Samsung चा नवीन कारनामा, लॉन्च केला Galaxy S20 FE फोनचा तिसरा नवीन मॉडेल

Samsung Galaxy S20 FE फोटो
Samsung Galaxy S20 FE

Samsung बद्दल काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती कि कंपनी ‘गॅलेक्सी एस20’ सीरीजच्या पावरफुल Samsung Galaxy S20 Fan Edition चा अजून एक नवीन मॉडेल घेऊन येत आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेटसह येईल. त्यानुसार सॅमसंगने हा नवीन वर्जन पण टेक मार्केटमध्ये उतरवला आहे. बातमीनुसार स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असलेला Samsung Galaxy S20 FE 4G मॉडेल जर्मनीमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत इतर मार्केट्समध्ये पण येऊ शकतो. (Samsung Galaxy S20 FE 4G with Qualcomm Snapdragon 865 launched)

तुम्ही गोंधळून जाऊ नये म्हणून सांगू इच्छितो कि हा Samsung Galaxy S20 FE फोनचा तिसरा मॉडेल आहे. याआधी कंपनीने गॅलेक्सी एस20 एफईचे दोन मॉडेल भारतात लॉन्च केले आहेत त्यातील एक 4G आणि दुसरा 5Gला सपोर्ट करतो. आज लॉन्च झालेला हा तिसरा मॉडेल पण कंपनीने 4G कनेक्टिविटीसह सादर केला आहे. या नवीन मॉडेल आणि जुन्या 4G मॉडेलमध्ये मुख्य फरक चिपसेटचा आहे. आधीच Galaxy S20 FE 4G सॅमसंगच्या एक्सनॉस 990 चिपसेटवर चालत होता पण या नवीन मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S20 FE 4G

नवीन सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई पाहता, हा फोन सॅमसंग जर्मनीच्या अधिकृत वेबसाइटवर 6 कलर वेरिएंट्समध्ये लिस्ट केला गेला आहे. या रंगांमध्ये Cloud Lavendar, Cloud Mint, Cloud Navy, Cloud Orange, Cloud Red आणि Cloud White चा समावेश आहे. हा फोन आईपी68 रेटेड आहे, त्यामुळे हा फोन वॉटरप्रूफ बनतो. नवीन गॅलेक्सी एस20 एफई पण अँड्रॉइड ओएससह सॅमसंग वन युआयवर चालतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे कमालीची कॅमेरा टेक्नोलॉजी, Galaxy S22 Ultra पासून फोटोग्राफीमध्ये मिळेल DSLR सारखी मजा

फोनचे बाकी स्पेसिफिकेशन्स जुन्या मॉडेल सारखेच आहेत जो इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. हा फोन बेजललेस डिजाईनला सपोर्ट करतो ज्याच्या वरच्या बाजूला फक्त 3.34mm आकाराचा सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस20 एफईमध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एस20 एफई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलवर डावीकडे बनलेल्या चौकोनी सेटअपमध्ये वर्टिकल शेपमध्ये आहे. या फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा डुअल पिक्सल कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Galaxy S20 FE एफ/2.2 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई 5जी व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here