Nokia ने अलीकडेच भारतीय बाजारात आपला कमी किंमत असलेला स्मार्टफोन Nokia 2.4 लाॅन्च केला होता जो 10,399 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोन व्यतिरिक्त सतत बातम्या समोर येत आहेत कि नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल या महिन्यात भारतात अजून एक नवीन मोबाईल फोन Nokia 3.4 नावाने घेऊन येईल. या फोनच्या लाॅन्चच्या आधी आता माहिती समोर आली आहे कि नोकिया कंपनी येत्या 15 डिसेंबरला आपला अजून एक नवीन लो बजेट एंडराॅयड ‘गो’ स्मार्टफोन लाॅन्च करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे कि नोकिया कंपनी डिसेंबरच्या 15 तारखेला एक नवीन स्मार्टफोन टेक मंचावर सादर करणार आहे. यादिवशी हा मोबाईल फोन चीन मध्ये लाॅन्च केला जाईल जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये उपलब्ध होईल. एचएमडी ग्लोबलने अजूनतरी या फोनचे नाव सांगितले नाही पण चर्चा आहे कि हा एक कमी किंमत असलेला स्वस्त नोकिया फोन असेल जो एंडराॅयड गो वर्जन वर काम करेल. फोनचे नाव आणि इतर स्पेसिफिकेशन्ससाठी 15 डिसेंबरची वाट बघावी लागले.
Nokia 2.4
नोकिया 2.4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. यावर Nokia ची ब्रँडिंग आहे. तर स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : 8 जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट सह Xiaomi Mi 10i वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च
Nokia 2.4 कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. कंपनीच्या वेबसाइट वर नोकिया 2.4 64 जीबी स्टोरेज सह पण दाखवण्यात आला आहे. आशा आहे कि हा वेरिएंट आगामी काही दिवसांत विक्रीसाठी उपलब्ध होईल.
फोटोग्राफीसाठी नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मधोमध शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची प्राइमरी 5पी लेंस देण्यात आली आहे त्यासोबतच 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या 3पी फ्रंट लेंसला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा : Realme करणार आहे नारजो सीरीजचा विस्तार, पुढल्या महिन्यात लाॅन्च होतील Realme Narzo 30 आणि Narzo 30 Pro
Nokia 2.4 रियर डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड एकसाथ वापरता येतो. हा फोन 3.5एमएम जॅक, एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. कंपनीने या फोन मध्ये गूगल असिस्टेंट का शार्टकट बटन पण देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी Nokia 2.4 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 2.4 कंपनीने 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे. हा फोन ओटीजी फीचर सह येतो ज्यामुळे रिवर्स चार्ज पण करता येते.