Tata Motors नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सर्वसामान्य लोकांची इलेक्ट्रिक कार म्हणजे Tiago EV लाँच केली आहे. सध्या ही देशातील सर्वात स्वस्त पॅसेंजर इलेक्ट्रिक कार(Electric Car) आहे. हे ICE संचालित Tiago हॅचबॅकचे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. या नवीन मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये ते 11.79 लाख रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे आणि ही दोन बॅटरी पॅक – 19.2kWh आणि 24kWh सह येते.
टाटा मोटर्स आता Tiago EV नंतर अनेक नवीन इलेक्ट्रिक व्हेईकलवर देखील काम करत आहे. Tigor, Nexon आणि Tiago EV थोड्या मॉडिफाइड ICE प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. या मॉडेल्समध्ये फ्यूल टँक स्पेस आणि बूट फ्लोरमध्ये फिट करण्यात आलेली कस्टम स्प्लिट-बॅटरी पॅकची सुविधा आहे. तर ब्रँडच्या दुसऱ्या पिढीच्या ईव्हीमध्ये मोठ्या बॅटरी पॅकसाठी जास्त जागा बनवण्यासाठी जुनं प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणावर मॉडिफाय केलं जाईल. हे देखील वाचा: 15 हजारांच्या बजेटमध्ये तगडा Vivo Y73t 5G फोन; 12GB RAM सह 6,000mAh ची मोठी बॅटरी
Tata Motors पुढील वर्षी लाँच करेल ही नवीन ईव्ही
2025 च्या अखेरपर्यंत 5 नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. पुढील 2 वर्षांमध्ये टाटा मोटर्स 3 नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करेल, ज्यात दोन कंपनीच्या जुन्या मॉडेलचे इलेक्ट्रिफाइड व्हर्जन (electrified versions) असतील. कंपनी अल्ट्रोज (Altroz) आणि टाटा पंच (TATA Punch) कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करेल. तसेच, कंपनी 2024 मध्ये नवीन कर्व कॉन्सेप्ट (Curvv concept) वर आधारित इलेक्ट्रिक एसयूव्ही कूप लाँच करेल.
टाटा पंच आणि टाटा अल्ट्रोज ईव्ही 2023 मध्ये लाँच केल्या जातील. दोन्ही मॉडेल्समध्ये टाटाची झिपट्रॉन पावरट्रेन टेक्नॉलॉजीसह नेक्सॉन ईव्हीमधील बॅटरी पॅकची सुविधा असण्याची शक्यता आहे. नवीन मॉडेल 300 km पेक्षा जास्त रेंज देश शकतात, असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे टाटा कर्व आधारित ईव्ही 40kWh बॅटरी पॅक सह 500km च्या आसपास रेंज देऊ शकते. हे देखील वाचा: लोकप्रिय ‘रेडमी नोट’ सीरिजमध्ये आणखी एका दणकट स्मार्टफोन एंट्री; स्वस्तात Redmi Note 11R लाँच
Sierra Electric Vehicle
टाटा मोटर्स सिएरा इलेक्ट्रिक व्हेईकल (Sierra electric vehicle) देखील डेव्हलप करत आहे, जी सिग्मा आर्किटेक्चरवर आधारित असेल. कदाचित तुम्हाला माहित नसेल की टाटानं सिएरा ईव्ही कॉन्सेप्ट 2020 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केला होता. कंपनीनं नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही कॉन्सेप्ट अविन्या (Avinya) GEN 3 आर्किटेक्चरवर प्रदर्शित केला होता, जो अनेक बॉडी स्टाइलला सपोर्ट करतो. पारंपरिक स्केटबोर्ड आर्किटेक्चरप्रमाणे यात मोठ्या बॅटरी पॅकला समाविष्ट करण्यासाठी मोठा व्हीलबेस आहे. Avinya EV चं प्रोडक्शन व्हर्जन 2025 मध्ये बाजारात लाँच होईल.