Samsung पासून Xiaomi पर्यंतचे हे आहेत 15 हजारांपेक्षा कमी किंमतीतले बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, बघा संपूर्ण यादी

या धकाधकीच्या जीवनात स्मार्टफोन्सचे महत्व खूप बदलले आहे. फोन फक्त संपर्क साधण्यासाठी राहील नाहीत. सध्या आपण फोनची निवड करण्याआधी काही फीचर्स- गेमिंग, चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी आणि दमदार परफॉर्मन्स सारख्या अनेक गोष्टींचा विचार करतो. तसेच आपल्या बजेट मध्ये पण अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यातून निवड करणे कठीण होते. 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सध्या बाजारात अनेक गेमिंग स्मार्टफोन आहेत आणि याच कारणामुळे एक परफेक्ट गेमिंग फोन निवडणे कठीण होते. जर तुम्ही पण 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट गेमिंग फोन शोधत असाल तर तुमची निवडप्रक्रिया आम्ही सोप्पी करणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतले बेस्ट गेमिंग स्मार्टफोन्सची एक यादी घेऊन आलो आहोत. चला बघूया हि यादी..

Realme Narzo 20 Pro

रियलमी नार्जो 20 प्रो मध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याला AnTuTu मध्ये 30W+ सुपर हाई बेंचमार्क मिळाला आहे. तसेच, हा प्रोसेसर 12nm प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. तसेच हा प्रोसेसर दोन हाई परफॉर्मन्स Cortex-A76 cores at up to 2.05GHz आणि सहा हाई-एफिशिएंसी Cortex-A55 सह येतो. चांगल्या ग्राफिक्ससाठी यात 900MHz Mali-G76GPU देण्यात आला आहे. या प्रोसेसरचा वापर कंपनीने रियलमी 7 मध्ये आधी केला आहे. तसेच, Narzo 20 Pro मध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. नार्जो 20 प्रो बाबत इथे क्लिक करून जाणून घ्या सर्वकाही.

Motorola Moto G9 Power

मोटोरोलाच्या जी-सीरीजचा लेटेस्ट फोन Moto G9 Power भारतात सर्वप्रथम सादर केला गेला होता. Moto G9 Power भारतातील पहिला फोन होता ज्यात नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला होता. हा हेवी गेमिंग पण चांगल्याप्रकारे सांभाळतो. फोन मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज मिळते. सोबतच यात 512 जीबी पर्यंत माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट पण मिळेल. फोनची किंमत 11,999 रुपये आहे. फोन बाबत इथे क्लिक करून जाणून घ्या सर्वकाही.

Realme 7

या फोनची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. रियलमी 7 मध्ये एक दमदार मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर आहे जो मीडिया स्ट्रीमिंग आणि गेमिंगचा दमदार एक्सपीरियंस देतो. फोन मध्ये 6.5 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येते. फोन मध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 30 वॉट डार्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इथे क्लिक करून जाणून घ्या फोन बाबत सर्वकाही.

Samsung Galaxy M30s

गॅलेक्सी एम30एस ची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. गेमिंग एक्सपीरियंस चांगला करण्यासाठी Exynos 9611 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सोबतच गेम खेळताना फोनची बॅटरी संपू नये म्हणून यासाठी यात 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेरा पाहता यात 48MP + 5MP + 8MP चा ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इथे क्लिक करून जाणून घ्या फोन बाबत सर्वकाही.

Micromax In Note 1

Micromax In Note 1 मध्ये MediaTek’s Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 4GB की रॅम आणि 64GB स्टोरेज सह येतो. या फोन मध्ये पण कोणत्याही अडचणीविना गेमिंग करता येते. सोबतच फोन मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. फोनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरु होते. इथे क्लिक करून जाणून घ्या फोन बाबत सर्वकाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here