कमालच झाली! 5 महिन्यात 12,500 किलोमीटर चालवली ही इलेक्ट्रिक कार, खर्च आला 0 रुपये

Electric Car चालवण्यासाठी Petrol आणि Diesel Cars पेक्षा खर्च कमी येतो, हे तुम्ही ऐकलं असेल. परंतु, तुम्ही हे ऐकून थक्क व्हाल की 5 महिन्यात 12,500 km चालवल्यानंतर बॅटरी असलेल्या कारचा खर्च 0 रुपये आला आहे. अहमदाबाद, गुजरातमधील Tata Tigor EV च्या एका मालकानं दावा आहे केला आहे की त्याने आपली इलेक्ट्रिक कार 12,500 किमी पर्यंत चालवली, ज्यासाठी त्याने 0 रुपये खर्च केले. प्लगिन इलेक्ट्रिक व्हेईकल्स नावाच्या एका YouTube चॅनेलच्या एका व्हिडीओमध्ये टाटा टिगोर ईव्हीच्या मालकानं कार बराच काळ चालवल्यानंतर आपला अनुभव या व्हिडीओमधून सांगितलं आहे. चला जाणून घेऊया त्यांनी ही कमाल केली.

0 रुपयांमध्ये Tata Tigor EV नं 12,500km चा प्रवास

गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या समर्थ जानी यांनी सांगितलं की ते Tigor EV रोज जवळपास 60 किमी चालवतात, ज्यात कायम एसी चालू असतो. व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलं आहे की ते जवळपास 30-40 टक्के वेळा स्पोर्ट मोडमध्ये ड्राईव्ह करतात आणि Tigor EV च्या कामगिरींवर समाधानी आहेत. तसेच Tigor ची ‘स्टाईल बॅक’ कूप सारखी डिजाइन देखील आवडली आहे. हे देखील वाचा: 150W फास्ट चार्जिंग आणि 16GB RAM सह दणकट OnePlus Ace Pro लाँच, पाहा याची पावर

समर्थ यांनी सांगितलं आहे की ते Tigor EV रोज चार्ज करतात आणि चालवतात. त्यांच्या घराच्या छतावर 10 kW ची सोलर पॅनल सिस्टम आहे, जी दिवसाला 50 यूनिट विजेची निर्मिती करते. त्याने दावा केला आहे की त्यांची Tigor EV या सौर पॅनल्सद्वारे निर्मिंती 10 यूनिट विजेचा रोज वापर करते.

तसेच, समर्थ यांचा दावा आहे की या सौर पॅनल्समधून निर्मित विजेमुळे त्याचा रोज Tigor EV चालवण्याचा खर्च शून्य झाला आहे. गाडीचे मालक Samarth Jani अनेक वर्षांपासून automotive industry सोबत मिळून काम करत आहेत. त्याच्याकडे Tata Nano आणि Mahindra Thar देखील आहे. हे देखील वाचा: सर्व टॉप फिचर स्वस्तात! 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह येतोय Redmi चा किफायतशीर फोन

Tigor EV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

टाटाच्या या कारमध्ये 26 kWh चा लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. टाटाची ही कार ARAI सर्टिफाइड आहे जी सिंगल चार्जमध्ये 306 km ची रेंज ऑफर करते. तसेच Tata Nexon EV मध्ये 30.2 kWh ची बॅटरी मिळते. ही बॅटरी IP-67 सर्टिफिकेशन आणि 8 वर्षांच्या वॉरंटीसह येते. 15A च्या रेग्युलर चार्जरच्या माध्यमातून ही 0-80 टक्के चार्ज करण्यास 8 तास 45 मिनिटांचा वेळ लागतो. तर 25 kW DC फास्ट चार्जरच्या माध्यमातून ही फक्त 65 मिनिटांत 0-80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here