Tech News In Marath - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एकाच दिवसात विकले गेले जवळपास 2 अब्ज रुपयांचे रियलमी 3 फोन, शाओमीला फुटला घाम https://www.91mobiles.com/marathi/more-than-210000-realme-3-sold-in-india-flash-sale-next-19-march/ https://www.91mobiles.com/marathi/more-than-210000-realme-3-sold-in-india-flash-sale-next-19-march/#respond Wed, 13 Mar 2019 10:23:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3849 दोन्ही फ्लॅश सेल मध्ये मिळून रियलमी 3 चे एकूण 2,10,000 पेक्षा पण जास्त यूनिट विकले गेले आहेत.

The post एकाच दिवसात विकले गेले जवळपास 2 अब्ज रुपयांचे रियलमी 3 फोन, शाओमीला फुटला घाम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी त्या निवडक ब्रँडस पैकी एक आहे​ ज्याने नेमकेच स्मार्टफोन बाजारात आणले आहेत, पण हे सर्व स्मार्टफोन ​सामान्य लोकांना आवडले आहेत ​रियलमी थोड्याच वेळात देशातील हिट ब्रँडस मध्ये सामील झाला आहे. साल 2019 मध्ये आपल्या पहिल्या स्मार्टफोनच्या स्वरूपात रियलमी ने रियलमी 3 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन मार्चच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च झाला होता जो देशात 2 वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. रियलमी कंपनी आपला हा नवीन स्मार्टफोन फ्लॅश सेल द्वारे विकत आहे. काल म्हणजे 12 मार्चला रियलमी 3 पहिल्यांदा फ्लॅश सेल साठी उपलब्ध झाला होता आणि पहिल्याच दिवशी या स्मार्टफोनने सेलचा असा रेकॉर्ड केला कि कंपनीने 2 अब्ज रुपयांच्या आसपास रियलमी 3 फोन विकले. हैराण होऊ नका तुम्ही बरोबर वाचले आहे काल एकाच दिवसात रियलमी ने जवळपास 2,00,00,00,000 रुपयांचे रियलमी 3 स्मार्टफोन विकले आहेत.

एकाच दिवशी दोन फ्लॅश सेल
काल म्हणजे 12 मार्चला दुपारी 12 वाजता रियलमी 3 चा पहिला फ्लॅश सेल सुरु झाला होता. हा सेल रियलमीच्या अधिकृत वेबसाइटव्यतिरिक्त फक्त फ्लिपकार्ट वरच आयोजित झाला होता. पहिल्या फ्लॅश सेल मध्ये रियलमी 3 विकत घेणाऱ्यांची इतकी गर्दी झाली कि काही मिनिटांत या फोनचा स्टॉक आउट पण झाला होता. कंपनीचा दावा आहे कि काही मिनिटांत रियलमी 3 चे 1.5 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत.

रियलमी 3 प्रति स्मार्टफोन यूजर्सचे इतके वेड पाहून रियलमी ने दुपारीच घोषणा केली होती कि कालच म्हणजे 12 मार्चलाच रात्री 8 वाजता पुन्हा रियलमी 3 चा फ्लॅश सेल आयोजित होईल. ठरल्यानुसार रात्री 8 वाजता ​रियलमी 3 चा दुसरा फ्लॅश सेल सुरु झाला आणि दुसऱ्या फ्लॅश सेल मध्ये पण काही मिनिटांत रियलमी 3 पुन्हा आउट आफ स्टॉक झाला. कंपनीने दावा केला आहे कि दोन्ही फ्लॅश सेल मध्ये मिळून रियलमी 3 चे एकूण 2,10,000 पेक्षा पण जास्त यूनिट विकले गेले आहेत.

जियोफोन 2 ला टक्कर देण्यास या भारतीय कंपनीने लॉन्च केला फोन, किंमत 2 हजार पेक्षा पण कमी

विकले गेले 2 अब्जांचे रियलमी 3
रियलमीने घोषणा केली आहे कि दोन्ही फ्लॅश सेल मध्ये रियलमी 3 चे 2 लाख 10 हजार पेक्षा पण जास्त यूनिट विकले गेले आहेत. या सेल मध्ये रियलमी 3 च्या कोणत्या वेरिएंटचे किती यूनिट विकले गेले आहेत हे कंपनीने सांगितले नाही. विशेष म्हणजे रियलमी 3 चा 3जीबी/32जीबी वेरिएंट 8,999 रुपये आणि 4जीबी/64जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकला गेला होता. त्यामुळे विकले गेलेले सर्व 2,10,000 यूनिट रियलमी 3 च्या बेस वेरिएंटचे होते असे गृहीत धरले तरी कंपनीने एका दिवसात 1,88,97,90,000 रुपयांचे फोन विकले गेले आहेत. म्हणजे रियलमी 3 मुळे रियलमी ने एकाच दिवसात 2 अब्ज रुपयांची उलाढाल केली आहे.

पुढील सेल 19 मार्च
लो बजेट सेग्मेंट मध्ये हिट झालेल्या रियलमी 3 चे दोन्ही फ्लॅश सेल यशस्वी झाले आहेत. त्यामुळे जे यूजर्स स्टॉक संपल्यामुळे रियलमी 3 विकत घेऊ शकले नाही त्यांच्यासाठी रियलमी ने घोषणा केली आहे कि रियलमी 3 चा पुढील फ्लॅश सेल 19 मार्चला आयोजित केला जाईल. हा फ्लॅश सेल 19 मार्चच्या दुपारी 12 वाजता सुरु होईल जो कंपनीच्या वेबसाइट सोबत फ्लिपकार्ट वर होईल.

लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स

विशेष म्हणजे रियलमी कंपनी लवकरच रियलमी 3 आफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध करू शकते. दुसरीकडे रियलमी रियलमी 3 प्रो स्मार्टफोन लवकरच बाजरात आणण्याची तयारी करत आहे. यासंबंधित माहिती आम्ही तुम्हाला देत राहू. रियलमी 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post एकाच दिवसात विकले गेले जवळपास 2 अब्ज रुपयांचे रियलमी 3 फोन, शाओमीला फुटला घाम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/more-than-210000-realme-3-sold-in-india-flash-sale-next-19-march/feed/ 0
6जीबी रॅम आणि ताकदवान प्रोसेसर सह लॉन्च झाला सोनी एक्सपीरिया 1, बघा प्राइस स्पेसिफिकेशन आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/mwc-2019-sony-launches-xperia-1-with-3-camera-and-855-snapdragon-processor-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/mwc-2019-sony-launches-xperia-1-with-3-camera-and-855-snapdragon-processor-in-marathi/#respond Mon, 25 Feb 2019 16:33:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3718 एक्सपीरिया 1 जगातील पहिला फोन बनला आहे जो 21:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे.

The post 6जीबी रॅम आणि ताकदवान प्रोसेसर सह लॉन्च झाला सोनी एक्सपीरिया 1, बघा प्राइस स्पेसिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सोनी ने आधीच घोषणा केली होती कि ते मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस 2019 मध्ये सहभागी होतील. या टेक शो मध्ये सहभागी होऊन कंपनी ने आज आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केला आहे. सोनी ने एक्सपीरिया 1 नवीन टेक्नॉलॉजी आणि शानदार फीचर्स सह लॉन्च केला आहे.

किंमत आणि उपलब्धता
सोनी एक्सपीरिया 1 ची किंमत पाहता £799 (जवळपास 74,000 रुपये) आहे. डिवाइस पर्पल, ब्लॅक, ग्रे आणि व्हाइट कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. कंपनी ने लॉन्चच्या वेळी म्हटले ‘एक्सपीरिया 1 फोन जगातील पहिला फोन आहे, ज्यात आय ऑटो फोकस ट्रॅकिंग सिस्टम असेल.” तसेच फोन आईपी 65/68 रेटिंग सह येतो. याचा अर्थ असा कि हा पाण्यात दोन मीटर खोलीत 30 मिनिटे चालतो.

तसेच फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरचा ट्रेंड फॉलो न करत फोनच्या साइडला फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे जो पावर बटणच्या खाली आहे. सध्या अनेक कंपन्या 19:9 आणि 19.5:9 आस्पेक्ट रेश्यो सह आपले स्मार्टफोन्स सादर करत आहे. पण त्यापुढे जात कंपनीचा एक्सपीरिया 1 जगातील पहिला फोन बनला आहे जो 21:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे.

सोनी एक्सपीरिया 1 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
या फोन मध्ये 6.5-इंचाचा 4के एचडीआर ओएलईडी डिस्प्ले मिळेल जो गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट आहे. हा डॉल्बी ऐटमॉस ऑडियो टेक्नॉलजीला सपॉर्ट करतो.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 12-एमपी + 12एमपी + 12एमपी चा कॉम्बिनेशन मिळेल. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

सोनी एक्सपीरिया 1 कंपनी द्वारा 6जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. जर तुम्हाला फोनची स्टोरेज वाढवायची असेल तर माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. सोनी एक्सपीरिया 1 मध्ये एंडरॉयडचा लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,330एमएएच ची बॅटरी देण्यात आला आहे.

The post 6जीबी रॅम आणि ताकदवान प्रोसेसर सह लॉन्च झाला सोनी एक्सपीरिया 1, बघा प्राइस स्पेसिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mwc-2019-sony-launches-xperia-1-with-3-camera-and-855-snapdragon-processor-in-marathi/feed/ 0
व्हॅलेंटाइन डे ची भेट, ऍप्पल आईफोन एक्सआर वर कंपनी देत आहे मोठी सूट https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xr-price-discount-rs-5300-offline-stores-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xr-price-discount-rs-5300-offline-stores-in-india-in-marathi/#respond Mon, 11 Feb 2019 14:25:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3601 आईफोन एक्सआर चे सर्व वेरिएंट्स डिस्काउंट सह अधिकृत स्टोर्स तसेच रिटेल चेन मधून विकत घेता येतील.

The post व्हॅलेंटाइन डे ची भेट, ऍप्पल आईफोन एक्सआर वर कंपनी देत आहे मोठी सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऍप्पल ने गेल्यावर्षी आईफोन 10एस आणि 10एस मॅक्स सारख्या महाग स्मार्टफोन्स सोबत आईफोन एक्सआर पण लॉन्च केला होता. हा आईफोनचा स्वस्त मॉडेल होता जो भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. व्हॅलेंटाइन च्या निमिताने तरुणांना आकर्षित करण्यासाठी ऍप्पल ने आपला हा मोबाईल आईफोन एक्सआर मोठ्या डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध केला आहे. ऍप्पल ने आईफोन एक्सआर च्या सर्व वेरिएंट्सच्या किंमतीती 5,300 रुपयांची कपात केली आहे ज्यामुळे व्हॅलेंटाइन डे पर्यंत आईफोन एक्सआर स्वस्तात विकत घेता येईल.

अशी आहे ऑफर
ऍप्पलने आईफोन एक्सआर च्या सर्व वेरिएंट्सच्या किंमती थेट 5,300 रुपयांनी कमी केल्या आहेत. या डिस्काउंट नंतर 76,900 रुपयांचा आईफोन एक्सआर चा 64जीबी स्टोरेज वेरिएंट 71,600 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 81,900 रुपयांचा आईफोन एक्सआर चा 128जीबी वेरिएंट 76,600 रुपये तसेच 91,900 रुपयांचा आईफोन एक्सआर चा 256जीबी स्टोरेज वेरिएंट 86,600 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

कधी आणि कुठून घ्यावा विकत
ऍप्पल ने आईफोन एक्सआर वर हा डिस्काउंट खासकरून व्हॅलेंटाइन डे साठी सादर केला आहे. आईफोन एक्सआर च्या सर्व वेरिएंट्स वर हा प्राइज कट आज पासून सुरु झाला आहे आणि व्हॅलेंटाइन ईव म्हणजे 13 फेब्रुवारी पर्यंत चालेल. आईफोन एक्सआर वर हि सूट कंपनी ने फक्त ऑफलाईन प्लॅटफॉर्म वरच दिली आहे. आईफोन एक्सआर चे सर्व वेरिएंट्स डिस्काउंट सह अधिकृत स्टोर्स तसेच रिटेल चेन मधून विकत घेता येतील.

ऍप्पल आईफोन एक्सआर
आईफोन एक्सआर पाहता हा फोन एलसीडी डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. हा फोन नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आणि 3डी सेंसर आहे. या फोन मध्ये 6.1-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1729 X 828 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. फोन एल्युमिनियम फ्रेम सह ग्लास बॉडी वर बनला आहे जो प्रीमियम लुक देतो. फोनच्या डिस्प्ले ला कंपनी ने लिक्विड रेटिना डिस्प्ले नाव दिले आहे.

या व्हॅलेंटाईनला राहू नका सिंगल, हे 5 डेटिंग ऍप्स शोधून देतील तुम्हाला तुमचा सोबती

हा फोन कंपनी च्या ए12 बायोनिक चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आयफोन एक्सआर च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. हा फोन पण बोके मोड आणि पोट्रेड मोड ला सपोर्ट करू शकतो. त्याचप्रमाणे फोनच्या फ्रंट पॅनल वर 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात फेस आईडी फीचर आहे.

The post व्हॅलेंटाइन डे ची भेट, ऍप्पल आईफोन एक्सआर वर कंपनी देत आहे मोठी सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xr-price-discount-rs-5300-offline-stores-in-india-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी एम30 आला समोर, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह असेल इनफिनिटी वी एमोलेड डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-triple-rear-camera-5000mah-battery-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-triple-rear-camera-5000mah-battery-specifications-in-marathi/#respond Mon, 11 Feb 2019 11:54:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3591 गॅलेक्सी एम30 चा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी एम30 आला समोर, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह असेल इनफिनिटी वी एमोलेड डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने आपली बहुप्रतीक्षित गॅलेक्सी एम सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतर्गत गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, जे बाजारात येताच हिट झाले आहेत. गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 सध्या फक्त भारतीय बाजारात सेल साठी उपलब्ध आहेत जे येत्या काही दिवसांत देशातील इतर बाजारांत सादर होतील. या दोन स्मार्टफोन्स सोबत गॅलेक्सी एम30 बद्दल पण अनेक लीक्स समोर आले आहेत आणि त्यातच आता गॅलेक्सी एम30 चा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम30 चा फोटो प्राइजकार्ट द्वारा शेयर केला गेला आहे. या फोटो मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. गॅलेक्सी एम30 च्या फोटो मध्ये फोनच्या डिजाईन सोबतच या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली आहे. लीक झालेल्या फोटो वरून गॅलेक्सी एम30 च्या कॅमेरा सेटअप सोबतच फोन डायमेंशन्स, पोर्ट आणि सेंसर्सची माहिती सांगण्यात आली आहे.

डिजाईन

गॅलेक्सी एम30 चा फ्रंट पॅनल पाहता हा फोन ‘वी’ शेप वाल्या नॉच सह सादर केला जाऊ शकतो आहे. फोनच्या तीन किनार पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत तसेच खालच्या बाजूला थोडा बॉडी पार्ट आहे. हा फोन कंपनी द्वारा इनफिनिटी वी एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोनचा रियर कॅमेरा बॅक पॅनल वर डाव्या बाजूला वर आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लश लाईट देण्यात आली आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. माइक्रोफोन फोनच्या वर आहे तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. गॅलेक्सी एम30 च्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे.

एक्सक्लूसिव : ओपो एफ11 प्रो 32-एमपी पॉप-अप सेल्फी आणि 48-एमपी डुअल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च

कॅमेरा सेटअप

गॅलेक्सी एम30 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा वाईड सेंसर तसेच एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. त्याचबरोबर सेल्फी साठी गॅलेक्सी एम30 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार गॅलेक्सी एम30 मध्ये 2220 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.38-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाईल जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड असेल. हा फोन कंपनी द्वारा 6जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येईल. बोलले जात आहे ​कि गॅलेक्सी एम30 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल तसेच 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्स ए73 तसेच 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्ट ए53 सह सॅमसंग एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालेल. विशेष म्हणजे हाच चिपसेट सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये पण देण्यात आला आहे.

या व्हॅलेंटाईनला राहू नका सिंगल, हे 5 डेटिंग ऍप्स शोधून देतील तुम्हाला तुमचा सोबती

सॅमसंग गॅलेक्सी एम30 डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. फोनच्या लीक फोटो मध्ये फोनच्या डिस्प्ले वर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे. बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास लीकनुसार गॅलेक्सी एम30 मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते जी क्विक चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. सध्या गॅलेक्सी एम30 चे हे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाहीत जोपर्यंत सॅमसंग स्वतः फोनची घोषणा करत नाही.

The post सॅमसंग गॅलेक्सी एम30 आला समोर, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह असेल इनफिनिटी वी एमोलेड डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-triple-rear-camera-5000mah-battery-specifications-in-marathi/feed/ 0