Tablet - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 19 Jul 2023 07:32:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme Pad 2 भारतात लाँच, कमी किंमतीत पावरफुल फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-india-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-india-launched-price-specifications/#respond Wed, 19 Jul 2023 07:32:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22464 रियलमीनं आज भारतात दोन डिवाइस लाँच केले आहेत. एक स्मार्टफोन तर दुसरा टॅबलेट. टॅबलेट रेंजचा विस्तार करण्यासाठी Realme Pad 2 चा समावेश करण्यात आला आहे. हा डिवाइस 11.5 इंच 2k डिस्प्ले, शानदार कॅमेरा, 8GB रॅम आणि अनेक फीचर्सना सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया ह्या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती. Realme Pad 2 ची किंमत […]

The post Realme Pad 2 भारतात लाँच, कमी किंमतीत पावरफुल फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme Pad 2 11.5 इंचाच्या 2k डिस्प्लेसह आला आहे.
  • ह्यात ड्युअल टोन डिजाइन मिळेल.
  • डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

रियलमीनं आज भारतात दोन डिवाइस लाँच केले आहेत. एक स्मार्टफोन तर दुसरा टॅबलेट. टॅबलेट रेंजचा विस्तार करण्यासाठी Realme Pad 2 चा समावेश करण्यात आला आहे. हा डिवाइस 11.5 इंच 2k डिस्प्ले, शानदार कॅमेरा, 8GB रॅम आणि अनेक फीचर्सना सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया ह्या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती.

Realme Pad 2 ची किंमत

Realme Pad 2 टॅबलेटचे दोन व्हेरिएंट बहरतात आले आहेत. टॅबलेटचा 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 22,999 रुपये मोजावे लागतील. कंपनीनं डिवाइस ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन कलरमध्ये आणला आहे.

Realme Pad 2 स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : नवीन टॅबलेट 11.5 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह येतो. हा डिस्प्ले120hz पर्यंतच्या अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटला स्पोर्ट करतो. तसेच 85.2 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 2000 x 1200 पिक्सल रिजॉल्यूशन, 450 निट्झ ब्राइटनेस, Q1 अल्ट्राव्हिजन इंजिन सपोर्टची सुविधा आहे.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसर प्रोसेसर देण्यात आला आहे. म्हणजे तुम्हाला लॅग फ्री परफॉर्मन्स मिळेल.
  • स्टोरेज : टॅबलेटमध्ये कंपनीनं 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिली आहे.
  • कॅमेरा : हा टॅब 20 मेगापिक्सलच्या दमदार कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी : ह्यातील 8360mAh ची बॅटरी दमदार बॅटरी बॅकअप देईल. तर चार्जिंगसाठी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • OS : हा डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो.
  • अन्य : टॅबलेटमध्ये ब्लूटूथ, वायफाय आणि अन्य अनेक बेसिक फीचर्स आहेत.

The post Realme Pad 2 भारतात लाँच, कमी किंमतीत पावरफुल फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-india-launched-price-specifications/feed/ 0
OnePlus Pad प्राइस झाली लीक; याच महिन्यात सुरु होऊ शकते विक्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-price-in-india-leaked-sale-may-start-in-this-month/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-price-in-india-leaked-sale-may-start-in-this-month/#respond Fri, 14 Apr 2023 10:27:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20287 वनप्लसनं फेब्रुवारी महिन्यात भारतात OnePlus 11 आणि OnePlus 11R स्मार्टफोन लाँच करण्यासोबतच आपला पहिला टॅबलेट डिवायस OnePlus Pad देखील सादर केला होता. कंपनीनं टॅबलेटचे सर्व फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे परंतु आतापर्यंत प्राइस व सेलची माहिती दिली नाही. परंतु आज एक नवीन लीकमध्ये वनप्लस पॅडची किंमत देखील समोर आली आहे. वनप्लस पॅडची किंमत OnePlus […]

The post OnePlus Pad प्राइस झाली लीक; याच महिन्यात सुरु होऊ शकते विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Pad ची किंमत 39,999 रुपये असू शकते.
  • हा वनप्लसनं बनवलेला पहिला टॅबलेट डिवायस आहे.
  • वनप्लस पॅडची विक्री या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु होऊ शकते.

वनप्लसनं फेब्रुवारी महिन्यात भारतात OnePlus 11 आणि OnePlus 11R स्मार्टफोन लाँच करण्यासोबतच आपला पहिला टॅबलेट डिवायस OnePlus Pad देखील सादर केला होता. कंपनीनं टॅबलेटचे सर्व फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे परंतु आतापर्यंत प्राइस व सेलची माहिती दिली नाही. परंतु आज एक नवीन लीकमध्ये वनप्लस पॅडची किंमत देखील समोर आली आहे.

वनप्लस पॅडची किंमत

OnePlus Pad च्या किंमतीची माहिती टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली आहे. ट्वीटमध्ये मुकुलनं या टॅबलेट डिवायसचा फोटो शेयर करण्यासोबतच प्राइस देखील दाखवली आहे. दावा केला आहे की वनप्लस पॅड भारतात 39,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. परंतु असं देखील होऊ शकतं की ही टॅबलेटची ऑफर प्राइस असेल आणि मूळ किंमत 42,999 रुपये असू शकते.

वनप्लस पॅड इंडिया लाँच

OnePlus Pad ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला आहे जिथे फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह आहे. अ‍ॅमेझॉनवर टॅबलेटची लाँच डेट तर घोषित केली नाही परंतु तिथे ‘कमिंग सून’ लिहिण्यात आलं आहे. तसेच आम्हाला आशा आहे की कंपनी या महिन्यात म्हणजे एप्रिलच्या अखेरपर्यंत वनप्लस पॅड भारतात ऑफिशियली अनाउंस करून याची विक्री सुरु करेल.

वनप्लस पॅडचे स्पेसिफिकेशन्स

  • 11.61″ Display
  • 7:5 Aspect Ratio
  • 144Hz Refresh Rate

OnePlus Pad 7:5 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्याला कंपनीनं ReadFit Screen असं नाव दिलं आहे. हा 2800 × 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 11.61 इंच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. स्क्रीनवर एचडीआर 10+, 500निट्स ब्राइटनेस आणि 296पीपीआय सारखे फीचर्स मिळतात. या टॅबलेट डिवायसची जाडी फक्त 6.54एमएम आहे तसेच याचे वजन 552ग्राम आहे.

  • 12GB RAM
  • MediaTek Dimensity 9000

वनप्लस पॅड स्टाईलिश आहेच तसेच पावरफुल देखील आहे. हा टॅबलेट मीडियाटेक डिमेनसिटी 9000 प्रोसेसरवर चालतो. हा डिवायस 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो जो LPDDR5 RAM टेक्नॉलॉजीवर चालतो. तसेच वनप्लस पॅडमध्ये UFS 3.1 Storage देण्यात आली आहे. हा वनप्लस टॅबलेट लेटेस्ट अँड्रॉइड ओएस 13 वर सादर करण्यात आला आहे.

  • 13MP Rear Camera
  • 8MP Front Camera

फोटोग्राफीसाठी वनप्लस पॅडच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टॅबलेट डिवायस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या टॅबलेटमध्ये ईआयएस स्टेबीलायजेशन फीचर देण्यात आलं आहे तर रियर कॅमेऱ्यात 4के व्हिडीओ तसेच फ्रंट कॅमेऱ्यात 1080पी व्हिडीओ रेकॉर्ड करता येतो.

  • 67W Fast Charging
  • 9,510mAh Battery

पावर बॅकअपसाठी OnePlus Pad 9,510एमएएचच्या दमदार बॅटरीसह येतो. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.

The post OnePlus Pad प्राइस झाली लीक; याच महिन्यात सुरु होऊ शकते विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-price-in-india-leaked-sale-may-start-in-this-month/feed/ 0
Amazon Great Indian Festival Sale: स्वस्तात खरेदी करा मोठा डिस्प्ले असलेले टॅबलेट्स, पाहा बेस्ट डील https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-tablets/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-tablets/#respond Thu, 29 Sep 2022 05:21:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13554 Amazon Great Indian Festival Sale: अ‍ॅमेझॉन फेस्टिवल सेल सुरु झाला आहे. या सेल दरम्यान सर्व प्रोडक्टवर दमदार डिस्काउंट मिळत आहे.

The post Amazon Great Indian Festival Sale: स्वस्तात खरेदी करा मोठा डिस्प्ले असलेले टॅबलेट्स, पाहा बेस्ट डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Amazon Great Indian Festival Sale 2022 लाइव्ह झाला आहे. या दरम्यान अ‍ॅमेझॉनवरील सर्व कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सवर दमदार डील मिळत आहेत. जर तुम्ही देखील दिवाळीच्या आधी तुमच्यासाठी शॉपिंग करण्याची योजना बनवत असाल तर हा सर्वात बेस्ट टाइम आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉन इंडियावरील टॅबलेट्सवर मिळणाऱ्या डिस्काउंटची सविस्तर माहिती देत आहोत. एंटरटेनमेंट आणि गेमिंगसाठी टॅबलेट्स बेस्ट डिवाइसेस आहेत. अ‍ॅमेझॉनवर डिस्काउंटसह SBI च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती दिली आहे.

Amazon Great Indian Festival Sale: Best Deals On Tablets

1. 2021 Apple iPad 10.2-inch

अ‍ॅप्पलचा 9th Gen iPad अ‍ॅमेझॉनवरील सेलमध्ये 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा अ‍ॅप्पलचा सर्वात अफोर्डेबल आयपॅड आहे. या टॅबलेटमध्ये A13 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. अ‍ॅप्पलच्या या आयपॅडचा Wi-Fi व्हेरिएंट इतर वेळी 28,999 रुपयांची बेस प्राइसमध्ये विकला जातो. परंतु Amazon Great India Festival सेल दरम्यान हा आयपॅड डिस्काउंटनंतर 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या टॅबलेटमध्ये 8MP चा वाइड कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रावाइड फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस: 28,999 रुपये
डील प्राइस: 23,999 रुपये

2. Mi Pad 5

Mi Pad 5 एक परफेक्ट अँड्रॉइड टॅबलेट आहे, जो अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान 22,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Mi Pad 5 मध्ये 10.95-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2560×1600 पिक्सल असून यात Dolby Vision मिळते. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. शाओमीच्या या टॅबलेटमध्ये क्वॉड स्पिकर आणि Dolby Atmos सपोर्ट देण्यात आला आहे. यात 8,720mAh ची बॅटरी आणि Qualcomm Snapdragon 860 प्रोसेसर मिळतो. तसेच फोटोग्राफीसाठी 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस: 26,999 रुपये
डील प्राइस: 22,999 रुपये

3. Samsung Galaxy Tab A8

सॅमसंगचा अफोर्डेबल टॅबलेट Samsung Galaxy Tab A8 देखील बजेटमध्ये उपलब्ध झाला आहे. सेल दरम्यान सॅमसंगचा हा टॅबलेट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ज्यात 10.5-इंचाचा डिस्प्ले 1920×1200 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. या टॅबमध्ये Dolby Atmos असलेले क्वॉड स्पिकर देण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी 8MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. सॅमसंगच्या या टॅबमध्ये 7,040mAh ची मोठी बॅटरी आणि UniSOC T618 प्रोसेसर देण्यात आला आहे.

प्राइस: 16,999 रुपये
डील प्राइस: 10,999 रुपये

4. Lenovo Tab P11 Plus

Lenovo Tab P11 Plus टॅबलेट अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. लेनोवेच्या या टॅबची मूळ प्राइस 25,999 रुपये आहे. डिजाईन पाहता हा टॅबलेट ड्युअल टोन मेटल बॉडीसह येतो, ज्यात 11.2-इंचाचा 2K IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या टॅबलेटमध्ये Mediatek Helio G90T ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतो. यातील 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा शानदार फोटोग्राफी करतात. या टॅबमध्ये 7,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

प्राइस: 25,999 रुपये
डील प्राइस: 21,999 रुपये

5. Nokia T20

Nokia T20 टॅबलेट अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. साधारणतः नेकियाचा हा टॅबलेट 16,499 रुपयांमध्ये विकला जातो. या टॅबलेटच्या डिस्प्लेची साइज 10.36-इंच आहे आणि याचे रिजोल्यूशन 2K आहे. या टॅबलेटमध्ये 8,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कंपनीनं दमदार ऑडिओसाठी OZO स्टीरियो स्पिकर दिले आहेत. फोटोग्राफीसाठी 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस: 16,499 रुपये
डील प्राइस: 12,499 रुपये

6. Samsung Galaxy Tab S6 Lite

Samsung Galaxy Tab S6 Lite चा समावेश मिड रेंजच्या बेस्ट टॅबलेट्समध्ये होतो. हा टॅब सेलमध्ये 27,200 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इतर वेळी सॅमसंगचा हा टॅब खरेदी करण्यासाठी 29,999 रुपये मोजावे लागतात. सॅमसंगच्या या टॅबमध्ये 10.4-इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा टॅब Qualcomm Snapdragon 720G प्रोसेसरसह येतो. यात 8MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर टॅबमध्ये AKG चे दोन Dolby Atmos स्पिकर आणि 7,040mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

प्राइस: 29,999 रुपये
डील प्राइस: 27,200 रुपये

7. Lenovo Tab M7 3rd Gen

लेनोवोचा Tab M7 3rd Gen टॅब फक्त 4,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. लेनोवोचा हा टॅबलेट ऑफ सेल पीरियडमध्ये 7,999 रुपयांमध्ये विकला जातो. टॅबमध्ये 7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये MediaTek MT8166 क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा Android 11 Go edition वर चालतो. टॅबलेटमध्ये 3,750mA ची बॅटरी, 2GB RAM, आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 5 MP चा रियर प्रायमरी कॅमेरा आणि 2 MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

प्राइस: 7,999 रुपये
डील प्राइस: 4,999 रुपये

8. Lenovo M10 FHD Plus 2nd Gen

Lenovo M10 FHD Plus टॅबलेटचा वायफाय मॉडेल देखील अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफ सेल दरम्यान यास लेनेवो टॅबसाठी 18,999 रुपये द्यावे लागतील. या टॅबलेटमध्ये 10.3-इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Android 9 वर चालतो. त्याचबरोबर प्रोसेसिंगसाठी Mediatek Helio P22T प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे. लेनोवोच्या टॅबमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात कंपनीनं 5,000mAh ची बॅटरी दिली आहे.

प्राइस: 18,999 रुपये
डील प्राइस: 14,999 रुपये

9. Samsung Galaxy Tab S8

Samsung Galaxy Tab S8 टॅबलेटचा वाय-फाय + एलटीई व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सीजन सेल दरम्यान 55,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy Tab S8 टॅबमध्ये 11-इंचाचा सिनेमॅटिक डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2,560×1,600 पिक्सल आहे. हा टॅब Android 12 आणि Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह येतो. टॅबच्या मागे 13MP + 6MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर फ्रंटला 12MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. या टॅबलेटमध्ये 8,000mAh ची बॅटरी 45W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.

प्राइस: 67,990 रुपये
डील प्राइस: 55,499 रुपये

10. Samsung Galaxy Tab S6 Lite

Samsung Galaxy Tab S6 Lite टॅबलेट अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान फक्त 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगच्या या टॅबलेटची मूळ किंमत 25,999 रुपये आहे. Samsung Galaxy Tab S6 Lite टॅबमध्ये 10.4-inch TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह Qualcomm Snapdragon 720G प्रोसेसर मिळतो. यात 8MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगच्या टॅबमध्ये AKG चे Dolby अ‍ॅटमोस स्पिकर आणि 7,040mAh ची बॅटरी मिळते.

प्राइस: 25,999 रुपये
डील प्राइस: 19,999 रुपये

The post Amazon Great Indian Festival Sale: स्वस्तात खरेदी करा मोठा डिस्प्ले असलेले टॅबलेट्स, पाहा बेस्ट डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-tablets/feed/ 0
Xiaomi लवकरच लॉन्च करेल Mi Pad 5 आणि Pad 5 Pro, समोर आले स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-will-soon-launch-mi-pad-5-and-pad-5-pro-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-will-soon-launch-mi-pad-5-and-pad-5-pro-specifications-leaked/#respond Fri, 07 May 2021 12:45:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10850 शाओमीचा अपकमिंग Mi Pad 5 टॅबलेट चिनी सर्टिफिकेशन साइट 3C वर स्पॉट केला गेला आहे.
बातम्यांनुसार शाओमीचे हे दोन्ही अपकमिंग टॅब MediaTek Dimensity 1200 आणि Snapdragon 870 चिपसेटसह सादर केले जाऊ शकतात.

The post Xiaomi लवकरच लॉन्च करेल Mi Pad 5 आणि Pad 5 Pro, समोर आले स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi लवकरच मार्केटमध्ये टॅबलेट लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. कंपनीने आता गेल्यावर्षी 2018 मध्ये आपला टॅबलेट लॉन्च केला होता. कोरोना संक्रमणामुळे ई-लर्निंग आणि वर्क फ्रॉम होमच्या उदयामुळे टॅबलेटची मागणी वाढत आहे. त्यामुळेच कदाचित कंपनी टॅबलेट लॉन्च करत आहे. शाओमीच्या अपकमिंग टॅबलेटबद्दल लीक रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे कि हा टॅब फ्लॅगशिप कॉनफिग्रेशनसह सादर केला जाऊ शकतो. (Xiaomi will soon launch MI Pad 5 and Pad 5 Pro specifications leaked)

शाओमीचा अपकमिंग Mi Pad 5 टॅबलेट चिनी सर्टिफिकेशन साइट 3C वर स्पॉट केला गेला आहे. या लिस्टिंगमध्ये या टॅबलेटसंबंधित काही स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. या लिस्टिंगनुसार शाओमीचा हा टॅबलेट डुअलसेल बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो, जिची एकूण क्षमता 8520mAh आहे. या टॅबमधील एका बॅटरीची क्षमता 4260mAh आहे. Xiaomi ने या टॅबबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. अफवांनुसार शाओमीचा हा टॅब दोन मॉडेल Mi Pad 5 आणि Pad 5 Pro मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे कमालीची कॅमेरा टेक्नोलॉजी, Galaxy S22 Ultra पासून फोटोग्राफीमध्ये मिळेल DSLR सारखी मजा

बातम्यांनुसार शाओमीचे हे दोन्ही अपकमिंग टॅब MediaTek Dimensity 1200 आणि Snapdragon 870 चिपसेटसह सादर केले जाऊ शकतात. शाओमीचा अपकमिंग Mi Pad5 Pro फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह सादर केला जाऊ शकतो, ज्याची मार्केटमध्ये थेट टक्कर iPad Pro आणि Huawei Mate Pad Pro शी होईल.

हे देखील वाचा : Samsung चा नवीन कारनामा, लॉन्च केला Galaxy S20 FE फोनचा तिसरा नवीन मॉडेल

Mi Pad 5 Pro बद्दल बोलले जात आहे कि या टॅबलेटमध्ये LCD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिजोल्यूशन 2K आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅंप्लिंग रेट 240Hz आहे. तसेच प्रो वर्जनमध्ये शाओमी स्टायलस सपोर्ट दिला जाऊ शकतो. Xiaomi ने अलीकडेच सांगितले होते कि ते टॅबलेटसाठी आपला कस्टम युआय MIUI डेवलप करत आहेत. या इंटरफेस मध्ये हॅन्डहेल्ड पीसी मोड आणि पीसी सेंट्रिक इंटरफेसमध्ये क्लासिक स्टार आणि कंट्रोल सेंटर आहे.

The post Xiaomi लवकरच लॉन्च करेल Mi Pad 5 आणि Pad 5 Pro, समोर आले स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-will-soon-launch-mi-pad-5-and-pad-5-pro-specifications-leaked/feed/ 0