रियलमीनं आज भारतात दोन डिवाइस लाँच केले आहेत. एक स्मार्टफोन तर दुसरा टॅबलेट. टॅबलेट रेंजचा विस्तार करण्यासाठी Realme Pad 2 चा समावेश करण्यात आला आहे. हा डिवाइस 11.5 इंच 2k डिस्प्ले, शानदार कॅमेरा, 8GB रॅम आणि अनेक फीचर्सना सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया ह्या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती.
Realme Pad 2 ची किंमत
Realme Pad 2 टॅबलेटचे दोन व्हेरिएंट बहरतात आले आहेत. टॅबलेटचा 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 22,999 रुपये मोजावे लागतील. कंपनीनं डिवाइस ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन कलरमध्ये आणला आहे.
Realme Pad 2 स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले : नवीन टॅबलेट 11.5 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह येतो. हा डिस्प्ले120hz पर्यंतच्या अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटला स्पोर्ट करतो. तसेच 85.2 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 2000 x 1200 पिक्सल रिजॉल्यूशन, 450 निट्झ ब्राइटनेस, Q1 अल्ट्राव्हिजन इंजिन सपोर्टची सुविधा आहे.
- प्रोसेसर : डिवाइसमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसर प्रोसेसर देण्यात आला आहे. म्हणजे तुम्हाला लॅग फ्री परफॉर्मन्स मिळेल.
- स्टोरेज : टॅबलेटमध्ये कंपनीनं 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिली आहे.
- कॅमेरा : हा टॅब 20 मेगापिक्सलच्या दमदार कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स आहे.
- बॅटरी : ह्यातील 8360mAh ची बॅटरी दमदार बॅटरी बॅकअप देईल. तर चार्जिंगसाठी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
- OS : हा डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो.
- अन्य : टॅबलेटमध्ये ब्लूटूथ, वायफाय आणि अन्य अनेक बेसिक फीचर्स आहेत.