Tata Motors घेऊन येत आहे सर्वात स्वस्त आणि छोटी इलेक्ट्रिक कार Tiago EV, इतकी असेल किंमत

Tiago EV

टाटा मोटर्स (Tata Motors) भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV आणण्याची योजना बनवत आहे. कंपनी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही Nexon आणि कॉम्पॅक्ट सेडान Tigor EV आधारित इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात विकत घे. टियागो ईव्ही (Tiago EV) ही स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक हॅचबॅक (electric hatchback) ची किंमत 12.5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर ही कार 250 km ची रेंज देईल.

टाटा मोटर्स कंपनी Ziptron टेक्नॉलॉजी Tiago EV मध्ये देखील वापरेल, जी Tigor EV आणि Nexon EV मध्ये वापरण्यात आलेली आहे. Ziptron टेक्नॉलॉजी Xpres-T टेक्नॉलॉजीपेक्षा अधिक अ‍ॅडव्हान्स आहे, जी पूर्वी कमर्शियल सेगमेंटमधील Tigor EV मध्ये वापरण्यात आली आहे. हे देखील वाचा: अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone

डिजाईन पाहता Tiago EV आणि Tiago मध्ये जास्त बदल दिसणार नाही. Tiago EV मध्ये सिग्नेचर टील ब्लू आणि डेटोना ग्रेमध्ये मिळू शकतो. एक्सटीरिअरसोबत इंटीरिअरमध्ये देखील हा ब्लू अ‍ॅक्सेंट दिसू शकतो. टाटा मोटर्सनं शुक्रवारी जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त सांगितले की, Tiago EV ही Nexon आणि Tigor नंतर इलेक्ट्रिक सेगमेंटमधील कंपनीची तिसरी कार असेल.

Electric Hatchback Tiago EV

Electric Hatchback Tiago EV

कंपनीनं एका प्रेस रिलीजमध्ये सांगितलं होतं की आम्ही भारताला जगाची ईव्ही हब (EV hub) बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहोत आणि ते साकारण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कंपनीनं नवीन मोबिलिटी सोल्युशन सादर करण्यासाठी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (TPEM) ला टीपीजी राइज क्लायमेटसह स्थापन केलं आहे. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 55 इंचाचा Smart TV; घराला थिएटर बनवण्यासाठी आले Thomson चे QLED 4K TV

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर शैलेश चंद्रा (Shailesh Chandra) यांनी म्हटलं की जागतिक ईव्ही दिवस (World EV Day) वास्तवात आमच्यासाठी एक खास दिवस आहे, कारण आम्ही मागे वळून पाहतो आणि आमच्या आतापर्यंतच्या प्रवास डोळ्यासमोर आणतो. आम्हाला भारतात 88 टक्के हिस्सेदारीसह ईव्ही बाजाराचे नेतृत्व करण्याचा गर्व आहे.

आम्ही बाजाराला आकार दिला आहे आणि नेक्सॉन ईव्ही (Nexon EV) आणि टिगोर ईव्ही (Tigor EV) सह याची वाढ पाहिली आहे. आमच्याकडे रस्त्यावर चालणाऱ्या 40,000 पेक्षा जास्त टाटा ईव्ही आहेत. सुरुवातीला आमचा स्वीकार करणाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत, ज्यांनी ब्रँडवर विश्वास दाखवला. ते पुढे म्हणले की आज आमच्यासाठी महत्वाचा दिवस आहे आणि टियागो ईव्हीसह आमच्या ईव्ही पोर्टफोलियोचा विस्तार करण्याची घोषणा आम्ही करत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here