Tata Motors - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 30 Sep 2022 11:26:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सिंगल चार्जवर मुंबई ते गोवा प्रवास; Tiago EV नंतर टाटा लाँच करागी तीन नवीन Electric Car https://www.91mobiles.com/marathi/tata-motors-upcoming-ev-punch-altroz-and-curvv/ https://www.91mobiles.com/marathi/tata-motors-upcoming-ev-punch-altroz-and-curvv/#respond Fri, 30 Sep 2022 11:26:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13616 Tata Motors नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सर्वसामान्य लोकांची इलेक्ट्रिक कार म्हणजे Tiago EV लाँच केली आहे. सध्या ही देशातील सर्वात स्वस्त पॅसेंजर इलेक्ट्रिक कार(Electric Car) आहे. हे ICE संचालित Tiago हॅचबॅकचे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. या नवीन मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये ते 11.79 लाख रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे आणि ही दोन बॅटरी पॅक – […]

The post सिंगल चार्जवर मुंबई ते गोवा प्रवास; Tiago EV नंतर टाटा लाँच करागी तीन नवीन Electric Car first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tata Motors नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सर्वसामान्य लोकांची इलेक्ट्रिक कार म्हणजे Tiago EV लाँच केली आहे. सध्या ही देशातील सर्वात स्वस्त पॅसेंजर इलेक्ट्रिक कार(Electric Car) आहे. हे ICE संचालित Tiago हॅचबॅकचे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. या नवीन मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये ते 11.79 लाख रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे आणि ही दोन बॅटरी पॅक – 19.2kWh आणि 24kWh सह येते.

टाटा मोटर्स आता Tiago EV नंतर अनेक नवीन इलेक्ट्रिक व्हेईकलवर देखील काम करत आहे. Tigor, Nexon आणि Tiago EV थोड्या मॉडिफाइड ICE प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. या मॉडेल्समध्ये फ्यूल टँक स्पेस आणि बूट फ्लोरमध्ये फिट करण्यात आलेली कस्टम स्प्लिट-बॅटरी पॅकची सुविधा आहे. तर ब्रँडच्या दुसऱ्या पिढीच्या ईव्हीमध्ये मोठ्या बॅटरी पॅकसाठी जास्त जागा बनवण्यासाठी जुनं प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणावर मॉडिफाय केलं जाईल. हे देखील वाचा: 15 हजारांच्या बजेटमध्ये तगडा Vivo Y73t 5G फोन; 12GB RAM सह 6,000mAh ची मोठी बॅटरी

tata motors upcoming ev punch altroz and curvv

Tata Motors पुढील वर्षी लाँच करेल ही नवीन ईव्ही

2025 च्या अखेरपर्यंत 5 नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. पुढील 2 वर्षांमध्ये टाटा मोटर्स 3 नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करेल, ज्यात दोन कंपनीच्या जुन्या मॉडेलचे इलेक्ट्रिफाइड व्हर्जन (electrified versions) असतील. कंपनी अल्ट्रोज (Altroz) आणि टाटा पंच (TATA Punch) कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करेल. तसेच, कंपनी 2024 मध्ये नवीन कर्व कॉन्सेप्ट (Curvv concept) वर आधारित इलेक्ट्रिक एसयूव्ही कूप लाँच करेल.

टाटा पंच आणि टाटा अल्ट्रोज ईव्ही 2023 मध्ये लाँच केल्या जातील. दोन्ही मॉडेल्समध्ये टाटाची झिपट्रॉन पावरट्रेन टेक्नॉलॉजीसह नेक्सॉन ईव्हीमधील बॅटरी पॅकची सुविधा असण्याची शक्यता आहे. नवीन मॉडेल 300 km पेक्षा जास्त रेंज देश शकतात, असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे टाटा कर्व आधारित ईव्ही 40kWh बॅटरी पॅक सह 500km च्या आसपास रेंज देऊ शकते. हे देखील वाचा: लोकप्रिय ‘रेडमी नोट’ सीरिजमध्ये आणखी एका दणकट स्मार्टफोन एंट्री; स्वस्तात Redmi Note 11R लाँच

tata motors upcoming ev punch altroz and curvv

Sierra Electric Vehicle

टाटा मोटर्स सिएरा इलेक्ट्रिक व्हेईकल (Sierra electric vehicle) देखील डेव्हलप करत आहे, जी सिग्मा आर्किटेक्चरवर आधारित असेल. कदाचित तुम्हाला माहित नसेल की टाटानं सिएरा ईव्ही कॉन्सेप्ट 2020 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केला होता. कंपनीनं नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही कॉन्सेप्ट अविन्या (Avinya) GEN 3 आर्किटेक्चरवर प्रदर्शित केला होता, जो अनेक बॉडी स्टाइलला सपोर्ट करतो. पारंपरिक स्केटबोर्ड आर्किटेक्चरप्रमाणे यात मोठ्या बॅटरी पॅकला समाविष्ट करण्यासाठी मोठा व्हीलबेस आहे. Avinya EV चं प्रोडक्शन व्हर्जन 2025 मध्ये बाजारात लाँच होईल.

The post सिंगल चार्जवर मुंबई ते गोवा प्रवास; Tiago EV नंतर टाटा लाँच करागी तीन नवीन Electric Car first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-motors-upcoming-ev-punch-altroz-and-curvv/feed/ 0
Tata Motors घेऊन येत आहे सर्वात स्वस्त आणि छोटी इलेक्ट्रिक कार Tiago EV, इतकी असेल किंमत https://www.91mobiles.com/marathi/tata-motors-to-launch-electric-hatchback-tiago-ev-soon-know-price-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/tata-motors-to-launch-electric-hatchback-tiago-ev-soon-know-price-and-features/#respond Sun, 11 Sep 2022 12:51:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12995 टाटा मोटर्स (Tata Motors) भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV आणण्याची योजना बनवत आहे. कंपनी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही Nexon आणि कॉम्पॅक्ट सेडान Tigor EV आधारित इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात विकत घे. टियागो ईव्ही (Tiago EV) ही स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक हॅचबॅक (electric hatchback) ची किंमत 12.5 लाख रुपये असण्याची शक्यता […]

The post Tata Motors घेऊन येत आहे सर्वात स्वस्त आणि छोटी इलेक्ट्रिक कार Tiago EV, इतकी असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टाटा मोटर्स (Tata Motors) भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV आणण्याची योजना बनवत आहे. कंपनी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही Nexon आणि कॉम्पॅक्ट सेडान Tigor EV आधारित इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात विकत घे. टियागो ईव्ही (Tiago EV) ही स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक हॅचबॅक (electric hatchback) ची किंमत 12.5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर ही कार 250 km ची रेंज देईल.

टाटा मोटर्स कंपनी Ziptron टेक्नॉलॉजी Tiago EV मध्ये देखील वापरेल, जी Tigor EV आणि Nexon EV मध्ये वापरण्यात आलेली आहे. Ziptron टेक्नॉलॉजी Xpres-T टेक्नॉलॉजीपेक्षा अधिक अ‍ॅडव्हान्स आहे, जी पूर्वी कमर्शियल सेगमेंटमधील Tigor EV मध्ये वापरण्यात आली आहे. हे देखील वाचा: अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone

डिजाईन पाहता Tiago EV आणि Tiago मध्ये जास्त बदल दिसणार नाही. Tiago EV मध्ये सिग्नेचर टील ब्लू आणि डेटोना ग्रेमध्ये मिळू शकतो. एक्सटीरिअरसोबत इंटीरिअरमध्ये देखील हा ब्लू अ‍ॅक्सेंट दिसू शकतो. टाटा मोटर्सनं शुक्रवारी जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त सांगितले की, Tiago EV ही Nexon आणि Tigor नंतर इलेक्ट्रिक सेगमेंटमधील कंपनीची तिसरी कार असेल.

Electric Hatchback Tiago EV

Electric Hatchback Tiago EV

कंपनीनं एका प्रेस रिलीजमध्ये सांगितलं होतं की आम्ही भारताला जगाची ईव्ही हब (EV hub) बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहोत आणि ते साकारण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कंपनीनं नवीन मोबिलिटी सोल्युशन सादर करण्यासाठी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (TPEM) ला टीपीजी राइज क्लायमेटसह स्थापन केलं आहे. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 55 इंचाचा Smart TV; घराला थिएटर बनवण्यासाठी आले Thomson चे QLED 4K TV

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर शैलेश चंद्रा (Shailesh Chandra) यांनी म्हटलं की जागतिक ईव्ही दिवस (World EV Day) वास्तवात आमच्यासाठी एक खास दिवस आहे, कारण आम्ही मागे वळून पाहतो आणि आमच्या आतापर्यंतच्या प्रवास डोळ्यासमोर आणतो. आम्हाला भारतात 88 टक्के हिस्सेदारीसह ईव्ही बाजाराचे नेतृत्व करण्याचा गर्व आहे.

आम्ही बाजाराला आकार दिला आहे आणि नेक्सॉन ईव्ही (Nexon EV) आणि टिगोर ईव्ही (Tigor EV) सह याची वाढ पाहिली आहे. आमच्याकडे रस्त्यावर चालणाऱ्या 40,000 पेक्षा जास्त टाटा ईव्ही आहेत. सुरुवातीला आमचा स्वीकार करणाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत, ज्यांनी ब्रँडवर विश्वास दाखवला. ते पुढे म्हणले की आज आमच्यासाठी महत्वाचा दिवस आहे आणि टियागो ईव्हीसह आमच्या ईव्ही पोर्टफोलियोचा विस्तार करण्याची घोषणा आम्ही करत आहोत.

The post Tata Motors घेऊन येत आहे सर्वात स्वस्त आणि छोटी इलेक्ट्रिक कार Tiago EV, इतकी असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-motors-to-launch-electric-hatchback-tiago-ev-soon-know-price-and-features/feed/ 0