवारीला होईल लाॅन्च, 29 जानेवारी पासून सुरु होईल भारतात सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-series-launch-on-14-jan-and-india-sale-starts-from-29-january/feed/ 0